सोनचाफा 20
रोहनकडून सगळी माहिती घेऊन अनिकेत आणि सारंग दोघेही तिथून बाहेर पडले. रोहनच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनिकेतचे लक्ष सोनचाफ्याच्या झाडाकडे गेले. ते पाहून तो थोडा वेळ शांत उभा राहिला. नंतर ते दोघे शहराकडे आले. त्यांच्या गावात यायला त्यांना बराच उशीर झाला होता, त्यामुळे ऑफिसला न जाता ते दोघेही आपापल्या घरी गेले. अनिकेत घरी गेल्यानंतर पाहतो तर गौरी त्याच्या घरी अजूनही होती. अनिकेतला पाहून गौरी तिच्या घरी जायला निघाली. ओवी मात्र अजूनही गाल फुगवूनच होती. अनिकेतला मात्र त्या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले. 'ही माझ्यावर कालपासून गाल फुगून बसली आहे. नक्की हिच्या मनासारखे होत नाहीये म्हणून की, आणखी काही कारण असेल?' असा अनिकेतला संशय येऊ लागला. आता मात्र त्याचा संशय वाढत चालला होता. खरंच ओवी अपराधी असेल का? अशी शंका त्याच्या मनात आली; कारण आजवर मी कधीच तिच्यावर हक्क दाखवला नाही किंवा तिला जबरदस्ती केली नाही, पण कालपासून ती अशी गाल फुगवून बसली आहे म्हणजेच गौरीचे इथे येणे तिला आवडले नाही. गौरी आल्यामुळे तिला तिच्या मनासारखे करता येत नसेल का? तिच्या मनामध्ये नक्की काय सुरू असेल? आई एकटीच असते त्यात ती आजारी आहे त्यामुळे ती तिच्या रूममध्ये जाऊन बसली की ओवीला तिच्या मनासारखे करता येत असेल का? पण आता गौरीमुळे ते करता येत नाही म्हणून ती गाल फुगवून बसली असेल का? असा संशय अनिकेतला येत होता. तो आल्याबरोबर दोन क्षण उभा राहूनच असा विचार करत होता.

जेव्हा गौरी घरी जात आहे असे त्याला दिसले तेव्हा तो भानावर आला. गौरी अनिकेतला सांगून बाहेर गेली. तिच्या पाठोपाठ अनिकेत देखील बाहेर गेला.
"गौरी, तुला आज काही संशयास्पद जाणवले का? ओवी तुझ्याशी देखील बोलली नसेल ना? तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट जाणवतेय; पण तू तेवढे सहन कर. आपले मिशन सक्सेसफुल होईपर्यंत तुला तेवढे सहन करावे लागेल." अनिकेत गौरीला समजावत होता.
"इट्स ओके अनिकेत. तुला तर माहित आहे ना? कदाचित तिचा तसा स्वभाव असेल; पण आज तिने खूप छान जेवण बनवलं होतं बरं का. मी तर चक्क बोटे चाटतच जेवले; पण काहीही म्हण हं अनिकेत, ओवी काकूंशी म्हणजे तुझ्या आईशी खूप छान बोलते, त्यांची काळजी घेते, त्यांना काही हवे नको ते पाहते. याबाबतीत तू खूप लकी आहेस ना. नाहीतर मुली हे सर्व करायला बघत नाहीत. पण ओवी सगळं मनापासून करते ते दिसतंय ना मला." असे म्हणून गौरी ओवीचे खूप कौतुक करत होती.
"हो. मी देखील ते पाहतोय की, ओवी माझ्याशी कशीही लागली तरी ती आईसोबत खूप छान वागते. अगदी तिची आई आहे अशीच तिची काळजी घेते; पण ती असे का करते? शिवाय बाहेरचे पाहुणे मंडळी वगैरे कोणी आले तरीही त्यांच्याशी ती खूप छान वागते; पण तुझ्याशी मात्र ती अशी का वागत असेल? मला तर काहीच समजेना. याचा शोध हा लावायला हवा. तिला काही विचारले तर ती तोंड फुगवून बसते. बघूया मी सांगेन तुला. चल जा आता. तुला उशीर खूप झालाय." असे म्हणून अनिकेत म्हणताच गौरी तेथून निघून गेली. अनिकेत मात्र आत आला.
अनिकेत आत आला आणि तो आईसोबत थोडा वेळ गप्पा मारत बसला. तेथून तो फ्रेश होऊन जेवायला येऊन बसला. गौरीसोबत अनिकेतची आई जेवली होती त्यामुळे आता फक्त ओवी आणि अनिकेत दोघे जेवायचे बाकी होते. ओवीने अनिकेतला जेवायला वाढले.
"तू जेवलीस?" अनिकेतने ओवीला विचारले.
"नाही." अनिकेतने असा अचानक प्रश्न विचारल्यामुळे भांबावून ओवी हळूच म्हणाली.
"रोज तर माझी वाट पाहत नाहीस मग आज का माझी वाट पाहत बसलीस? जेवून घ्यायचं ना आईसोबत?" अनिकेत म्हणाला.
"ते.. त्या दोघींना वाढायचं होतं ना म्हणून मी जेवले नाही." ओवी अडखळतच म्हणाली.
"अरे, त्यात काय वाढायचं असतं! तिघी एकत्र बसला असता तरी चाललं असतं ना? तशीही गौरी आता किती दिवस राहणार आहे हे माहित नाही; त्यामुळे तिला काही वाढत बसू नको. तुम्ही तिघी एकत्र जेवत जा." अनिकेत म्हणाला तशी ओवी हिरमुसली.
"बरं ठीक आहे." ओवी म्हणाली.
"आता मला वाढत बसणार आहेस का? मग तू कधी जेवणार?" अनिकेत म्हणाला.
"तुम्हाला वाढून झाल्यानंतर." ओवी म्हणाली.
"काही गरज नाही. माझ्यासोबत बस जेवायला." असे म्हणून अनिकेतनेही तिच्यासाठी देखील एक ताट घेतले आणि दोघेही जेवायला बसले.
अनिकेतसोबत जेवताना ओवीला देखील खूप छान वाटले. लग्नानंतर पहिल्यांदाच ती अनिकेत सोबत जेवत होती; कारण इतके दिवस ती अनिकेतच्या आईसोबत जेवत होती. अनिकेतला कधी यायला उशीर व्हायचा, कधी तो लवकर यायचा त्यामुळे ते दोघे कधी बसलेच नाहीत. आज पहिल्यांदा त्याच्यासोबत जेवताना तिला खूप छान वाटत होते. आज ती थोडी आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरील ते भाव अनिकेतने लगेच टिपून घेतले होते. तिच्यामध्ये झालेला बदल त्याला लगेच दिसला होता; कारण त्याची सीआयडी नजर तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होती. तिच्या चेहऱ्यामध्ये झालेला बदल जाणवायला त्याला फारसा वेळ लागला नव्हता; पण नक्की तिच्या मनामध्ये काय सुरू आहे हे त्याला समजत नव्हते. रात्री देखील ओवी खूप आनंदात होती; त्यामुळे अनिकेतला तिच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे असे जाणवले. आता उद्या काहीतरी वेगळा प्लॅन करायला हवा असा विचार तो करत होता; पण नक्की कोणता प्लॅन करावा हेच त्याला समजत नव्हते. ओवीच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे ते जाणून घ्यावे असे त्याला वाटत होते. तिला डायरेक्ट विचारले तर ती काही सांगणार नाही, त्यापेक्षा तिच्या कलाने घेऊन आपण विचारावे असा विचार करत तो रात्रभर बसला होता.
आता पुढचा प्लॅन काय करायचा? असा विचार अनिकेतच्या मनात घोळत होता. त्याआधी ओवीला थोडेसे बाहेर घेऊन जावे असा विचार तो करत होता.
"ओवी तू उद्या काय करणार आहेस?" अनिकेत म्हणाला.
"काही नाही. नेहमीच. का? काही काम होतं का?" ओवी म्हणाली.
"थोडं शॉपिंगला जाऊन येऊयात का?" अनिकेतने अचानक विचारलेल्या प्रश्नाने ओवी भारावून गेली.
"आता मध्येच असे शॉपिंगचे तुमच्या डोक्यात आले कसे? मला नाही यायचं तुमच्यासोबत." ओवी लटकेच रागाचा आव आणून म्हणाली.
"अगं खूप दिवस झाले आपण बाहेर कुठे गेलो नाही. आईलाही बरे वाटेल ना. शिवाय आईला गौरीची सोबत आहेच; त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. आपण लगेच जाऊन येऊ. तसेही आईचा वाढदिवस जवळ आलाय, तेव्हा तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन येऊ." असे अनिकेत सांगताच ओवी तयार झाली.
"हो चालेल. मी फक्त आईंसाठी तुमच्या सोबत यायला तयार आहे नाहीतर मला काही हौस नाही तुमच्या सोबत फिरायला." असे म्हणून ती पुन्हा गाल फुगवून बसली; पण तिच्या मनात खूप आनंदाचे लाडू फुटत होते. ती मनोमन खूप आनंदून गेली. आता शॉपिंगला गेल्यानंतर काय काय खरेदी करायचे याची ती मनातच लिस्ट बनवत होती.
सकाळी सकाळी अनिकेत आणि ओवी दोघेही त्यांचे आवरून घेतले. ओवीने छानसा उपमा केला होता; शिवाय गौरी येणार म्हणून तिच्यासाठी आणि सासूबाईंसाठी जेवण बनवले होते. ओवी आणि अनिकेत दोघेही शॉपिंग करून बाहेर जेवून येणार होते त्यामुळे तिने त्यांचे जेवण बनवले नाही. तिने सकाळी तिच्या सासूबाईंना सांगितले असल्यामुळे ती तिच्या तयारीला लागली. बाहेर जाण्यासाठी अनिकेत तिला घाई करत होता; कारण त्याला पुन्हा केस संदर्भात बाहेर जावे लागणार होते. अनिकेत कधीचाच आवरून बसला होता. आता ओवीचे मात्र तयार व्हायचे बाकी होते. आज ती अनिकेत सोबत जाणार होती. तेव्हा कोणते कपडे घालावे हा प्रश्न तिच्या मनात घोळत होता. तरीही तिने छानसा पंजाबी ड्रेस घातला आणि ती तयार होऊन तिची पर्स घेऊन बाहेर आली. अनिकेत मात्र तिच्या पर्सकडे अवाक् होऊन पाहू लागला. त्याला असे पाहून ओवी आश्चर्यचकित झाली.
क्रमशः
क्रमशः