भाग-३
त्याच कंपनीत मयुरीच्या कॉलेजच्या ओळखीचा एकजण अजूनही काम करतो गौरव.
त्याच कंपनीत मयुरीच्या कॉलेजच्या ओळखीचा एकजण अजूनही काम करतो गौरव.
ती गौरवला कॉल करते, बोलण्याचा बहाणा करून विचारते
"तू अजून Xentronix मध्ये आहेस ना?"
तो हसत म्हणतो, "हो, पण तू का विचारतेस?"
"तू अजून Xentronix मध्ये आहेस ना?"
तो हसत म्हणतो, "हो, पण तू का विचारतेस?"
ती थोडा वेळ थांबते आणि मग थेट विचारते
"तुला A. S. Rane नावाचा कोणी माहीत आहे का?"
"तुला A. S. Rane नावाचा कोणी माहीत आहे का?"
फोनच्या दुसऱ्या बाजूला क्षणभर शांतता
मग गौरव दबक्या आवाजात विचारतो
"तुला हा प्रश्न कुठून सापडला?"
मग गौरव दबक्या आवाजात विचारतो
"तुला हा प्रश्न कुठून सापडला?"
मयुरीला समजतं हा धागा काहीतरी मोठं उघड करू शकतो.
गौरव शेवटी सांगतो
"Xentronix मध्ये एक ब्लॅक-लिस्टेड प्रोजेक्ट होता. त्यातले काही फायनान्स डेटा आणि मॅनिप्युलेशन कोड्स लीक झाले. A. S. Rane हा एकेकाळी त्यांच्या सायबर टीमचा बाहेरचा कॉन्ट्रॅक्ट हॅकर होता पण जेव्हा त्याला समजलं की हे पैसे सामान्य लोकांची गुंतवणूक लुबाडायला वापरले जात आहेत, तेव्हा त्याने बाहेर माहिती दिली."

मयुरी “आणि मग?”
गौरव “त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. पण तो वाचला. सरकारनं त्याला नवी ओळख आणि प्रोटेक्शन प्रोग्रॅम दिला आणि त्याचं अस्तित्व ‘खोडून टाकलं.’”
गौरव “त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. पण तो वाचला. सरकारनं त्याला नवी ओळख आणि प्रोटेक्शन प्रोग्रॅम दिला आणि त्याचं अस्तित्व ‘खोडून टाकलं.’”
मयुरीचा श्वास अडकतो.
म्हणजे तो खरंच तिला काही सांगू शकत नव्हता. त्याच्या जवळ राहणं तिच्यासाठीच धोकादायक ठरलं असतं.
तेवढ्यात तिच्या फोनवर एक अज्ञात नंबर कॉल करतो. ती उचलते.
दुसऱ्या बाजूला ओळखीचा, शांत पण थरथरत चाललेला आवाज
दुसऱ्या बाजूला ओळखीचा, शांत पण थरथरत चाललेला आवाज
“मयुरी”
आर्यन.
ती क्षणभर थिजते. डोळ्यांत पाणी. “आर्यन, तू कुठे आहेस? मी तुझ्या शोधात”
तो मधेच थांबवतो “मी फक्त एक क्षणासाठी बोलू शकतो. कुणीतरी तुझा पाठलाग करतोय. तू सुरक्षित आहेस ना?”
“मी? माझा पाठलाग? पण”
तो झपाट्याने बोलतो,
“गौरववर विश्वास ठेवू नको. त्यानेच माझी माहिती लीक केली होती. मी आता तुला नाही भेटू शकत. पण तू मागे वळून पाहशील, तिथे एक पिवळा फोल्डर आहे. त्या कॅफेच्या वाय-फायवरून मी ठेवलेला.”
तो झपाट्याने बोलतो,
“गौरववर विश्वास ठेवू नको. त्यानेच माझी माहिती लीक केली होती. मी आता तुला नाही भेटू शकत. पण तू मागे वळून पाहशील, तिथे एक पिवळा फोल्डर आहे. त्या कॅफेच्या वाय-फायवरून मी ठेवलेला.”
ती कॉल कट होण्याआधी फक्त एकच वाक्य म्हणते “मी तुझ्यावर विश्वास करते.”
ती कॅफेमध्ये धावत जाते. वाय-फायवर लॉगिन करते. आर्यनने सांगितलेला फोल्डर "LettersToHer"
त्या फोल्डरमध्ये अनेक नोट्स, मेल ड्राफ्ट्स आणि एक ऑडिओ फाइल असते.
ती प्ले करते.
ती प्ले करते.
आर्यनचं शांत, खोल, थोडं थरथरतं पण प्रेमळ स्वर
"मयुरी तू माझ्या जगण्यातली ती एकमेव गोष्ट होतीस जिच्यात मला सत्य वाटलं. मी तुझ्या आयुष्यात आलो, ही माझी चूक नव्हती पण तुझ्या आयुष्यातून गेलो, ते माझं रक्षण होतं"
"मयुरी तू माझ्या जगण्यातली ती एकमेव गोष्ट होतीस जिच्यात मला सत्य वाटलं. मी तुझ्या आयुष्यात आलो, ही माझी चूक नव्हती पण तुझ्या आयुष्यातून गेलो, ते माझं रक्षण होतं"
त्या शब्दांमध्ये प्रेमाचं दुःख, ओढ, आणि हतबलता मिसळलेली असते.
आजही मयुरी लोकल ट्रेनमध्ये खिडकीजवळ उभी राहते.
तो कोपरा अजूनही तिला त्याचा आठवतो.
आणि कधी कधी पावसाच्या थेंबांमध्ये, तिच्या कानात एक शांत आवाज गुंजतो
"मयुरी..."
तो कोपरा अजूनही तिला त्याचा आठवतो.
आणि कधी कधी पावसाच्या थेंबांमध्ये, तिच्या कानात एक शांत आवाज गुंजतो
"मयुरी..."
[समाप्त]
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा