स्माईल प्लीज

सकारात्मकता

सकाळी उठल्याबरोबर मीनाक्षीने ओंकाराचं ध्यान केलं थोडासा हलकाफुलका योगा करून ती किचनमध्ये आली किचनच्या ओट्यावरती कापड फिरवलं आणि गॅसच्या शेगडीला अन्नपूर्णेला नमस्कार करून आज मी जे जे काय रांधे ते रुचकर होऊ दे अशी प्रार्थना केली कोमट पाणी पिऊन झालं आणि थोड्या वेळाने चहा ठेवण्यासाठी गॅस चालू केला तर नेमकाच गॅस संपलेला सकाळी उठल्याबरोबर सिलेंडर बदलवण्याचं काम करणं म्हणजे जीवावर येणार काम परंतु करावंच लागणार होतं शेवटी तिने नुकताच कुठेतरी वाचलेलं आठवलं आणि स्वतःशीच छान अलार्म स्माईल केलं स्माईल प्लीज म्हटलं आणि सिलेंडर बदलविण्याचं काम करून पुढे झकास पैकी चहा बनवायला लागली.