भाग-१
आर्यन एक शांत, अंतर्मुख, स्वतःच्या विचारांत हरवलेला मुलगा. मुंबईच्या धावपळीच्या जीवनातही त्याचं जगणं वेगळंच होतं. लोकलच्या गर्दीत त्याचा एक ठरलेला कोपरा होता खिडकीजवळ. तिथून बाहेर पाहत, त्याचं मन एक वेगळी दुनिया शोधायचं. आयुष्यावर त्याचे स्वतःचेच प्रश्न होते आणि काही उत्तरं तो अजूनही शोधत होता.

मयुरी अगदी विरुद्ध स्वभावाची. उत्साही, खळखळून बोलणारी, आणि छोट्या छोट्या गोष्टींत जीव ओतणारी. तिच्या डोळ्यांत एक झळाळी होती, जिच्याशी नजर भिडली की काळाचं भान राहत नसे.
त्या पावसाळी सकाळी, ट्रेन गर्दीने फुलून गेलेली. खिडकीबाहेर धूसर मुंबई, अंगावर शहारा आणणारा वारा. स्टेशनवर धावत येणारी मयुरी, दार बंद होण्याच्या क्षणाला आत शिरते. तिची पर्स खांद्यावरून सरकते आणि खाली पडते.
आर्यन जवळच उभा असल्यामुळे तो वाकून, ती पर्स उचलतो आणि मयुरीच्या हातात देतो.
“थँक्स!” तिचं खळखळून हसणं थेट त्याच्या शांत मनाच्या दारावर टक टक करत होते.
“थँक्स!” तिचं खळखळून हसणं थेट त्याच्या शांत मनाच्या दारावर टक टक करत होते.
त्या काही सेकंदांत त्याच्या डोळ्यांत एक अनामिक शांतता होती पण त्याचवेळी ती शांतता काहीतरी लपवत होती मयुरीला जाणवलं, पण काय ते कळलं नाही.
पुढचे काही दिवस त्या दोघांसाठी एक अनोख्या सवयीसारखे झाले होते. रोज सकाळच्या किंवा संध्याकाळच्या लोकलमध्ये त्यांची नजरानजर व्हायची. आधी फक्त एक हलकं हसणं, मग संकोचाने फक्त "हाय", "हॅलो", आणि हळूहळू... एक सवय झाली – एकमेकांना शोधण्याची.

एक दिवस पावसाने अचानक आपलं रूप उघडलं. मयुरीकडे छत्री नव्हती. आर्यनने हातातली छत्री पुढे करत विचारलं,
"सोबत येऊ का?"
ती क्षणभर थांबली, मग हलकंसं हसून मान हलवली.
त्या छत्रीखाली त्यांचं पहिल्यांदा एकत्र असणं, अगदी जणू काळाने क्षणभर थांबावं आणि त्यांच्यासाठी ती पावसाची वेळ श्वास घेऊ लागावी.
"सोबत येऊ का?"
ती क्षणभर थांबली, मग हलकंसं हसून मान हलवली.
त्या छत्रीखाली त्यांचं पहिल्यांदा एकत्र असणं, अगदी जणू काळाने क्षणभर थांबावं आणि त्यांच्यासाठी ती पावसाची वेळ श्वास घेऊ लागावी.
त्या दिवसानंतर संध्याकाळच्या चहाचे कप दोघांसाठी समान झाले. स्टेशनजवळच्या छोट्याशा टपरीवर उभं राहून ते एकत्र चहा घेत, न बोलता खूप काही बोलून जायचे. मयुरीचा हसरा चेहरा, आणि आर्यनचं गूढ, खोल पाहणं त्या क्षणांना अर्थ द्यायचं काम त्यांचं नव्हेच, ते क्षणच स्वतः अर्थपूर्ण होते.
आर्यन फारसं बोलत नसे. पण त्याच्या डोळ्यांत एक अनोखी शांतता, आणि त्याहीपेक्षा खोल एक लपवलेला भाव.
मयुरी त्या नजरेत बघायची, आणि तिला जाणवायचं काहीतरी आहे. काहीतरी भूतकाळातलं, जे आर्यन लपवतोय.
जणू त्याच्या डोळ्यांत काही न सांगितलेली गोष्ट अडकून बसली आहे जी शब्दांत न येता नुसत्या नजरेतून बोलते.
मयुरी त्या नजरेत बघायची, आणि तिला जाणवायचं काहीतरी आहे. काहीतरी भूतकाळातलं, जे आर्यन लपवतोय.
जणू त्याच्या डोळ्यांत काही न सांगितलेली गोष्ट अडकून बसली आहे जी शब्दांत न येता नुसत्या नजरेतून बोलते.
त्या दोघांच्या नात्याला आजवर कोणताही ठराविक टॅग नव्हता. ना मैत्री म्हणता यायचं, ना प्रेम. पण त्याच्या अनुपस्थितीत तिच्या आयुष्यात जणू एखादं अव्यक्त गूढ दाटून यायचं… ती जागा जिथे तो असायचा, तिथे आता एक अनामिक शांतता राहायची. हृदयाच्या कोपऱ्यात, नकळत त्याचं अस्तित्व साचून राहिलं होतं.
त्या दिवशी सकाळी ट्रेनमधून तिच्या नजरा सारख्याच खिडकीकडे वळत होत्या पण आज ती रिकामी होती.
क्षणभर तिला काहीतरी विचित्र जाणवलं.
मन थोडं बेचैन झालं.
ती फोनकडे पाहत म्हणाली:
मन थोडं बेचैन झालं.
ती फोनकडे पाहत म्हणाली:
“आज नाहीस ट्रेनमध्ये?”
मेसेज टाकल्यानंतर काही क्षण मोबाइलवर नजर रोखून ठेवली होती, पण तिचं मन त्या दोन शब्दांच्या उत्तराच्या पलीकडे काहीतरी शोधू लागलं
मेसेज टाकल्यानंतर काही क्षण मोबाइलवर नजर रोखून ठेवली होती, पण तिचं मन त्या दोन शब्दांच्या उत्तराच्या पलीकडे काहीतरी शोधू लागलं
“नाही… उद्या भेटतो.”
त्याचं उत्तर थोडकं, पण धूसर होतं. जणू काही शब्दांमागे काही न सांगितलेलं सत्य दडलं होतं.
पुढच्या दिवशी, ट्रेनमध्ये तो तिला दिसला.
खिडकीशेजारी, नेहमीप्रमाणेच बसलेला पण त्या ओळखीच्या चेहऱ्यावर काहीतरी अपरिचित होतं.
खिडकीशेजारी, नेहमीप्रमाणेच बसलेला पण त्या ओळखीच्या चेहऱ्यावर काहीतरी अपरिचित होतं.
त्याचे डोळे शांत होते पण ती शांतता, सोज्वळ नव्हती.
ती शांतता जणू काही आरशातली धूंद प्रतिमा होती स्पष्ट दिसत होती, पण समजत नव्हती.
ती शांतता जणू काही आरशातली धूंद प्रतिमा होती स्पष्ट दिसत होती, पण समजत नव्हती.
ती त्याच्यापाशी गेली. समोर उभी राहून काही क्षण त्याला न्याहाळत राहिली.
तो नजर वर उचलतो क्षणभर नजर भिडते आणि तो एक हसू हलकंसं ओठांवर आणतो.
तो नजर वर उचलतो क्षणभर नजर भिडते आणि तो एक हसू हलकंसं ओठांवर आणतो.
ते हसू ती ओळखते.
पण त्या हास्याच्या आत
तीच्याचसाठी दबवलेलं काहीतरी जाणवतं.
पण त्या हास्याच्या आत
तीच्याचसाठी दबवलेलं काहीतरी जाणवतं.
“सगळं ठिक आहे ना?”
तिने विचारलं. आवाजात काळजी होती पण नकळत भीतीही होती तो काय सांगेल याची.
तिने विचारलं. आवाजात काळजी होती पण नकळत भीतीही होती तो काय सांगेल याची.
तो थोडा वेळ तिच्याकडे पाहतो. मग हसतो पण त्या हसण्यात आता शब्दांची गरजच उरलेली नसते.
“हो… सगळं ठिक आहे.”
त्याचं उत्तर, जणू एखाद्या बंद दारासारखं. आत काय आहे, ते कुणालाच माहीत नाही आणि त्याला उघडायची त्याची तयारीही नाही.
त्याचं उत्तर, जणू एखाद्या बंद दारासारखं. आत काय आहे, ते कुणालाच माहीत नाही आणि त्याला उघडायची त्याची तयारीही नाही.
पण ती जाणते
त्या "ठिक आहे" च्या आत काही तरी नक्की झालंय.
एखादी आठवण, एखादी हरवलेली रात्र, एखादं दुखणं
किंवा कदाचित एखादं गुपित.
त्या "ठिक आहे" च्या आत काही तरी नक्की झालंय.
एखादी आठवण, एखादी हरवलेली रात्र, एखादं दुखणं
किंवा कदाचित एखादं गुपित.
मग एका रात्री, मयुरीला एक अनोळखी नंबरवरून मेसेज येतो
“आर्यनवर विश्वास ठेवू नकोस.”
“आर्यनवर विश्वास ठेवू नकोस.”
ती हादरते. उशीराच्या त्या शांत रात्री ती पुन्हा त्याचं चॅट उघडते.
आर्यनने लिहिलेलं
“कधी कधी काही माणसं तुझ्या आयुष्यात येतात पण ती नेहमीसाठी नाही येत.”
आर्यनने लिहिलेलं
“कधी कधी काही माणसं तुझ्या आयुष्यात येतात पण ती नेहमीसाठी नाही येत.”
त्या रात्री मयुरी झोपत नाही. तिच्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी होते.
आर्यन कोण आहे खरंतर?
का त्याच्या शांततेत एक भीती मिसळलेली आहे?
तो खरंच फक्त अंतर्मुख आहे?
की त्याच्या भूतकाळात काही असं आहे जे तिला माहित व्हायचंच नव्हतं?
आर्यन कोण आहे खरंतर?
का त्याच्या शांततेत एक भीती मिसळलेली आहे?
तो खरंच फक्त अंतर्मुख आहे?
की त्याच्या भूतकाळात काही असं आहे जे तिला माहित व्हायचंच नव्हतं?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा