भाग -२
मग, एक दिवस
आर्यन गायब होतो.
फोन बंद. चॅट्स ब्लॉक. स्टेशनवर तो नाही.
मग, एक दिवस
आर्यन गायब होतो.
फोन बंद. चॅट्स ब्लॉक. स्टेशनवर तो नाही.
फक्त एक चिठ्ठी, चहावाल्याजवळ सोडलेली
“माफ कर तुला गुंतवलं. पण मी तुझ्यासाठी नव्हतोच कधीच.”
त्या चिठ्ठीपासून मयुरीची रात्र विस्कटली होती. ती चहावाल्याजवळ उभी राहून वारंवार त्या एका वाक्यावर थांबत होती
"मी तुझ्यासाठी नव्हतोच कधीच."
“माफ कर तुला गुंतवलं. पण मी तुझ्यासाठी नव्हतोच कधीच.”
त्या चिठ्ठीपासून मयुरीची रात्र विस्कटली होती. ती चहावाल्याजवळ उभी राहून वारंवार त्या एका वाक्यावर थांबत होती
"मी तुझ्यासाठी नव्हतोच कधीच."
त्याने असं का लिहिलं?
कोण होता तो खरोखर?
कोण होता तो खरोखर?
मयुरीच्या मनात अनेक प्रश्न डोकावू लागले. तिने पुन्हा मेसेज उघडला तो अनोळखी नंबर.
“आर्यनवर विश्वास ठेवू नकोस.”
कोण पाठवत होतं असे मेसेज? का?
“आर्यनवर विश्वास ठेवू नकोस.”
कोण पाठवत होतं असे मेसेज? का?
ती त्याचा नंबर ट्राय करत राहते. बंदच. ट्रेनमध्ये विचारते “तो मुलगा कुठे आहे?” पण कोणी सांगू शकत नाही. जणू आर्यन कधीच अस्तित्वात नव्हता
दोन दिवस. तीन दिवस.
शेवटी मयुरीने निर्णय घेतला ती त्याच्या मागोमाग जायचं ठरवते. चहावाल्याला विचारते, "आर्यन इथं काही बोलला होता का?"
तो शांतपणे म्हणतो,
"एकदा बोलला होता ‘ज्यांना सगळं समजेल, त्यांच्यासाठी हे सगळं धोकादायक आहे’ म्हणाला होता."

धोकादायक?
मयुरीला आठवतं एकदा आर्यनने तिच्या फोनमध्ये चुकून एक फोटो पाहिला होता आणि क्षणभरात चेहरा बदलला होता. त्या फोटोत कोण होता?
ती तो फोटो शोधते आणि बघते तिच्या कॉलेज फेअरमधला एक ग्रुप फोटो. त्या गोंधळात आर्यन कुठेच नव्हता पण फोटो झूम करताच तिला मागे एक अस्पष्ट चेहरा दिसतो आर्यनसारखाच.
तो त्या कॉलेजमध्ये कधी होता का?
ती आपल्या जुन्या ईमेल्समध्ये कॉलेज इव्हेंटचे रजिस्ट्रेशन फॉर्म शोधते – आणि एका ‘नाव नसलेल्या’ स्पीकर्स यादीत एक नाव वाचते – "A. S. Rane आर्यन श्रीकांत राणे?
ती नाव गुगल करते
अनेक पानं, अनेक प्रोफाईल्स पण एका जुन्या न्यूज आर्टिकलवर क्लिक करताच तिच्या अंगावर काटा येतो.
अनेक पानं, अनेक प्रोफाईल्स पण एका जुन्या न्यूज आर्टिकलवर क्लिक करताच तिच्या अंगावर काटा येतो.
“A. S. Rane – Ex-Hacker turned Witness in Corporate Scam; Now Under Disguise and Protection.”
हॅकर? साक्षीदार? संरक्षणाखाली?
मयुरीची श्वास सैलावतो.
आर्यन खरं नाव श्रीकांत राणे एका मोठ्या कोर्पोरेट घोटाळ्याचा साक्षीदार. संरक्षणासाठी ओळख बदलली.
म्हणून तो सतत सावध राहायचा म्हणून त्याच्या डोळ्यांत ते प्रश्न म्हणून तो नात्याला नाव द्यायला घाबरायचा
आर्यन खरं नाव श्रीकांत राणे एका मोठ्या कोर्पोरेट घोटाळ्याचा साक्षीदार. संरक्षणासाठी ओळख बदलली.
म्हणून तो सतत सावध राहायचा म्हणून त्याच्या डोळ्यांत ते प्रश्न म्हणून तो नात्याला नाव द्यायला घाबरायचा
पण आता तो कुठे आहे? आणि तो निघून गेला, का पळवून नेला गेला?
त्या रात्री मयुरीला पुन्हा मेसेज येतो
“तू खूप खोलात शिरतेयस. थांब. नाहीतर त्याच्यासारखंच तूही हरवशील.”
“तू खूप खोलात शिरतेयस. थांब. नाहीतर त्याच्यासारखंच तूही हरवशील.”
हा मेसेज वाचून मयुरीच्या शरीरात थरथरून शहारा भरतो.
पण आता ती थांबणार नव्हती.
पण आता ती थांबणार नव्हती.
ती आर्यनचं म्हणजे श्रीकांत राणेचं सगळं माहितीपत्रक वेगवेगळ्या वेबसाईट्स, न्यूज आर्टिकल्स, फोरम्सवरून गोळा करत राहते. त्याच्या मागे असलेल्या घोटाळेबाज कंपनीचं नाव Xentronix Pvt. Ltd. आणि त्या कंपनीवर केस चालू आहे, हेही तिला कळतं.
मात्र या सगळ्यात एक धक्कादायक गोष्ट तिच्यासमोर येते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा