सोनचाफा 17
अनिकेत आणि सारंग दोघेही आडोशाला उभे राहून रोहन येण्याची वाट पाहत होते; पण रोहन काही लवकर येईना. ते दोघे वाट पाहून थकले होते. एक वाजून बराच वेळ झाला होता तरी रोहन आला नाही. तो येईल की नाही काय माहित असा विचार करून तर दोघेही बाहेर येऊ लागले. त्यात त्यांना कोणीतरी आल्याची चाहूल लागली आणि पुन्हा ते लपून बसले.
अनिकेत आणि सारंग दोघेही आडोशाला उभे राहून रोहन येण्याची वाट पाहत होते; पण रोहन काही लवकर येईना. ते दोघे वाट पाहून थकले होते. एक वाजून बराच वेळ झाला होता तरी रोहन आला नाही. तो येईल की नाही काय माहित असा विचार करून तर दोघेही बाहेर येऊ लागले. त्यात त्यांना कोणीतरी आल्याची चाहूल लागली आणि पुन्हा ते लपून बसले.
ते दोघेही बारकाईने कोणी येत आहे हे पाहू लागले. तेव्हा एक व्यक्ती तिथे आली. त्याने ब्लॅक कलरचा टी शर्ट घातला होता आणि जीन्स घातली होती. पायामध्ये स्पोर्टस् शूज होते, हातामध्ये ब्रांडेड वॉच होते. त्या मुलाकडे पाहून वाटत नव्हते की, तो या घरामध्ये राहत असेल किंवा इतका मॉडर्न मुलगा या घरांमध्ये खरंच राहत असेल का? असा प्रश्न पडावा असे त्याचे वागणे होते. रोहन दिसायला खूप हँडसम होता, रंग गोरा आणि डोक्यावर भरपूर केस होते. एक वेगळ्या प्रकारची त्याची स्वतःची हेअर स्टाईल होती. त्याच्याकडे पाहून कोणतीही मुलगी त्याच्याकडे आकर्षित होईल असा तो होता, म्हणूनच कदाचित सर्व मुली त्याच्या प्रेमात पडल्या असाव्यात की काय असा प्रश्न निर्माण होतो.
आता लगेच त्याच्यासमोर गेलो तर तो तिथून पळ काढणार त्यापेक्षा तो काय करतो याकडे लक्ष देऊयात असे त्या दोघांनी ठरवले आणि त्याच्याकडे लक्ष देऊन होते. त्यांनी पाहिले तर रोहन आला आणि त्याने बाहेर चपला काढून घराचे कुलूप काढून तो आतमध्ये गेला. आत गेल्यानंतर त्याने आतून दरवाजा बंद केला नाही ते पाहून त्या दोघांना आयती संधी मिळाली. अनिकेत आणि सारंग दोघेही हळूच आत शिरले. आत गेल्यानंतर त्या दोघांनी पाहिले आणि त्यांचे होश उडाले. ते दोघेही पाहून चकीत झाले. आतमध्ये खूप सुंदर घराचे डेकोरेशन केले होते. बाहेरून एक झोपडी वाटणारे ते घर आतमधून आलिशान बंगल्यासारखे दिसत होते, ते पाहून त्या दोघांना खूप आश्चर्य वाटले. ते दोघेही थोडा वेळ त्या घराकडेच पाहत होते इतक्यात त्यांच्यासमोर रोहन आला. त्या दोघांची नजरानजर झाली. रोहन त्या दोघांना पाहून थोडासा घाबरला; पण आता तो जाणार कुठे? घरातून बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा होता. जरी त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी ते दोघे होते. ते त्याला नक्की पकडणार हे त्याला माहीत होते म्हणून आता काय होईल ते होईल आलेल्या संकटाला सामोरे जायचे असते रोहनने ठरवले.
"आपण कोण आहात? आणि मला न सांगता माझ्या घरामध्ये तुम्ही कसे काय आलात?" रोहन म्हणाला.
"हाय, मी अनिकेत आणि हा माझा मित्र सारंग." असे म्हणून अनिकेतने रोहनला ओळख करून दिली.
"आपण याआधी कधी भेटलोय की पहिल्यांदाच भेटतोय." रोहनने प्रश्नार्थक नजरेने विचारले.
"नक्कीच आपण पहिल्यांदा भेटतोय; पण बसून बोलूयात का?" अनिकेत म्हणाला.
"मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही देखील मला ओळखत नाही, तर आपण बसून बोलण्यात काय अर्थ आहे? मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. तसेही मला खूप महत्त्वाचे काम आहे, तुम्ही जाऊ शकता." असे म्हणून रोहनने त्या दोघांना घालवण्याचा प्रयत्न केला; पण ते दोघे काही ऐकायला तयार नव्हते.
"तुम्ही असे ऐकणार नाही, थांबा मी तुम्हाला इथून हाकलूनच देतो." असे म्हणून रोहन त्या दोघांना घरातून हाकलून देऊ लागला. तेव्हाच अनिकेतचा राग अनावर झाला.
"तुला आमचा पेशा दाखवायलाच हवा. थांब एक मिनिटं." म्हणून अनिकेतने खिशातील कार्ड काढले आणि "आम्ही दोघेही सीआयडीमधून आलो आहोत तुझी चौकशी करण्यासाठी; त्यामुळे तू आम्हाला घरातून हाकलून देऊ शकत नाहीस. जे काही सांगायचे आहे ते खरे खरे सांग." असे अनिकेत रोहनचे कॉलर पकडून म्हणाला. सीआयडी म्हटल्यावर रोहनला दरदरून घाम फुटला.
"माझ्याकडे तुम्ही कशासाठी आला आहात? तसेही मी काही केले नाही." असे रोहन म्हणाला.
"प्रत्येक गुन्हेगार असाच म्हणतो. आमच्या प्रश्नांची उत्तरे दे म्हणजे आम्हाला समजेलच की तू काही केलेस की नाही ते." सारंग म्हणाला.
"या बसा. मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो." रोहन म्हणाला.
"आता कसं बरं बोललास. गुड बॉय." म्हणून ते सगळेजण जाऊन बसले. आता कुठून सुरुवात करावी हे अनिकेतला समजत नव्हते. तरीही त्याला प्रश्न विचारावे लागणारच होते; कारण या खुनाचा मुख्य सुत्रधार तोच असणार अशी त्यांना शंका होती.
"तू ओवीला ओळखतोस का?" अनिकेतने विचारले.
"ही कोण आहे? मी कुठल्या ओवीला ओळखत नाही." रोहन एका दमात बोलून गेला.
"अजिबात खोटं बोलू नकोस. माझ्याकडे पुरावे आहेत." असे म्हणून अनिकेतने त्याच्या मोबाईलमधील ओवीचा फोटो रोहनला दाखवला. तो फोटो पाहून रोहनच्या चेहऱ्यावरील भाव बदलले.
"हो. मी हिला ओळखतो." रोहन हळूच म्हणाला.
"तुमचे काय नाते होते? तुमची ओळख कशी झाली?" अनिकेत म्हणाला. अनिकेतला सारे काही जाणून घ्यायचे होते.
"आमची ओळख हिच्या कॉलेजमध्ये झाली. माझा एक मित्र हिच्या कॉलेजमध्ये होता आणि त्याच कॉलेजमध्ये मीदेखील जायचो त्या मित्राकडून हिची ओळख झाली." रोहन सांगू लागला.
"पुढे बोल. मला सगळे काही सविस्तर हवे आहेत." अनिकेत ठणकावत म्हणाला.
"हो सांगतो. ओवीला मी आधीपासून पहायचो म्हणजे आमच्या गल्लीतच ती राहत होती; त्यामुळे लहानपणापासून तिला मी ओळखत होतो. ती तेव्हापासून मला खूप आवडायची; पण तिच्याशी बोलण्याचे कधी धाडस झाले नाही, कारण तिचे एकत्र कुटुंब होते आणि तिचे बाबा, काका खूप कडक स्वभावाचे होते त्यामुळे माझे तसे धाडस झाले नाही. त्यात माझे आई-वडील नसल्याने मी मामा मामीकडे राहत होतो आणि मामा-मामीकडे जर अशी काही कंप्लेंट आली असती तर ते मला घरातून तेव्हाच धक्के मारून बाहेर काढले असते; म्हणून मी थोडा शांत झालो. काही कारणाने माझे कॉलेजचे शिक्षण होऊ शकले नाही; पण मी यांच्या कॉलेजमध्ये मित्रासोबत जायचो. मला समजले होते की, ओवीदेखील त्याच कॉलेजमध्ये आहे; त्यामुळे तिच्याशी बोलण्यासाठी मी तरसायचो. हो, तिला फक्त एकदा पाहण्यासाठी माझा जीव तडफडत होता. ती दिसली की, दिवस सगळा प्रसन्न जायचा; त्यामुळे ती कॉलेजला जात असताना मी खिडकीतून तिला पहायचो. कधी कधी ती तिच्या बाबांसोबत किंवा काकांसोबत गेली की मला दिसत नव्हती, तेव्हा मात्र मी तिला कॉलेजमध्ये जाऊन पाहायचो. तिच्यासाठी मी पूर्ण वेडा झालो होतो.
तिच्यासोबत मैत्री करून तिला आपल्या स्वतःकडे ओढायचे, तिला आपल्या प्रेमात पाडायचे असे मी ठरवले होते. तेव्हाच माझा एक मित्र सोहम याला मी पकडले. त्याच्याशी ओळख वाढवली. त्याच्या निमित्ताने मी कॉलेजवर सारखा जाऊ लागलो. सोहम आणि ओवी एकच वर्गात होते हे मला समजले. ते दोघेही नोट्स असो की पुस्तके असो सगळ्या गोष्टी देवाणघेवाण करत होते आणि एकमेकांसोबत बोलत होते हे जेव्हा मला समजले तेव्हा मी सोहमला बाहेर खायला वगैरे घेऊन जाऊ लागलो आणि त्याच्याशी आणखी जवळीक वाढवली. त्याला माझ्या मनातील ओवी विषयीचे भाव सांगितले तेव्हा तो मला खूप ओरडला आणि ते कधीच शक्य होणार नाही असे त्याने मला स्पष्ट सांगितले; पण मी ओवीसाठी खूप वेडा झालो होतो त्यामुळे नकार पचवण्याची माझ्या शक्ती नव्हती. मला एक वेळ फक्त तिच्याशी मैत्री करून दे. बास मी पुढचा काहीच विचार करत नाही असे मी त्याला सांगितले. तेव्हा त्याने माझ्या विनंतीनुसार ओवीची आणि माझी मैत्री करून दिली." इतके बोलून रोहन शांत बसला.
"पुढे काय झालं? बोल." अनिकेतने आवाज वाढवत विचारले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा