सोनचाफा 14
अनिकेत आणि सारंग दोघेही ऑफिसमध्ये गेले. तिथे जाऊन त्यांनी आजच्या कामाचे रिपोर्टिंग केले. अनिकेत सरांसोबत थोडा वेळ बोलत होता. बोलून झाल्यानंतर तो त्याच्या घरी जायला निघाला; कारण जर याला जायला उशीर झाला तर पुढे गौरीला तिच्या घरी जायला उशीर होणार आणि आपल्यामुळे कोणालाही त्रास झालेला त्याला अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे तो ऑफिस सुटल्यावर लगेच घरी जायला निघाला. घरी गेल्यानंतर पाहतो तर काय ओवी सर्वांसाठी भजी तळत होती; तर गौरी तिला मदत करत होती आणि त्याची आई देखील तिथेच खुर्चीवर बसून ते सर्व पाहत होती. त्या तिघीही गप्पांमध्ये इतक्या रंगल्या होत्या की, तिथे अनिकेत आला आहे हे त्यांना समजले देखील नाही.
अनिकेत आणि सारंग दोघेही ऑफिसमध्ये गेले. तिथे जाऊन त्यांनी आजच्या कामाचे रिपोर्टिंग केले. अनिकेत सरांसोबत थोडा वेळ बोलत होता. बोलून झाल्यानंतर तो त्याच्या घरी जायला निघाला; कारण जर याला जायला उशीर झाला तर पुढे गौरीला तिच्या घरी जायला उशीर होणार आणि आपल्यामुळे कोणालाही त्रास झालेला त्याला अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे तो ऑफिस सुटल्यावर लगेच घरी जायला निघाला. घरी गेल्यानंतर पाहतो तर काय ओवी सर्वांसाठी भजी तळत होती; तर गौरी तिला मदत करत होती आणि त्याची आई देखील तिथेच खुर्चीवर बसून ते सर्व पाहत होती. त्या तिघीही गप्पांमध्ये इतक्या रंगल्या होत्या की, तिथे अनिकेत आला आहे हे त्यांना समजले देखील नाही.
"अरे अनिकेत, तू आलास. आज लवकर आलास. आणि तू आल्याचे आम्हाला समजले देखील नाही." अनिकेतच्या आईचे जेव्हा अनिकेतकडे लक्ष गेले तेव्हा ती म्हणाली.
"माझ्याकडे तुमचे लक्ष कसे असणार? तुम्ही तर तुमच्या कामांमध्ये आणि गप्पांमध्ये व्यस्त आहात. माझ्याकडे पण कोणीतरी पहा. मला देखील खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या." असे अनिकेत चेष्टा करत म्हणाला.
"अरे, तुझेच घर आहे. तुझ्या घरात तुला खायला बंदी आहे का? हे घे गरमागरम भजी." असे म्हणून गौरीने त्याच्यासमोर डिश धरला. अनिकेत डिशमधील एक भजी उचलून घेणार इतक्यात गौरीने तो डिश बाजूला केला.
"पहिल्यांदा तू फ्रेश होऊन ये. हात न धुताच खाणार आहेस का?" गौरी त्याला ओरडतच म्हणाली.
"ओ सॉरी, मी फ्रेश होऊन येतो." असे म्हणून अनिकेत जायला निघाला.
"बरं झालं बाई गौरी, तू या घरात आलीस. याला असेच कोणीतरी ठणकवायला हवे होते. नाहीतर माझे तर काहीच ऐकत नाही. आता तू आहेस तर याला बरोबर वठणीवर आण." अनिकेतची आई म्हणाली.
"हो काकू, तुम्ही काही काळजी करू नका. आता मी आहे आणि अनिकेत आहे. आम्ही पाहून घेतो." असे म्हणून गौरी हसू लागली.
"हो हो. काय पाहतेस बघूया." असे म्हणून अनिकेत देखील रागाने थोडा पुढे सरसावला. तेव्हाच त्याचे लक्ष ओवीवर गेले. ती मात्र थोडीशी नाराज दिसली.
'ओवी इतकी का नाराज आहे? तिला गौरी इथे आलेले आवडले नाही का? की ती पुढे काही काम करणार होती पण गौरीमुळे तिला जमले नाही? गौरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे तिला समजले आहे का? नक्की ओवीच्या मनामध्ये काय सुरू आहे?' असा विचार करतच अनिकेत फ्रेश होण्यासाठी निघून गेला.
"गौरी, मला एक गोष्ट सांग तू आणि अनिकेत आधीपासूनच एकमेकांना ओळखता का?" अनिकेतची आई म्हणाली.
"नाही हो काकू. ते माझ्या भावाकडे हा सारखे येत होता ना, त्यामुळे आमचे अधून मधून बोलणे होत होते. बाकी तसे काही नाही." गौरी अडखळतच म्हणाली.
"अच्छा. म्हणजे तू अनिकेतच्या मित्राची बहिण आहेस म्हणजे माझ्या मुलीसारखीच आहेस. तशी ओवी देखील मला मुली सारखीच आहे बरं. खूप चांगली आणि गोड मुलगी आहे." असे म्हणून अनिकेतच्या आईने ओवीचे देखील कौतुक केले; तेव्हा ओवी तिच्याकडे पाहून हलकेच हसली.
गौरी त्या घरात आल्यापासून ओवी तिच्याशी फक्त मोजकेच बोलत होती; मात्र अनिकेतच्या आईसोबत ती खूप गप्पा मारत होती. अनिकेतची आई जणू स्वतःचीच आई आहे असे ओवी तिच्याशी वागत होती. गौरी मात्र ओवीचे निरीक्षण करत होती. ती कशी बोलते, कशी वागते, शिवाय कुणाशी बोलते, तिला कोणाचे फोन येतात या सगळ्यावर तिचे बारीक लक्ष होते; पण त्या एका दिवसात तिला संशय यावा असे एकही गोष्ट घडली नाही. ओवीला काहीतरी खोदून विचारावे असे गौरीला खूप वाटत होते; पण नुकतीच त्यांची भेट झाली होती त्यामुळे लगेचच विचारले बरे वाटले नाही म्हणून ती शांत राहिली. उद्या परवा काही गोष्टी विचारता येतील असे तिने ठरवले होते. अनिकेत त्याचे आवरून स्वयंपाक घरात आला आणि त्याने भजीवर ताव मारायला सुरुवात केली. भजी खात असताना तो गौरीसोबत खूप गप्पा मारत होता आणि गौरी देखील मनमोकळेपणाने त्याच्यासोबत बोलत होती. त्या दोघांचे बोलणे पाहून ओवी मात्र नाराज झाली होती. अनिकेतची आई देखील अधूनमधून त्यांच्या बोलण्यामध्ये सामील होत होती. गौरी मनमोकळेपणाने खळखळून हसत होती. खूप दिवसांनी त्या घरामध्ये हसण्याचा आवाज घुमत होता ते पाहून अनिकेतच्या आईला छान वाटत होते.
"गौरी, आता तुला तुझ्या प्रॅक्टिससाठी जायचे आहे ना? घड्याळात बघ किती उशीर झालाय." गौरी गप्पाच्या नादात तिथेच बसून होती; त्यामुळे अनिकेतने तिला जाण्याची आठवण करून दिली.
"अरे अनिकेत, तू तर तिला जाण्यासाठीच सांगत आहेस. अजून थोडा वेळ बसू दे ना. तसेही तिच्याशी गप्पा मारताना वेळ कसा निघून जातो समजतच नाही. खरंच खूप गोड मुलगी आहे. ओवीदेखील छान आहे; तिची आणि ओवीची छान गट्टी जमली तर खूप मज्जा येईल." अनिकेतची आई म्हणाली.
"अगं आई, तिचा आज पहिलाच दिवस आहे ना? तिला लवकर जावे लागणार. ती पुन्हा उद्या तुमच्यासोबत येईलच ना. मग दिवसभर काय गप्पा मारायचे आहेत मारत बसा." अनिकेत म्हणाला.
"काय हे अनिकेत? मला थोडा उशीर झाला तरी चालतं. मला अजून थोडा वेळ इथे बसायचं आहे. बसू दे ना रे. खूप दिवसांनी मी कुणाशी तरी इतकी छान गप्पा मारतेय." गौरी म्हणाली.
"हे बघ घड्याळ, आठ वाजले आहेत. पहिल्याच दिवशी तू उशीर करणार आहेस का?" डोळे मोठे करून गौरीकडे पाहत अनिकेत म्हणाला.
"अरे हो, मी तर विसरलेच. आज मला लवकर जायचे होते. बरोबर सहा वाजता मला तिथे पोहोचायचे असते. आज उशीर झालाय. मी तर घड्याळात पाहिलेच नाही. शीट्." असे म्हणून गौरी तिच्या सामानांची आवराआवर करू लागली. गौरी तिचे सगळे सामान घेऊन अनिकेतच्या घरातून बाहेर पडली.
"अनिकेत अरे, तू तिला सोडून तर यायचं. ती कशी जाणार? ती इथे नवीनच असेल ना? की तिला इथल्या सगळ्या गोष्टी माहित आहेत. आज पहिला दिवस आहे तर तू सोडायला गेला असतास तर बरं झालं असतं." अनिकेतची आई म्हणाली.
"अगं आई, तिची ती जाईल ना. पहिला दिवस काय आणि दुसरा दिवस काय तिला इथे सगळी माहिती आहे. तू काही काळजी करू नकोस. मी तिला बाहेरपर्यंत सोडून येतो." असे म्हणून अनिकेत गौरीच्या पाठोपाठ बाहेर गेला.
"मी इथे थांबू नये असे तुला वाटत होते ना? म्हणून मला घरी जाण्यासाठी घाई करत होतास." बाहेर गेल्यावर गौरी चिडूनच अनिकेतला म्हणाली.
"आपली केस सॉल्व झाल्यानंतर तू हवे तितके दिवस माझ्या घरी रहा पण आता नको, सध्या तरी आपल्याला या केसवर कॉन्सन्ट्रेशन करायचे आहे. त्यामुळे तू गप्पागोष्टी करण्याच्या नादात ते सगळे विसरून जाशील." अनिकेत म्हणाला.
"मी तर काहीच विसरले नाही. आज पूर्ण दिवस ओवीकडे लक्ष ठेवून होते." गौरी म्हणाली.
"मग तुला काही जाणवले का?" अनिकेत गंभीर होत म्हणाला.
"मला काही जाणवले नाही. ती खरंच चांगली वाटली; शिवाय तिला तिच्या आईचा सोडून इतर कोणाचाही फोन आला नाही. ती तुझ्या आईसोबतही खूप छान वा,ते त्यांची काळजी घेते; पण मला एक गोष्ट खटकली." गौरी म्हणाली.
"कोणती ग?" अनिकेत प्रश्नार्थक नजरेने तिला म्हणाला.
"एक बायको म्हणून ती तुझ्यासोबत जसे वागायला हवी तसे वागत नव्हती, याचा अर्थ तुमचे काही बिनसले आहे का?" गौरी म्हणाली.
"बिनसायला आधी नवरा बायकोचे नाते तरी व्यवस्थित असायला हवे ना? आमच्यामध्ये अजून नवरा बायकोचे नातेच व्यवस्थित नाही; तर बिनसायला ती माझ्याशी बोलणार कशी?" अनिकेतने त्याची दुखरी नस बोलून दाखवली.
"अरे, पण ती माझ्याशी सुद्धा व्यवस्थित बोलली नाही. मी जेवढे काही विचारेन तेवढीच उत्तरं ती देत होती. बाकी ती माझ्याशी बोलली नाही रे." गौरीने तिच्या मनातील शंका बोलून दाखवली.
ओवी आईसोबत छान बोलते, छान वागते मग अनिकेत आणि गौरीसोबत अशी का वागत असेल?
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा