स्मितहास्य..!
घेऊन हातात हात माझा
आपल्या नात्याला आकार दे
शब्दांची गरज काय
तू तुझ्या हसण्याने होकार दे
आपल्या नात्याला आकार दे
शब्दांची गरज काय
तू तुझ्या हसण्याने होकार दे
असं सहज म्हटलं जात नाही, बऱ्याच गोष्टी या स्वतः बोलून व्यक्त करता येत नाही. तर बऱ्याच गोष्टी न बोलताही चेहऱ्याच्या माध्यमातून उलगडल्या जातात.जसे आईला बघताच बाळाच्या चेहऱ्यावर हास्य उमटने.मनुष्याचा चेहरा बघताच, नकळतपणे विविध भाव उलगडतात. मग ते एखाद्याबद्दल प्रेम असो किंवा मनात असलेला एखाद्या बद्दलचा द्वेष. मनुष्याच्या ठिकाणी स्थिर व शाश्वत अशा भावना असतात. जसे क्रोध,हास्य,भय,कंटाळा विस्मय,शांती हें होय. यातील शाश्वत भावनांना स्थायीभाव म्हणतात. हे भाव कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायीभाव रस निर्माण करतात. आणि हे संपूर्ण भाव आपला चेहऱ्यावरून व्यक्त होत असतात. मग तो राग असो किंवा एखाद दुःख किंवा कंटाळा असो किंवा स्मित हास्य हें मनातील भावना सहज व्यक्त करतात. 'हास्य' या रसात प्रामुख्याने विडंबन, चेष्टा, आनंद इत्यादी हास्यरस निर्माण होतात.स्वतः हसणे किंवा इतरांना हसवणे ही तर एक कला आहे.पण हास्य चेहऱ्यावर असतांना चेहरा प्रफुल्लित दिसतो. हसणे आरोग्याच्यादृष्टीने आरोग्यवर्धक आहे. हसणे हे शारीरिक,मानसिक,सामाजिकतेच्या दृष्टीनेही चांगले आहे. हसण्यामुळे शरीरात अँड्रॉफीन्स हा घटक क्रियाशील होतो. हसल्यामुळे मेंदूला चालना मिळते. मेंदूची क्रियाशीलता वाढते. तसेच नकारात्मकतेचा विकास रोखण्यास मदत होते. चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य चेहऱ्याच सौंदर्य वाढवते. जास्त प्रमाणात हसणाऱ्या व्यक्तीला काही जण माघारी नावेही ठेवतात. परंतु हसण्याचे बरेच फायदे आहेत. हसल्यामुळे आजारांना दूर ठेवता येते. हास्य शरीर स्वास्थ्यासाठी आरोग्यवर्धक आहे. अलीकडे तणावाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून हा तणाव घालविण्यासाठी हसणे हा एक उत्तम आणि चांगला उपाय आहे. हसणारे व्यक्ती हें मनमोकळे बोलणारे असतात. स्वतःही तणावात राहत नाही व इतरांनाही तणाव मुक्त ठेवतात. तसेच समोरच्या,आपल्या अवतीभवती असलेल्या व्यक्तीचा ताणही कमी करतात. त्याकरिता सर्वच दृष्टीने हसणे हे खूप फायद्याचे आहे. कोणतेही काम करत असतांना नकारात्मकता उमटत नाही, तर त्या ऐवजी सकारात्मक विचार मनात येतात. स्वतःबरोबरच इतरांनाही आनंदी ठेवता येते. विविध प्रकारचे कॉमेडी शो,गमतीदार गोष्टी,हास्य जत्रा किंवा कॉमेडी चित्रपट पाहणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहेत.अशा कार्यक्रमातून मनमुरादपणे हसता येते. हसल्यामुळे शरीराला एक प्रकारे ऊर्जा मिळते. तसेच हसल्यामुळे व्यक्तीचे आयुष्य वाढते. शरीरात नव्या स्फूर्तीचा संचय होतो.मानसिक दुःख दूर होऊन व्यक्ती प्रसन्न राहते.हसल्यामुळे शरीरासोबत मेंदू मजबूत होतो. चेहऱ्यावर नेहमी उत्साह, चेहऱ्यावरील स्नायू सक्षम,आणि रक्त संचार वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहून,शरीराची प्रतिकार क्षमता वाढते.सतत उद्भवणाऱ्या रोगासोबत लढण्यासाठी ही शरीर सक्षम रहाते. त्यामुळे संसर्ग आणि एनर्जीच्या प्रभावात येण्यापासून संरक्षण होते. ऋतूनुसार उद्भवणाऱ्या आजारांना दूर ठेवता येते. संतुलन राखण्यासाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. त्याकरिता एकटे राहण्यापेक्षा मित्रांसोबत वेळ घालवणे आवश्यक ठरते.आपल्याला शरीराचे संतुलन राखता येते. हृदयासाठी, हृदयाचा आजार आहे अशांसाठी हसणे हे फार लाभदायक आहे. रोज दहा मिनिटे हसण्याचा व्यायाम केल्याने हृदयाचे तीव्र गतीने ब्लड सर्कुलेशन होते. हे एका संशोधनातून समोर आले आहे.हसल्यामुळे कामावर, अभ्यासावर लक्ष केंद्रित होते. एकमेकांशी बोलतांना चेहऱ्यावर स्मितहास्य,नातेसंबंधासाठी उपयुक्त ठरते.मनात नेहमी सकारात्मक विचार येतात. जवळचे चांगले संबंध निर्माण होण्यासाठी चेहऱ्यावरील स्मितहास्य खूप महत्त्वाचे ठरते. हसतमुख व उत्साही असणाऱ्या व्यक्तीकडे लोक जास्त आकर्षित होत असतात.तसेच हार्मोन्सची सक्रियता वाढते.कितीही तणाव असला तरी आनंदी राहण्यासाठी स्मितहास्य उपयुक्तच ठरते. विनोदी कलाकार, विनोदी अभिनेता प्रेक्षकांना नेहमी आपल्या विनोदी भूमिकेमुळे हसत ठेवत असतात. हसणे हे आरोग्यासाठी सर्वोत्तम 'औषध' आहे. आपण निरोगी तणावमुक्त राहण्याचा व राखण्याचा प्रयत्न करावा. विशेषतः हास्य हें एकही रुपयांना न देता,सर्वोत्तम औषध आहे. आपण जर दररोज चेहऱ्यावर हास्य भाव ठेवत असलो तर आपले हृदय निरोगी ठेवू शकतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. हृदयाचा झटका किंवा इतर हृदय व रक्त वाहिन्यासंबंधी समस्या, दूर राहतात. आपण जेव्हा हसतो किंवा हसत कोणाला बघतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरही नकळतं सकारात्मक भाव उमटतात आणि समोरचा व्यक्तीही आपल्याला बघून प्रसन्न होतो. चेहऱ्यावरील स्मित हास्य शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. म्हणून स्वतःही हसा आणि आपल्या सोबत आपल्या मित्र मैत्रिणींना ही हसवा. निरोगी जगण्याचा अवलंब करा..!
नाते असावं मनाशी मनाचे
मोगऱ्यासम दरवळणारे
स्मित हास्य आपुलकीने
वेळोवेळी बहरत राहणारे
मोगऱ्यासम दरवळणारे
स्मित हास्य आपुलकीने
वेळोवेळी बहरत राहणारे
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
मूर्तिजापूर, जि अकोला
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा