कुमुदिनी बाई सकाळचे कामं आवरून ओट्यावर उभ्या होत्या. हात पुसायला त्या पदर घेत होत्या, इतक्यात अंगणात त्यांचा मोठा भाऊ, कपूरचंद काका, आत येताना दिसला.
त्यांना पाहताक्षणीच त्या थबकल्या. घरात मुलगी अर्चना शाळेत गेली होती आणि मुलगा अतुल नोकरीवर.
त्यांना पाहताक्षणीच त्या थबकल्या. घरात मुलगी अर्चना शाळेत गेली होती आणि मुलगा अतुल नोकरीवर.
कपूरचंद काका अंगणातल्या खाटेवर बसले आणि म्हणाले—
“कुमुदी, मी अतुलसाठी मुलगी बघून आलोय. लाखात एक आहे बाई! घर साधं पण सुसंस्कृत आहे. बाप शाळेत मास्तर, आणि मुलगी अंग्रजीत एम.ए. पास! चेहऱ्यावर इतकं तेज की पाहतच राहावंसं वाटतं. हुंडा फार मिळणार नाही, पण मुलगी सोन्यासारखी आहे. म्हणतो, आता तुझं मन शांत होईल. तुझा मुलगा संसाराला तयार झालाच पाहिजे आता!”

कुमुदिनी बाईंचा श्वास एकदम जड झाला.
आठ वर्षं झाली होती कमलकांतला जाऊन . ४५ व्या वर्षीच त्यांनी संसाराच्या साऱ्या जबाबदाऱ्या तिच्या हातात सोडून अचानक निघून गेले.
कमलकांत प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रूफरीडर होते. पगार साधारण दहा हजार. घर स्वतःचं होतं, म्हणून काही तरी निभत होतं. पण त्यांच्या मृत्यूनंतर सगळं कोसळलं.

अतुल अभ्यासात तसा कच्चाच. बारावी दोनदा नापास झालेला. वडिलांचं निधन झालं तेव्हा तो फक्त अठरा वर्षांचा. प्रेसवाल्यांनी दयेमुळे त्याला क्लर्कची नोकरी दिली — आठ हजार रुपयांवर.
कुमुदिनी बाईंच्या मनात गेली तीन वर्षं एकच गोष्ट — “कधी रे हा मुलगा संसाराला उभा राहील?”
पण कुठंही जम बसत नव्हता. नातलग नुसते बोलाचालीला येत, मदतीला कोणी नाही.
पण कुठंही जम बसत नव्हता. नातलग नुसते बोलाचालीला येत, मदतीला कोणी नाही.
मागच्यावेळी कपूरचंद आले होते, तेव्हा त्यांनीच म्हटलं होतं,
“अगं, अतुलचं लग्न झालं नाही तर अर्चनेचं कसं होणार?”
“अगं, अतुलचं लग्न झालं नाही तर अर्चनेचं कसं होणार?”
त्या दिवसापासूनच काकांच्या मनात विचार आला होता. इटाव्याचं म्हणजेच — आपल्या परभणीतल्या एका शिक्षक मित्राची मुलगी होती — निवेदिता. सुंदर, शिक्षणात हुशार, पण हुंडा परवडत नव्हता म्हणून लग्न लांबत होतं. कपूरचंदांनी अतुलचं बोलणं केलं आणि अर्धवट जुळवणी करूनच आले.
कुमुदिनी म्हणाल्या—
“भाऊ, हुंडायचं काही देणंघेणं नाही हो. कमलकांत तर आयुष्यभर हुंडाविरोधी होते, पण आपला अतुल साधा मॅट्रिक पास आहे ना.”
“भाऊ, हुंडायचं काही देणंघेणं नाही हो. कमलकांत तर आयुष्यभर हुंडाविरोधी होते, पण आपला अतुल साधा मॅट्रिक पास आहे ना.”
कपूरचंद म्हणाले,
“अगं, आता डबल एम.ए. लोकही बेरोजगार आहेत. आपल्या अतुलचा चेहरा तरी साधा नाही. शिकलेला वाटतो. काय कमी आहे त्यात?”
“अगं, आता डबल एम.ए. लोकही बेरोजगार आहेत. आपल्या अतुलचा चेहरा तरी साधा नाही. शिकलेला वाटतो. काय कमी आहे त्यात?”
रविवारचा दिवस ठरला. कुमुदिनी बाई, अतुल आणि अर्चना — तिघे कपूरचंदांसोबत परभणीकडे रवाना झाले.
तिथे निवेदिता पाहिली आणि कुमुदिनी बाईंच्या डोळ्यांनीच मान्यता दिली.
गोऱ्यापान चेहऱ्यावर शांत हास्य, लांबसडक केस, बोलण्यात गोडवा, चालण्यात सौंदर्य.
अर्चनाही खुश. तिच्या मनात आलं – “आता हिला घेऊनच परतायचं!”
गोऱ्यापान चेहऱ्यावर शांत हास्य, लांबसडक केस, बोलण्यात गोडवा, चालण्यात सौंदर्य.
अर्चनाही खुश. तिच्या मनात आलं – “आता हिला घेऊनच परतायचं!”
कपूरचंदांनी विचारलं—
“काय कुमुदी, मुलगी बरी वाटली?”
“काय कुमुदी, मुलगी बरी वाटली?”
त्या म्हणाल्या,
“भाऊ, मुलगी तर अप्सरा आहे, पण तिला आपला मुलगा आवडला का ते विचारा. आणि त्याच्या शिक्षणाचंही खरं खरं सांगा. नंतर कुणी म्हणू नये की फसवलं.”
“भाऊ, मुलगी तर अप्सरा आहे, पण तिला आपला मुलगा आवडला का ते विचारा. आणि त्याच्या शिक्षणाचंही खरं खरं सांगा. नंतर कुणी म्हणू नये की फसवलं.”
कपूरचंद आत गेले. आत मास्टर रामप्रकाशजी, म्हणजे निवेदिताचे वडील, बोलत होते.
त्यांनी अतुलला पाहिलं आणि म्हणाले,
“मुलगा साधा वाटतो, पण बरा आहे. आजकाल एम.ए. झालेली मुलंही नोकरीसाठी फिरत आहेत.”
त्यांनी अतुलला पाहिलं आणि म्हणाले,
“मुलगा साधा वाटतो, पण बरा आहे. आजकाल एम.ए. झालेली मुलंही नोकरीसाठी फिरत आहेत.”
निवेदिताच्या चेहऱ्यावर क्षणभर चिंतेची छटा उमटली, पण  ती म्हणाली,
“बाबा , तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.”
“बाबा , तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.”
थोड्याच वेळात ठरलं. कुमुदिनी बाईंनी मिठाई आणली, नारळ फोडला, आणि आपल्या हातातली सोन्याची अंगठी निवेदिताच्या हातात घातली.
लग्न ठरलं.
लग्न ठरलं.
तीन महिन्यांनी लग्न पार पडलं. वारातीचं स्वागत, जेवणावळी, सगळं सुंदर पार पडलं.
निवेदिता सासरी आली तेव्हा घरात सणासारखं वातावरण होतं.
कुमुदिनी बाई खुश, अर्चना आनंदात. अतुल मात्र गप्प.
पत्नी एवढी सुशिक्षित — एम.ए. पास, सुंदर, बोलकी — आणि आपण मॅट्रिक.
मनात कुठेतरी एक न्यूनगंड.
निवेदिता सासरी आली तेव्हा घरात सणासारखं वातावरण होतं.
कुमुदिनी बाई खुश, अर्चना आनंदात. अतुल मात्र गप्प.
पत्नी एवढी सुशिक्षित — एम.ए. पास, सुंदर, बोलकी — आणि आपण मॅट्रिक.
मनात कुठेतरी एक न्यूनगंड.
निवेदिताला पहिल्या आठवड्यात सगळ्यांनी लाडानं घेतलं.
पण तिच्या नजरेत नवऱ्याबद्दल एक हळवी खंत होती —
अतुल तिला हक्कानं काहीच सांगत नव्हता.
नेहमी लाजरा, संकोची, तिच्या प्रत्येक बोलण्यावर फक्त मान डोलवणारा.
पण तिच्या नजरेत नवऱ्याबद्दल एक हळवी खंत होती —
अतुल तिला हक्कानं काहीच सांगत नव्हता.
नेहमी लाजरा, संकोची, तिच्या प्रत्येक बोलण्यावर फक्त मान डोलवणारा.
अतुलच्या मनात भीती — “मी कमी शिकलेला, ती इंग्रजीत एम.ए., काय वाटेल तिला माझ्याबद्दल?”
काही दिवसांनी आजूबाजूच्या बायका आपली सवयीनं बोलू लागल्या.
“कुमुदीबाई, सून इतकी शिकलेली, ती घरात काय करणार? चार दिवसात वेगळी राहायला मागेल.”
“सुंदर आहे खरी, पण हात कामाला लागेल का?”
“अगं, अशा मुली फक्त बोलक्या असतात, काम नाही करीत. तुझ्या काळच्या सून कुठं आता मिळतात?”
“त्याचं पगार तिच्या हातातच द्यायला सांग. नाहीतर नको बघू पुढं रडत.”
“सुंदर आहे खरी, पण हात कामाला लागेल का?”
“अगं, अशा मुली फक्त बोलक्या असतात, काम नाही करीत. तुझ्या काळच्या सून कुठं आता मिळतात?”
“त्याचं पगार तिच्या हातातच द्यायला सांग. नाहीतर नको बघू पुढं रडत.”
कुमुदिनी बाईंच्या मनात संशय शिरला.
“आपण जरा घाईत लग्न केलं का?”
“आपण जरा घाईत लग्न केलं का?”
उधर अतुलच्या मित्रांनी चेष्टा सुरू केली —
“ए, तू तर जोरूचा गुलाम झालास रे!”
“ती तुला इंग्रजीत शिकवते का रे?”
“बायकोला काही विचारायचं तर इंग्रजीत बोलतोस का?”
अतुल फक्त हसून टाळत राहिला, पण मनात जखम झालीच होती.
“ए, तू तर जोरूचा गुलाम झालास रे!”
“ती तुला इंग्रजीत शिकवते का रे?”
“बायकोला काही विचारायचं तर इंग्रजीत बोलतोस का?”
अतुल फक्त हसून टाळत राहिला, पण मनात जखम झालीच होती.
पण जे घडलं ते सगळ्यांच्या अपेक्षेच्या विरुद्ध होतं.
दुसऱ्याच दिवशी निवेदिता ओटा घासायला तयार झाली.
धूणी -भांडी, झाडून काढणं — एकाही कामात तिला कमीपणा वाटला नाही.
तिने प्रेमानं म्हटलं—
“आई, तुम्ही थकता. आता ही जबाबदारी माझी.”
धूणी -भांडी, झाडून काढणं — एकाही कामात तिला कमीपणा वाटला नाही.
तिने प्रेमानं म्हटलं—
“आई, तुम्ही थकता. आता ही जबाबदारी माझी.”
कुमुदिनी बाई गप्प राहिल्या.
बायका आता उलट बोलू लागल्या —
“ दुसऱ्या दिवशीपासून कामाला लावलं बिचारीला! थोडा आराम तरी दिला असता.”
बायका आता उलट बोलू लागल्या —
“ दुसऱ्या दिवशीपासून कामाला लावलं बिचारीला! थोडा आराम तरी दिला असता.”
कुमुदिनी बाईंनी एक दिवस म्हटलं—
“सूनबाई, एक बाई ठेवू का घरकामाला?”
“सूनबाई, एक बाई ठेवू का घरकामाला?”
निवेदिता शांतपणे म्हणाली—
“आई, ठेवायची असेल तर अर्चनेची ट्युशन बंद करूया. मीच तिला शिकवेन.”
“आई, ठेवायची असेल तर अर्चनेची ट्युशन बंद करूया. मीच तिला शिकवेन.”
तिने खरंच शिकवायला सुरुवात केली.
अर्चना हळूहळू अभ्यासात पुढं येऊ लागली.
गल्लीतल्या इतर मुलीही तिच्याकडे शिकायला येऊ लागल्या.
आणि पाहता पाहता, निवेदिताने घरबसल्या ट्युशन सुरू केल्या.
कुमुदिनी बाईंनी मनाशी म्हटलं,
“घरात लक्ष्मी आली खरी.”
अर्चना हळूहळू अभ्यासात पुढं येऊ लागली.
गल्लीतल्या इतर मुलीही तिच्याकडे शिकायला येऊ लागल्या.
आणि पाहता पाहता, निवेदिताने घरबसल्या ट्युशन सुरू केल्या.
कुमुदिनी बाईंनी मनाशी म्हटलं,
“घरात लक्ष्मी आली खरी.”
उन्हाळ्याच्या सुट्टीत ट्युशन बंद झाल्या, पण निवेदितानं अतुलला नवा विचार सुचवला.
एका रात्री ती म्हणाली—
“तुम्ही रोज रात्री प्रेसचं प्रूफ वाचता. ते घरच्याघरी वाचून देता का?”
एका रात्री ती म्हणाली—
“तुम्ही रोज रात्री प्रेसचं प्रूफ वाचता. ते घरच्याघरी वाचून देता का?”
अतुल म्हणाला—
“हो, वाचतोच. सवय झाली आहे आता.”
“हो, वाचतोच. सवय झाली आहे आता.”
“मग तुम्ही हिंदीसोबत इंग्रजीचं प्रूफ पण आणा. मी मदत करते.”
अतुल थोडा दचकलाच, पण तिचं इंग्रजी पाहून तो थक्क झाला.
निवेदिताच्या मदतीनं आता त्यांचं उत्पन्न वाढलं.
निवेदिताच्या मदतीनं आता त्यांचं उत्पन्न वाढलं.
अर्चना गावात पहिल्या क्रमांकाने पास झाली.
शाळेत सगळीकडे चर्चा – “अर्चनाला तिच्या वहिनींनी शिकवलंय.”
शाळेच्या मुख्याध्यापिकेने निवेदिताला बोलावलं.
“तुमचं शिकवणं पाहून वाटतं, तुम्ही आमच्याच शाळेत अध्यापिका झाल्यावर खूप छान होईल .”
शाळेच्या मुख्याध्यापिकेने निवेदिताला बोलावलं.
“तुमचं शिकवणं पाहून वाटतं, तुम्ही आमच्याच शाळेत अध्यापिका झाल्यावर खूप छान होईल .”
निवेदिता अर्ज भरते आणि पंधरा दिवसांनी तिला नोकरी मिळते .
घरात आनंदाचं वातावरण.
ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली—
“आई, बघा ना, आता मीही काहीतरी करू शकते.”
घरात आनंदाचं वातावरण.
ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली—
“आई, बघा ना, आता मीही काहीतरी करू शकते.”
निवेदिता दिवसभर शाळेत, रात्री प्रूफरीडिंग.
घराची परिस्थिती सुधारली, पण अतुलच्या मनात अजूनही न्यूनगंड.
त्याच्या मनात प्रेमाऐवजी तिच्याबद्दल आदर वाढत चालला होता.
एका रात्री निवेदिताने हलक्या आवाजात म्हटलं—
“ तुम्ही हे प्रूफ वाचणं सोडा आता. पैसे कमी नाहीत आता.”
“ तुम्ही हे प्रूफ वाचणं सोडा आता. पैसे कमी नाहीत आता.”
अतुल म्हणाला—
“पण सवय झाली आहे. न वाचता झोप येत नाही.”
“पण सवय झाली आहे. न वाचता झोप येत नाही.”
ती हसून म्हणाली—
“मग त्या वेळेत थोडं तुमचं अभ्यासाचं वाचणं करा. अर्चनाचं कॉलेज सुरू झालं, तुम्हीही इंटरचं फॉर्म भरून टाका. प्रयत्न करून पाहा ना.”
“मग त्या वेळेत थोडं तुमचं अभ्यासाचं वाचणं करा. अर्चनाचं कॉलेज सुरू झालं, तुम्हीही इंटरचं फॉर्म भरून टाका. प्रयत्न करून पाहा ना.”
अतुल थबकला.
“आता कुठं होईल अभ्यास? एवढ्या वर्षांनी...”
“आता कुठं होईल अभ्यास? एवढ्या वर्षांनी...”
“मी आहे ना. शिकवते तुम्हाला. कठीण काही नाही.”
तीच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहून अतुलचं मन ढासळलं.
त्याने फॉर्म भरला.
सुरुवातीला घाबरला , पण निवेदितानं विषय अगदी सोप्या भाषेत समजावले.
हळूहळू त्याचं मन लागलं.
त्याने फॉर्म भरला.
सुरुवातीला घाबरला , पण निवेदितानं विषय अगदी सोप्या भाषेत समजावले.
हळूहळू त्याचं मन लागलं.
इंटर पास झाला — दुसऱ्या श्रेणीत का होईना, पण झाला.
मग बी.ए. मध्ये प्रवेश घेतला.
अतुल आता आत्मविश्वासाने भरला होता.
बी. ए.प्रथम श्रेणीत पास झाला होता.
मग बी.ए. मध्ये प्रवेश घेतला.
अतुल आता आत्मविश्वासाने भरला होता.
बी. ए.प्रथम श्रेणीत पास झाला होता.
कुमुदिनी बाई चकित —
“ज्याला शिकवून शिकवून कंटाळलो, तो आता पहिल्या नंबराने परीक्षा पास करतो!”
“ज्याला शिकवून शिकवून कंटाळलो, तो आता पहिल्या नंबराने परीक्षा पास करतो!”
काही वर्षांनी अतुलनं एम.ए. (हिंदी) केलं.
आता त्याला निवेदिताची मदत कमी लागतं होती,पण तिचं प्रेरणाचं बळ त्याच्या मनात होतंच.
आता त्याला निवेदिताची मदत कमी लागतं होती,पण तिचं प्रेरणाचं बळ त्याच्या मनात होतंच.
एका दिवशी निकाल लागला.
अतुल दार ठोठावत आत आला. निवेदिता झाडू मारत होती.
तो आनंदाने ओरडला,
“निवेदिता! प्रथम श्रेणी, दुसरं स्थान!”
अतुल दार ठोठावत आत आला. निवेदिता झाडू मारत होती.
तो आनंदाने ओरडला,
“निवेदिता! प्रथम श्रेणी, दुसरं स्थान!”
आणि बातमीपत्र तिच्याकडे फेकतच तिला दोन्ही हातांनी उचललं.
त्याच्या डोळ्यात अभिमान, चेहऱ्यावर आनंद.
“आज मी कुणाच्याही बरोबरीचा झालो!”
त्याच्या डोळ्यात अभिमान, चेहऱ्यावर आनंद.
“आज मी कुणाच्याही बरोबरीचा झालो!”
निवेदिताच्या डोळ्यांत पाणी आलं.
आज पहिल्यांदा तिला तिचा नवरा, तिचं प्रेम, तिचं स्थान मिळालं होतं —
एक माणूस म्हणून, जो आता तिच्यापेक्षा कमी नव्हता,
तर तिच्यासोबत होता.
आज पहिल्यांदा तिला तिचा नवरा, तिचं प्रेम, तिचं स्थान मिळालं होतं —
एक माणूस म्हणून, जो आता तिच्यापेक्षा कमी नव्हता,
तर तिच्यासोबत होता.
ती हसली. ओठांवर एक हलकं, सुखाचं हास्य.
'स्त्री आपल्या समजूतदारीनीं काही पण घडवू शकते. फक्त मनात इच्छाशक्ती पाहिजे.'
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा