Login

सापांविषयी माहिती भाग 2

सापांविषयी माहिती
भारतात सापांविषयी खुप साऱ्या अंधश्रद्धा आणि अफवा आहेत. ज्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत. त्यापुढील प्रमाणे आहेत.
१) साप हा दूध पितो. परंतु साप हा कधीच दूध पित नाही.
२) नागपंचमीला नागाची पुजा केली जाते. आणि नागाच्या वारुळात दूध टाकतात व त्याची नेवेद्य दाखवून पूजा अर्चा करतात. जर ही पूजा केली नाही तर नागदेवताची आपल्यावर अवकृपा होते.
३)जर एखाद्या सापाला किंव्हा नागाला आपण चकुन मारल्यास त्याला लगेच जाळून टाकावे. कारण त्या मेलेल्या सापाचा जोडीदार त्याला शोधत येतो व त्या मेलेल्या सापाच्या डोळ्यांनमध्ये त्याला मारणाऱ्या माणसाचा चेहरा दिसतो. आणि मग त्या मेलेल्या सापाचा जोडीदार त्याला मारणाऱ्या माणसाचा बदला घेतो. व त्या माणसाला दंश करुन मारून टाकतो.
४) गारुडी या जमातीचे लोक त्यांच्या उदरनिर्वाहासाठी साप पकडतात आणि पाळतात. त्यां सापांना एका बंद टोपलीत ठेवतात. सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे हे गारुडी लोक त्या सापांचे दात काढतात.जागोजागी जाऊन ते पुंगी वाजावून खेळ करतात व असे दर्शवतात की साप हा त्यांच्या पुंगीच्या आवाजावर डुलतो. परंतु सापाला ऐकू येत नाही तर तो त्या पूंगीच्या हालचालींवर डुलतो.
५) नागांचे एक वेगळे जग असते त्याला नागलोक असे म्हणतात. व तेथे नागांचे राजा राणी देखील असतात.
६) इच्छाधारी नाग नागीण असतात. व ते नागाच्या रूपातून कधीही कोणत्याही माणसाचे रूप घेतात. आणि त्यांच्या नागलोकातून मनुष्यलोकात वास्तव्य करतात.
७) असे म्हणतात की नागांच्या राजा व राणी यांच्या डोक्यावर नागमनी नावाचे अत्यंत मौल्यवान असे रत्न असते. हे रत्न ज्यां मानवास मिळते त्याला पाहिजे ते मिळवता येते.
म्हणुन काही अंधश्रद्धाळू लोक नागमानीच्या मोहासाठी अनेक नागांचा जीव घेतात.
अशा प्रकारच्या काही गैरसमजुती भारतात आहेत.आणि याच गैरसमजुतींवर भारतात अनेक चित्रपट देखील बनविलेले आहेत. जे भारतीय लोक आवडीने पाहतात.
जगातील दोन लहान देश आइसलँड तथा अंटार्टिका मध्ये साप आढळत नाहीत. कारण या देशांमध्ये सर्वात जास्त थंडी आढळते. जगभरामध्ये दरवर्षी सापा द्वारे एक लाख लोक मरण पावतात. भारतामध्ये हा आकडा प्रत्येक वर्षी जवळजवळ २.५० लाख लोकांना साप चावतो. ज्यामधील जवळ जवळ पन्नास हजार लोकांचा मृत्यू होतो. परंतु सरासरी आकडा हा २०हजाराचा आहे. जगातील कोणताही साप आपण त्याला त्रास दिल्याशिवाय चावत नाही. साप चावण्याच्या जास्त करून घटना या त्याच्यावर नजरचुकीने पाय पडल्यामुळे होतात. जगातील सर्वात लांब साप पायथन रेतिकुलटेस हा होता जो जवळजवळ तीस फूट लांब होता. साप कधीही कोणत्याही गोष्टीला चावून खात नाही. तो सरळ गिळतो. जगभरामध्ये साप लहान किडे, पक्षी, उंदीर आणि आपल्यापेक्षा छोट्या सापांना खातो. आफ्रिकेमध्ये अनेक अजगर आढळतात. हे अजगर छोटी गाय सुद्धा गिळू शकतात. नॅशनल जिओग्राफिक च्या अनुसार साप एका वेळी आपल्या स्वतःपेक्षा ७०ते १०० पटीने मोठ्या शिकार्‍याला गिळू शकतात.
साप आपल्या जबड्याचा खालचा भाग जमिनीला लावून जमिनीमध्ये चालणाऱ्या तरंगांची हालचाल समजून घेतो. ज्यामुळे भूकंप, त्सुनामी अशा विनाशकारी तूफान विषयी त्याला आधी माहीती होते. पाण्यामध्ये राहणारे साप आपल्या त्वचेद्वारे श्वास श्वास घेऊ शकतात. ज्यामुळे ते शिकाऱ्याच्या शोधामध्ये पाण्यामध्ये उशिरापर्यंत राहू शकतात. सापांना पाण्याचीसुद्धा जास्त गरज नसते. ते आपल्या शिकार पासूनच पाणी प्राप्त करतात. काही साप खूप दिवसापर्यंत भुकेलेले सुद्धा राहू शकतात. जसे की किंग कोब्रा काहीही न खाता काही महिने जिवंत राहू शकतो. साप आपल्या नाका पासूनच नाही तर जिभे पासून सुद्धा श्वास घेऊ शकतो. तो आपल्या जीभेने आपल्या आसपासचे वातावरण कसे आहे हे सुद्धा जाणून घेऊ शकतो. साप वर्षांमध्ये कमीतकमी तीन वेळेस आपल्या शरीरावरील कातडी काढून टाकतो.
दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळणाऱ्या हॉर्नड वाइपर या सापाच्या डोक्यावर दोन शिंग असतात.जगातील ७० टक्के सापांच्या प्रजाती या अंडी देतात. बाकीचे ३० टक्के प्रजाती पिल्लांना जन्म देतात. सापाला कोणताच आवाज ऐकू येत नाही. साप हा बहिरा असतो. हवे मध्ये निर्माण होणाऱ्या ध्वनी तरंगांचा सापावर काही प्रभाव पडत नाही. पुंगी चा आवाज ऐकून साप येणे हा लोकांचा एक भ्रम आहे. वाघासारख्या भयंकर प्राण्याला सुद्धा आपण थोडीशी ट्रेनिंग देऊन त्याला काहीही शिकवू शकतो. परंतु आपण सापाला कधीही काहीच शिकवू शकत नाही. का गं सापाच्या डोक्यामध्ये इतर सजीवांप्रमाणे सेरीब्रल हेमिस्पियर नसते. मेंदूचा हाच भाग शिकण्याच्या क्रियेवर नियंत्रण करू शकतो.
हिरवा ॲनाकोंडा सर्वात लांब साप नाही. परंतु हा सर्वात वजनदार साप असतो. हा साप ५५० पौंड पर्यंत असू शकतो. ब्राझील मध्ये स्थित आयलँड, सापांची सर्वात जास्त संख्या असणारी जागा आहे. येथे प्रत्येक वर्ग मीटर मध्ये पाच साप राहतात. म्हणजेच आपल्या सिंगल बेड च्या जागी १० साप आणि डबल बेड च्या ठिकाणी वीस साप राहू शकतात. तेही विषारी गोल्डन विट वायपर.किंग कोब्रा हा विषारी सापांमध्ये सर्वात लांब साप असतो. साधारणपणे याची लांबी १८ फुटापर्यंत असते. याचं विश इतकं खतरनाक असतं की, याच्या ७ मिली मात्रेमध्ये २०माणसे आणि १ हत्ती मरु शकतो.
सापाविषयी काही रोचक तथ्य आहेत ते पुढीप्रमाणे आफ्रिकेमध्ये आढळणारा ब्लॅक मांबा स्नेक (Black Mamba Snake) हा साक्षात यमराज म्हणून ओळखला जाणारा साप आहे. कारण याच्या चावण्याने जवळजवळ ९५ टक्के लोकांचा मृत्यू होतो. जर कधी आपल्या मागे साप लागला असेल तर, कधीही एकाच रेषेत धावू नका. असे धावल्याने तो आपल्यापर्यंत लगेच पोहोचू शकेल. साप कधीही एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला चावत नाही. कारण सापाचा जास्तीत जास्त धावण्याचा वेग सात किलोमीटर प्रति तास असतो. एखाद्या मृत सापाचे डोके सुद्धा आपल्याला चावू शकते. म्हणजेच त्याच्या मृत्यूच्या एक तासानंतर सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये प्राण असतो.
जगभरामध्ये विषारी सापांच्या जवळ-जवळ ७२५ प्रजाती आहेत. त्यामधील २५० प्रजाती फक्त एका वेळी चावल्याने मानवाचा मृत्यू होऊ शकतो. जगातील सर्वात विषारी पाच साप हे आहेत: अंतर्देशीय टाईपान, पूर्वी ब्राउन साप, तटीय टाईपान, वाघ साप आणि काळा वाघ साप.काही सापांमध्ये २०० पेक्षा जास्त दात असतात. परंतु ते त्याचा वापर चावण्यासाठी करत नाहीत. स्वतःच्या चुकीने साप जर कधी स्वतःला चावला तर त्याचा सुद्धा मृत्यू होऊ शकतो.सर्वात दुर्लभ आणि लुप्त होणारा साप सेंट लूसिया रेसर हा आहे. या प्रजातीचे फक्त १८ते १०० साप आहेत.प्रजाती नुसार साप ४ ते २५ वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात.
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार माणूस सापांना भीत असल्यामुळेच जास्त करून साप आपल्याला चावतो. मानवाला सापाची जी भीती वाटते त्याला Ophiophobia म्हणतात. सापाचे शरीर जितके उष्ण असेल तितकेच तो आपल्या शिकार ला सहजपणे पचवू शकतो. साधारणपणे सापाला आपले भोजन पचवण्यासाठी तीन ते पाच दिवस लागतात.ॲनाकोंडा सारख्या सापाला आपले भोजन पचवण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने सुद्धा लागू शकतात. जगामध्ये ॲनाकोंडा सापाची पचनक्रिया सर्वात हळू आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ॲनाकोंडा साप माणसाची सुद्धा शिकार करू शकतो. माणसाबरोबर असतो हरीण, कोल्हा यांना सुद्धा गिळू शकतो. साप हा मांसाहारी प्राण्यांच्या श्रेणीमध्ये येणारा जीव आहे. त्याच्या डोळ्यावर पापण्या नसतात. सापाची त्वचा ही चमकदार आणि कोरडी असते. साप आपले डोळे उघडे ठेवून झोपतो. कारण सापांना पापण्या नसतात.
किंग कोब्रा या सापाला सर्वात बुद्धिमान साप म्हणून ओळखतात. साप आपले तोंड १५० डिग्री पर्यंत उघडू शकतो.इंडीयन पायथन या सापाच्या विषामध्ये एकावेळेस ८० लोकांना मारण्याची क्षमता असते. साप चावल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा साप चावण्याच्या भीतीने मरणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. सापाच्या हवेमध्ये उडणार्‍या प्रजाती सुद्धा आढळतात. जे एक दुसऱ्या झाडावर उडी मारू शकतात. साप हा जीव माणसाप्रमाणे उलट्या सुद्धा करू शकतो. साप नेहमी त्याला धोका जाणवू लागल्यास उलट्या करतो. ज्यामुळे त्याच्या शरीराचे वजन कमी होते आणि तो वेगाने धावू शकतो. Leptotyphlops Carle हा जगातील सर्वात लहान साप आहे. ज्याचा आकार साधारणपणे चार ते पाच इंच असतो माझा साप नर सापाच्या तुलनेने मोठा असतो. सापाच्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार वाढते किंवा कमी होते. जगामध्ये सापाच्या अशाही अनेक प्रजाती आहेत ज्यांना दोन डोकी असतात. साप जगाच्या कानाकोपऱ्यात आढळतात परंतु सापांना थंड अजिबात आवडत नाही. सापाचा जबडा हा लवचिक असतो त्यामुळे तो कितीही मोठी शिकार सहजपणे आपल्या शरीरामध्ये गिळू शकतो.