Login

सोबतीने चालू, सख्या

चंद्राच्या शीतल प्रकाशात सोबतीने सख्या सोबत चालण्यास सांगणारी कविता

सोबतीने चालू, सख्या

चंद्राचा शीतल प्रकाश 
चांदण चुऱ्याची वाट 
सोबतीने चालू सख्या
घेऊन हाती हात 

नभातल्या चंद्राला 
न्याहाळत चालू 
प्रीतीच्या गुजगोष्टी 
एकमेकांच्या कानी घालू 

सावल्याही मागे 
चालू लागल्या 
चंद्राला पाहून चांदण्या 
सुखावून गेल्या 

ही रात चंद्र ताऱ्यांची 
संपूच नये वाटते 
तुझ्या सोबतीने, सख्या  
सुखी संसार थाटते

©️ जयश्री शिंदे