Login

सापांची माहिती भाग 1

सपांविषयी माहिती
सापांचे अस्तित्व डायनासोउरच्या आधीच्या काळापासून आहे,असे म्हणतात. साप हा धरती वर १३० मिलियन वर्षापासुन आहे. जगभरात सापांच्या सुमारे अडीच हजार जाती आहेत. त्यातमध्ये भारतात 3४० जाती आढळतात. त्यांपैकी फक्त ६९ जाती या विषारी आहेत. भारतात प्रामुख्याने मानवी वस्तीत आढळणारे चार प्रमुख विषारी साप आहेत ते पुढीप्रमाणे,
१) नाग
२) मण्यार
३)घोणस
४) फुरसे घोणस सापाच्या दंशामुळे भारतात सर्वाधिक लोक मरतात. बिनविषारी जातीचे साप पुढीलप्रमाणे,
१)अजगर
२)तस्कर
३)कवड्या
४)पानदिवड
५)धामण
६)गवत्या
७)धुळ नागीन
८)डुरक्‍या घोणस
९)मांडोळ
१०)कुकरी
११)पिवळ्या ठिपक्‍यांचा कवड्या
जगभरात सापांच्या विषांवराती निव्वळ एकमात्र उपाय म्हणजे सापाचे प्रतिविष. ह्या व्यतिरिक्त सर्प दंशावर दुसरा कोणताही उपाय नाही.
विषारी साप यांचं विष हे धोकादायक व प्राणघातक असते. साप हे त्यांच्या रंग , आकार, आणि शरीररचना यावरून ओळखता येते. त्यांच्या शरीरावरील उभे पट्टे, आडवे पट्टे, ठिपके, धब्बे, डोके यांवरून फरक करता येतो. विषारी / बिनविषारी साप ओळखण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे विषारी साप ओळखणे कारण यांच्या जाती फार कमी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ४ जाती आहेत हे आपणास माहित आहे. ते म्हणजे नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे आहेत. बिन विषारी सापांपैकी काही साप या चार विषारी सापांसारखेच दिसतात. त्यामध्ये प्रामुख्याने उदा: १)कवड्या (common wolf snake) आणि मण्यार (common krait snake)
कवड्या हा साप तसा बिनविषारी परंतु दिसायला एकदम मण्यार सापा सारखा. कवड्या साप बहुतेक वेळा घरामध्ये दिसतो. हाच असा साप आहे की जो उभ्या भिंतीवर एकदम आरामात चढू शकतो.
२) अजगर(indian rock python) आणि घोणस (Russel's viper)
अजगर हा विषारी नाही पण त्या समान दिसणारा घोणस हा साप अतिशय विषारी असतो. या दोघांमधील फरक नीट समजून घेणे गरजेचे आहे.
३) काळतोंडया (Dumeril's black headed snake) आणी पोवळा (slender coral snake)पोवळा साप हा तसा दुर्मिळ झाला आहे आणि तो निशाचर असल्या मुळे सहसा दिसत नाही. पोवळा हा विषारी तर काळ तोंड्या हा बिनविषारी साप आहे.
कोणता साप विषारी आणि बिनविषारी आहे याची ओळख असेल तरी सुद्धा कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू नये.
Snake ज्यांना साप असे म्हणूनही ओळखले जाते, ते हातपाय नसलेले असतात आणि लांब, लांबलचक शरीर आणि शेपूट नसलेले सरपटणारे प्राणी असतात.सापांच्या ३,४०० हून अधिक प्रजाती आहेत. साप हे स्क्वामाटा या क्रमाने सरडे या प्रजातीचे आहेत आणि उत्क्रांतीच्या काळात संरचनात्मक घट, साधेपणा आणि तोटा तसेच स्पेशलायझेशन झालेल्या सरड्याचे ते प्रतिनिधित्व करतात. जरी सर्व साप बाह्य अवयव नसलेले असले तरी सर्व पाय नसलेले सरपटणारे प्राणी साप नसतात.काही सरड्यांना फक्त पुढचे किंवा मागचे हातपाय असू शकतात किंवा ते पूर्णपणे पाय नसलेले असू शकतात. सरड्यांच्या विपरीत, सापांना हलवण्यायोग्य पापण्या नसतात, ज्यामुळे ते अस्वस्थपणे टक लावून पाहतात. सापांनाही बाह्य कान नसतात. त्यांनी त्यांचे मूत्राशय आतून गमावले आहे. तर सापांच्या आंतड्याचे अवयव लांबलचक असतात, उजव्या भागाच्या तुलनेत डावा सदस्य संकुचित होतो; डावे फुफ्फुस पूर्णपणे हरवले नाही तर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. दुसरीकडे, सापांमध्ये इतर कशेरुकांपेक्षा अधिक कशेरुक असतात आणि त्यांनी दोन नवीनता निर्माण केल्या आहेत: मानेच्या भागात एक श्वासनलिका फुफ्फुस आणि शिकार वश करण्यासाठी विष-वाहक प्रणाली.
साप आपल्या घरात येऊ नये म्हणून उपाय पुढीप्रमाणे आहेत.सापाला घरापासून दूर ठेवण्यासाठी केरोसिनचाही वापर केला जातो. रॉकेलमध्ये कापड भिजवून ते कापड घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवावे. तसेच घराच्या आजूबाजूला देखील आपण रॉकेल शिंपडू शकता. रॉकेलचा वास सापांना सहन होत नाही त्यामुळे ते घरामध्ये येणार नाहीत. त्याच बरोबर घरामध्ये लहान मोठी छिद्रे तसेच भिंतींमध्ये फटी असल्यास त्या वेळेवर बुजवून घ्याव्यात. घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण ठेवू नये. जर घरामध्ये एखादे अडगळीचे ठिकाण असेल तर त्याचे सतत लक्ष दयावे व बारकाईने निरीक्षण करावे. घरामध्ये लहान मोठे पाळीव प्राणी असतील तर त्यांच्या पिंजऱ्या कढे लक्ष द्यावे. कारण लहान पक्षी सापांचे भक्ष असते. जर कधी घरात एखादा साप आपल्या निदर्शनास आला तर अरडा ओरड न करता, घरातील सर्व माणसे बाहेर काढावीत. शक्य असेल तर लवकरात लवकर जवळील सर्प मित्रांना बोलवावे. नाहीतर साप जेथे असेल तेथे रॉकेल शिंपडावे. स्वतः सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नये. साप आपल्याला चावू शकतो. आणि ते आपल्या जीवावर देखील बेतू शकते. तसेच सापाला मारण्याचा देखील प्रयत्न करू नये, सापाला ही आपल्या इतकाच जगण्याचा अधिकार आहे.


सर्प दंशा वरील काही प्रथोपचार
१)सर्पदंशामुळे अनेक जण घाबरतात हे आपणास माहीत आहे, पण अशा परिस्थितीत कोणास घाबरण्याची अजिबात गरज नाही. जरा शांत झाल्यावर सर्वप्रथम तुमच्या कुटुंबीयांना कळवा. सापाच्या चावलेल्या भागात सूज येताच प्रथम अंगठी किंवा घड्याळ यांसारख्या वस्तू काढून टाका.
२)ज्या ठिकाणी साप चावतो तो भाग साबणाने आणि पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा. नंतर ते भाग स्वच्छ कापडाने झाकून टाका. साप चावलेल्या भागावर कोणतेही घाणेरडे कापड बांधू नका.
३)साप चावल्यानंतर या गोष्टी अजिबात करू नका
साप चावल्यानंतर त्याला अजिबात उचलू नका किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका.
४)साप चावल्यानंतर लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका, ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.
५)जखम कधीही चाकूने कापू नका. यामुळे तुमची समस्या वाढू शकते
बरेच लोकं साप चावल्यानंतर विष शोषण्याचा प्रयत्न करतात, तथापि, असे कधीही करू नये.
६)असे मानले जाते की साप चावल्यावर जखमेवर बर्फ लावला जातो, परंतु असे कधीही करू नका.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जवळील प्रथमोपचार केंद्र किंवा ज्या दवाखान्यात सापांच्या विषावर लसी उपलब्ध आहेत तेथे लवकरात लवकर जावे.
सापांचे प्रमुख अन्न पुढीप्रमाणे आहे.सापांना मेलेले भक्ष्य खाणे आवडत नाही. उंदीर, घुशी, सरडे, पाली, बेडूक इ. सापांचे अन्न आहे. पाणसाप बेडूक व मासे खातात. काही साप झाडावरील घरट्यांमध्ये असलेली पक्ष्यांची अंडी खातात. सापांच्या तोंडाच्या विशिष्ट रचनेमुळे ते स्वतःपेक्षा मोठ्या आकारमानाचे प्राणीही गिळू शकतात. नाग व घोणस यांसारखे विषारी साप भक्ष्याला पकडतात, त्यास दंश करून ठार मारतात. धामण व पाणसाप भक्ष्य पकडतात आणि ते जिवंत असतानाच गिळून टाकतात. ते डोक्याकडून भक्ष्य गिळतात. अजगरासारखे बिनविषारी साप दबा धरून बसतात. भक्ष्य जवळ आले की, त्यावर झडप घालून पकडतात आणि त्याच्याभोवती घट्ट वेटोळे घालून त्यास ठार मारतात. सापाला एकदा अन्न मिळाले की, त्याला काही दिवस अन्नाची गरज भासत नाही. काही साप अन्नपाण्याशिवाय कित्येक महिने जिवंत राहू शकतात. नागराज व मण्यार हे इतर सापांनादेखील अन्न म्हणून खातात.
देवरस भारतात एकूण २७२ सापांच्या जाती आढळतात त्यातील बहुतांशी म्हणजे २१२ जाती बिनविषारी आहेत. अजगर, धामण, तस्कर, गवत्या, दिवड, नानेटी, धुळ नागीण, पहाडी तस्कर असे काही बिनविषारी साप आहे. साप साधारणपणे 3 ते 5 वर्षे जगतो. साप जीभेने वास घेतात.
घरात साप आढळणे, अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ आपल्याला धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत. अशी काही लोकांची मान्यता आहे. सापांचे कान सामान्य प्राण्यांसारखे नसतात. सापांना बाहेरून स्पष्टपणे न दिसणारे शरीराच्या अंतर्गत कान असतात. साप आणि मुंगुस यांचे वैर तर आपणास ठाऊक आहे.सापाचे विष मुंगुसास भिनले, तर मुंगुस एका विशिष्ट प्रकारच्या (मुंगूसवेल) झाडाची मुळे खाते व यामुळे या विषाचा काही परिणाम होत नाही, परंतू मुंगुस जर सापाला चावला तर काही वेळातच साप मरण पावतो. अशी लोकांची एक समजूत आहे.