सोनचाफा 21
अनिकेत ओवीला घेऊन शॉपिंगसाठी जाणार होता. खूप दिवसांनी ते दोघेच कुठेतरी जात होते. ओवी देखील खूप आनंदात होती. आज अनिकेत आणि ती दोघेही एकमेकांना वेळ देणार होते. ओवी तिचे आवरून बाहेर आली. तिने छान असा पंजाबी ड्रेस घातला होता. केस पूर्ण मोकळे सोडले होते. शिवाय एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात एक छोटीशी बांगडी घातली होती. कपाळावर छोटीशी टिकली आणि लहानसेच कानातले घातले होते. अगदी साधा मेकअप करून ती तयार होऊन बाहेर आली. तिने एका हातात पर्स घेतली होती.
अनिकेत ओवीला घेऊन शॉपिंगसाठी जाणार होता. खूप दिवसांनी ते दोघेच कुठेतरी जात होते. ओवी देखील खूप आनंदात होती. आज अनिकेत आणि ती दोघेही एकमेकांना वेळ देणार होते. ओवी तिचे आवरून बाहेर आली. तिने छान असा पंजाबी ड्रेस घातला होता. केस पूर्ण मोकळे सोडले होते. शिवाय एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात एक छोटीशी बांगडी घातली होती. कपाळावर छोटीशी टिकली आणि लहानसेच कानातले घातले होते. अगदी साधा मेकअप करून ती तयार होऊन बाहेर आली. तिने एका हातात पर्स घेतली होती.
"चला निघूया" असे ओवी म्हणाली. तेव्हाच मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेल्या अनिकेतने तिच्याकडे पाहिले. तसेही स्त्रियांना आवरण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून तो मोबाईलमध्ये तोंड खूप बसला होता; पण ओवीचे मात्र लगेच आवरले त्यामुळे तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला.
तिच्याकडे पाहतानाच त्याचे लक्ष तिच्या हातामध्ये असलेल्या पर्सकडे गेले आणि आपसूकच त्या पर्सला लावलेले सोनचाफ्याचे किचन त्याच्या नजरेस पडले. तो त्याच्याकडे एकटक पाहू लागला आणि त्याच्या मनामध्ये असंख्य प्रश्नाने गराडा घातला. 'तिने पुन्हा तसेच किचन आणले असेल का? की हे जुनेच असेल? नाही नाही हे तिने नक्कीच नवीन घेतले असेल पण नवीन घेण्यासाठी ही कुठेच बाहेर गेली नाही मग हिला इथे कोणी आणून दिले का? मी नसताना इथे कोणी आले असेल का? नाही नाही कोणी कसे येईल? गौरी तर नेहमी घरातच असते तिने मला सांगितले असते. म्हणजे नक्कीच ओवी कुठे बाहेर गेली नाही शिवाय तिला भेटण्यास कोणी आले नाही मग हे पर्सला अडकवलेले किचन जसेच्या तसे कसे आहे? अशी शंका अनिकेतच्या मनात येत होती.
"चला निघूया, माझे आवरले आहे." असे ओवी म्हणताच अनिकेतने तिच्याकडे पाहिले.
"ओवी, हे पर्सला लावलेले किचन तुझ्याकडे कसे आले? तू कुठे घेतलेस?" अनिकेतने ओवीला प्रश्न केला.
"का? काय झाले आहे? तुम्हाला आवडले नाही का?" ओवी पुन्हा म्हणाली.
"अगं, खूप छान आहे. मलाही आवडलं म्हणून मी विचारतोय. सांग ना कुठून आणि कधी आणलेस?" अनिकेतने तिला प्रतिप्रश्न केला.
"अहो, लग्नाअगोदर मी कॉलेजला जायचे ना तेव्हा माझ्या एका फ्रेंडने मला हे गिफ्ट केले होते. ते कुठे ठेवायचे म्हणून मी असे पर्सच्या चेनला लावले आहे." असे ओवी म्हणाली.
"अगं, तसे नाही; म्हणजे हे तुटले, फुटले किंवा हरवले होते का? नाही म्हणजे तू पुन्हा नवीन आणले आहेस का?" अनिकेतला आपण काय विचारतोय तेच समजत नव्हते.
"अहो, तुम्ही असे का विचारत आहात? हे आधीपासूनच माझ्याकडे असलेले एकमेव किचन आहे. हे कुठे हरवले किंवा तुटले फुटले वगैरे नाही. हे मी इथे अडकवले आहे ते तसेच आहे. याआधीही मी पर्स घेऊन जाताना तुम्ही ते पाहिले होते तेव्हा कधी असा प्रश्न विचारला नाहीत आणि आत्ता असे अचानक असा का प्रश्न विचारत आहात? मी तर तुम्हाला सारे काही सुरुवातीला सांगितले होते मग तुम्ही माझ्यावर संशय घेताय का?" ओवी थोडीशी हळवी होत म्हणाली.
"अगं, मी सरळ साधा प्रश्न विचारला, की तू हे कधी आणि कुठून आणलेस. यात संशय घेण्यासारखे काही आहे का? तू नाही त्या गोष्टी मनाला लावून घेतेस. बरं जाऊ दे. चल निघूयात." असे म्हणून अनिकेत ओवीला घेऊन घराबाहेर पडला खरा; पण त्याच्या मनातील संशय काही केल्या जात नव्हता. तो ओवीसोबत जरी असला तरी तिच्या प्रत्येक हालचालींकडे त्याचे लक्ष होते. ओवी शॉपिंगसाठी पुढे गेली आणि अनिकेत तिच्या पाठोपाठ जात होता. कपड्यांच्या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी ती आत गेली. आणि बाहेर अनिकेत उभा होता.
'पर्सला लावलेले सोनचाफ्याचे किचन जर हिचे लग्नाआधीचे असेल तर मग अनघाच्या बॉडीजवळ मला सापडलेले ते सोनचाफ्याचे किचन कोणाचे असेल? नक्कीच यामागे काहीतरी घोळ असणार आहे. एकतर ओवी खोटे बोलत आहे किंवा मग यामागे दुसरा कोणीतरी सूत्रधार आहे. जर ओवी नसेल तर मग दुसरे कोण असेल?' असा विचार करत अनिकेत बराच वेळ बाहेर बसला होता. मात्र त्याच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्याच्याकडून मिळालेच नाही. आता पुन्हा ओवीच्या घरी जाऊन तपासणी करावी असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याने लगेच सारंगला मेसेज केला.
"तू इथेच शॉपिंग कर. हे घे माझे कार्ड तुला हवे नको ते सगळे खरेदी कर. मी गौरीला फोन करतोय ती तुझ्यासोबत इथे येईल. मला खूप महत्त्वाचे काम आले आहे. मला जायला हवं." असे म्हणून अनिकेत तिथून निघाला; पण अनिकेत असे म्हणताच ओवीचा चेहरा मात्र पूर्णपणे उतरला. मी खूप नाराज झाल खरंतर तिला अनिकेत सोबत वेळ घालवायचा होता. कधी नव्हे ती आयती संधी मिळाली होती; पण त्यामध्येही त्याचे काम आले म्हणून ती नाराज झाली. तिचा शॉपिंगचा सगळा मूड निघून गेला. तिने परस्पर गौरीला न येण्याबद्दल सांगितले आणि ती लगेचच घरी जाऊन पोहोचली.
इकडे अनिकेत सारंगला घेऊन ओवीच्या माहेरी गेला. अनिकेतला असे अचानक आलेले पाहून सगळेजण गोंधळून गेले; पण नक्कीच हा केसच्या संदर्भात आला असेल असे सर्वांनी जाणले. त्यांनी अनिकेतचे पाहुणचार केले, कारण तो त्या घरचा जावई होता. त्यानंतर अनिकेतने चौकशीला सुरुवात केली. त्याने सर्व रूममध्ये जाऊन तपास करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनीही त्याला कोणत्याही गोष्टीत अडवले नाही. अनिकेत सर्व रूममध्ये तपासत होता. तो तिजोरी उघडून त्यातील प्रत्येक स्त्रियांचे पर्स तपासून पाहू लागला; पण त्याला तसे काहीच आढळले नाही. कोणाच्याच पर्सला किचन किंवा काही अडकवलेले दिसले नाही. त्याने पुन्हा पुन्हा सगळीकडे पाहिले; पण त्याला काहीच आढळले नाही. पुन्हा नाराज होऊन अनिकेत तिथून बाहेर पडला तो थेट घरी गेला. अनिकेत आतमध्ये गेला तोपर्यंत त्याला ओवीची छोटी चुलत बहीण अपूर्वा दिसली.
"हाय जीजू, कसे आहात?" अपूर्वा म्हणाली.
"मी ठीक आहे, तू कशी आहेस?" अनिकेतनेही तिचे विचारपूस केली.
"मी ठीक आहे जीजू. कॉलेजच्या कामासाठी इथे आले होते. म्हटलं ताईला भेटून जावं, तोपर्यंत तुमची देखील भेट झाली. खूप छान वाटलं." अपूर्वा तशी बडबडी होती. तिला बोलायला फक्त विषय हवा असतो. एकदा बोलायला लागली की ती बोलतच सुटत होती.
"जीजू, अनघा ताईच्या केस संदर्भात काही समजले का?" अपूर्वा म्हणाली.
"अजून तरी नाही; पण तपास हा सुरू आहे. लवकरच काय ते समजेल." अनिकेत उत्तरला.
"ठीक आहे जीजू. बिचारी अनघा ताई, तिची काय चूक होती." अपूर्वा म्हणाली.
"बरं ठीक आहे. मी आतून आवरून येतो. तू जेवण करूनच जाणार आहेस ना?" अनिकेत म्हणाला.
"नाही जिजू. मला लगेच जावं लागणार आहे. तसेही घरी सगळेजण वाट पाहत असतील. फक्त ताईला भेटून जावे म्हणून मी आलोय." असे म्हणून अपूर्वा आतमध्ये ओवीला भेटण्यासाठी गेली. तिथे गप्पा मारून अनिकेतच्या आईला भेटण्यासाठी गेली. तिथे त्यांच्यासोबत अपूर्वा गप्पा मारत बसली होती. गौरी देखील तिथेच होती. त्या दोघींची ही खूप छान गट्टी जमली, तसेही अपूर्वाला मैत्री करण्यासाठी कोणी ओळखीचे असावे असे काही नव्हते; ती अनोळखी व्यक्तीसोबतही तासन् तास गप्पा मारायची त्यामुळे अमूक व्यक्तीशी बोल असे तिला सांगावे लागतच नव्हते.
ओवीने अपूर्वाला चहा नाश्ता वगैरे दिले आणि अपूर्वा सर्वांचा निरोप घेऊन जायला निघाली. अनिकेत मात्र त्या केसच्या संदर्भातच विचार करत होता. अपूर्वाच्या पाठोपाठ गौरी देखील निघून गेली. सर्वांची जेवणं आटपली होती, मात्र ओवी अनिकेतवर रुसून बसली होती. त्याचा अनिकेतला किंचित असाही फरक पडत नव्हता. तो त्याच्या विचारातच गुंग होता. इतक्यात अनिकेतला काहीतरी क्ल्यू सापडला आणि तो आनंदित झाला. आता त्याचा तपास एका वेगळ्या दिशेने चालू झाला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा