Login

“हसणाऱ्या चेहऱ्यांच्या मागची जळती राख”

हसण्यामागची सत्यता
“हसणाऱ्या चेहऱ्यांच्या मागची जळती राख” Sunil PuneTM, 8007939422

तो रोज सकाळी हसत घरच्या चौकातून जातो… लोक म्हणतात, “काय भारी आयुष्य आहे याचं!”
गाडी आहे, मोबाईल आहे, फोटो आहेत, स्टेटस आहेत, लाईक्स आहेत, कौतुक आहे…
पण कुणालाच माहीत नाही या हसण्यामागे किती वेळा त्याने रडू गिळलंय ते!

रात्री उशीशी डोळे लागले की त्याच्या डोक्यात प्रश्नांचा स्फोट होतो…
आपण खरंच जिवंत आहोत? की फक्त चालतोय, बोलतोय, काम करतोय?
घरात सगळं आहे… पण आपुलकी हरवलेली.
पती-पत्नी एकाच छताखाली… पण संवाद शून्य.
मुलं जवळ… पण मन दूर.

आजचा माणूस स्टेटस अपडेट करतो, पण मन अपडेट करत नाही.
Live मध्ये हसतो… पण वास्तवात मात्र तो आतून तुटलेला असतो.
तो “Busy” असतो इतका की स्वतःसाठी वेळच उरत नाही.

आणि मग एक दिवस… अचानक…
त्या हसऱ्या चेहऱ्याच्या आतला माणूस थकतो.
तो ओरडू इच्छितो, पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही.
तो सांगू इच्छितो, “मला पण वेदना होतात!”
पण लोक म्हणतात, “अरे, तू तर मजबूत आहेस!”

मजबूत असणाऱ्यांच्या वेदना सगळ्यात जास्त दुर्लक्षित असतात…

आज प्रेम “Feeling” नाही, तर “Timepass” बनलंय.
नातं “संयम” नाही, तर “सुविधा” बनलंय.
आपुलकी “त्याग” नाही, तर “गरज” बनलीय.

जिथे मोबाईल चार्ज नसला तरी माणूस अस्वस्थ होतो…
तिथे नात्यांचा चार्ज संपला तरी कुणाला फरक पडत नाही.

जग खूप वेगात चाललंय मित्रा…
पण माणूस आतून फार मागे पडलाय.
तो हसतोय, पण आनंदासाठी नाही…
तो रडतोय, पण अश्रू बाहेर पडत नाहीत.

आणि सगळ्यात भीषण वास्तव काय माहीत आहे?

आज माणूस मेल्यानंतर लोक म्हणतात
“खूप चांगला होता…”
पण तो जिवंत असताना मात्र
कुणीच त्याच्या मनाचा दरवाजा उघडून पाहिला नव्हता.

म्हणूनच…
जर कुणी आज हसताना दिसत असेल,
तर त्याच्या हसण्यामागची कथा जाणून घेण्याची हिंमत ठेवा.
कारण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे…
कधी ना कधी जळलेली राख लपलेली असते.

आणि हे वास्तव आहे मित्रा…
हे कुठली कथा नाही…
हे आपण सगळे रोज जगत असलेलं कटू, कडू, पण खरं सत्य आहे!

हे वास्तव आहे मित्रा…
हे कुठली कथा नाही…
हे आपण सगळे रोज जगत असलेलं कटू, कडू, पण खरं सत्य आहे!


सुनिल पुणेTM 9359850065
0