सोडी सोन्याचा पिंजरा भाग तीन

ती सोनेरी चौकट आता तिला सोन्याच्या पिंजरा वाटू लागली

सोनेरी चौकट

भाग तीन
*सोडी सोन्याचा पिंजरा *

*नूपुर ला सगळ्याच गोष्टी अचंबित करणार्या होत्या , तिला अजून नृत्य कलेत विषारद करायचे होते, स्वतः चा एक स्वतंत्र क्लास काढायची इच्छा होती त्याहून पुढे अजून बरेच काही करायचे होते.

पण हे मधेच लग्न? तिआपल्या मनातलं सीमा जवळ बोलली.

आपण बोलू त्यांच्या शी राकेश म्हणाले.

पेडणेकर आले त्याच्या बरोबर निनाद ची आजी आणि निनाद.
तिच्या नृत्य कलेचे कौतुक करत ते म्हणाले हो,हो तुला नृत्य सोडायची काही गरज नाही.

पुढच्या गोष्टी भराभर घडल्या, नुपूरला एखादा सिनेमा पाहत आहे असेच वाटले निनाद ला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली .उंच पुरी देहयष्टी, गहिरे डोळे, शिक्षणाच तेज आणि बोलण्यातली अदब, मुख्य म्हणजे सर्वांनी तिच्या नृत्य कलेचे खूप कौतुक केले. घरच्यांना सर्वांना निनाद पसंत पडला आणि नुपूर ने पेडणेकरांची सून म्हणून गृहप्रवेश केला….

अचानक निनाद ने खोलीत प्रवेश केला “नूपुर अग बाळं रडतंय कसला विचार करते आहे लक्ष कुठे आहे?
नूपुर आठवणीतून बाहेर आली.


बरेच बदल होत होत नूपुर ची तब्येत पूर्वीसारखी झाली. तिला आता नुसतं बसून राहणे कठीण झाले. तिने ठरवलं आता परत नृत्या साठी वेळ द्यायचा
ती क्लासला जायला लागली.
‌एक दिवस मेघना चा तिला फोन “आंतरदेशीय डान्स स्पर्धा दोन महिन्यांने “
तिने निनाद घ्या कानांवर स्पर्धेत भाग घेत असल्याचे सांगितले.
त्याने ही परमिशन दिली.आता नूपुर ने नियमित सराव सुरू केला रोज दोन तीन तास ती डान्स क्लासला जात असे.
स्पर्धा दहा दिवसा वर आली
एक दिवस रात्रीचे जेवताना तिने घरातल्या सर्वांना ती स्पर्धेत भाग घेत असल्याचे सांगितले.त्यात ती जिंकली तर विदेशात परफारमन्स करायला जावे लागेल.

निनाद चे बाबा म्हणाले “आता निवडणुकीचे वारे वाहत आहे यंदा आम्हाला तिकीट मिळणार आहे आम्हाला जिंकायच आहे तेव्हा तुमची छबी एका घरंदाज सुनबाई सारखी दिसायला हवी. तेव्हा आता हे नाच गाणं थोडे दिवस थांबवा” अशी साखर पेरणी करत गोड शब्दात ताकिद दिली.
सासुबाई पण म्हणाल्या आम्ही ह्यांच्या बरोबर प्रचारासाठी फिरणार मग घराकडे लक्ष देणार कोणीतरी हवं ना तेव्हा ही तुमचीच जवाबदारी
आणखी बाळाला कुठे ठेवणार?
आणि आता निनाद सोबत तुम्ही पण आपल्या बिझनेस मधे लक्ष द्या.

हे सर्व ऐकून नूपुर अस्वस्थ झाली. तिने निनाद कडे आशेने पाहिलं पण तो ही काही बोलला नाही.

ती उदास मनाने खोलीत आली.
आता खरंतर तिला आपल्या नृत्य कलेला अजून वेळ द्यायचा होता कारण तिने स्पर्धेत भाग घेतला होता पण आता हे काय होऊन बसले? आता माघार घ्यायची तेही खोट्या प्रतिष्ठेसाठी? बाळाला ती आई कडे ठेवून जाणार होती. काही दिवसांचा प्रश्न होता.आता नाही कळवले तर काय म्हणतिल संयोजक?

समोर भिंतीवर लावलेली ती फ्रेम त्याची ती सोनेरी चौकट तिला आता” सोन्याच्या पिंजऱ्यासारखी” वाटू लागली. तिची नृत्यकला तिचे पॅशन, लहानपणापासून इतकी मेहनत करून वाढवलेली तिची कला सोडून आदर्श सुनेचा खोटा मुखवटा चढवायचा?
पायातले चाळ काढूनखोट्या प्रतिष्ठे च्या बेड्या घातल्या आहे असे वाटून तिच्या डोळ्यात पाणी आले..

निराशेच्या भरात तिने ती फ्रेम भिंतीवरनं काढली. त्यातली प्रशस्तीपत्र तिच्या नृत्य कलेचे जिवंत उदाहरण तिने त्या चौकटीतून बाहेर काढले त्या क्षणी तिला असे वाटले ती सोनेरी चौकट नसून सोन्याच्या पिंजरा आहे आणी ते प्रशस्तीपत्र म्हणजे एक पक्षी , जणू पिंजऱ्यातला बंदिस्त पक्षी ती स्वतः आहे.. त्या प्रशस्ती पत्राला डोळ्यांना लावून तिने पेटीतठेवलं आणि .

ती” सोनेरी चौकट” तिने पलंगाखाली भिरकावून दिली व फोन उचलून स्पर्धेच्या आयोजकांना ती येत असल्याचे कळवले. ..
—-----------++--------------------------------
समाप्त
लेखिका.. सौ प्रतिभा परांजपे