सोनचाफा 22 अंतिम
अनिकेत दुसऱ्या दिवशी ओवीच्या घरी गेला आणि ओवीच्या बाबांकडे त्याने थोडी चौकशी केली. त्यांना विश्वासात घेऊन साऱ्या गोष्टी क्लियर करून घेतल्या, त्यानंतर अनिकेतला आणखी काही पुरावे मिळत गेले आणि तो एका मुद्द्यावर येऊन ठाम राहिला. आता त्याला त्याचा निर्णय सर्वांना सांगायचा होता आणि या केसचा निकाल लावायचा होता. खरंतर अनघाचा खून करणारा हा अनपेक्षितच होता. त्याच्या मनाला कधी वाटले देखील नव्हते; पण आता जे काही आहे ते सर्व मान्य करावे लागणार होते. अनिकेतने सर्वांना ओवीच्या घरी बोलावून घेतले होते. ओवी आणि अनिकेची आई दोघी लगेचच तिथे आल्या. गौरी त्या दोघींना घेऊन आली होती, तसेच अनिकेतने रोहनला देखील ताबडतोब येण्याविषयी सांगितले होते. रोहनची चौकशी करून निघतानाच अनिकेतने रोहनचा नंबर घेतला होता; त्यामुळे त्याला बोलावून घेण्यास फारसा वेळ लागला नाही.
अनिकेत दुसऱ्या दिवशी ओवीच्या घरी गेला आणि ओवीच्या बाबांकडे त्याने थोडी चौकशी केली. त्यांना विश्वासात घेऊन साऱ्या गोष्टी क्लियर करून घेतल्या, त्यानंतर अनिकेतला आणखी काही पुरावे मिळत गेले आणि तो एका मुद्द्यावर येऊन ठाम राहिला. आता त्याला त्याचा निर्णय सर्वांना सांगायचा होता आणि या केसचा निकाल लावायचा होता. खरंतर अनघाचा खून करणारा हा अनपेक्षितच होता. त्याच्या मनाला कधी वाटले देखील नव्हते; पण आता जे काही आहे ते सर्व मान्य करावे लागणार होते. अनिकेतने सर्वांना ओवीच्या घरी बोलावून घेतले होते. ओवी आणि अनिकेची आई दोघी लगेचच तिथे आल्या. गौरी त्या दोघींना घेऊन आली होती, तसेच अनिकेतने रोहनला देखील ताबडतोब येण्याविषयी सांगितले होते. रोहनची चौकशी करून निघतानाच अनिकेतने रोहनचा नंबर घेतला होता; त्यामुळे त्याला बोलावून घेण्यास फारसा वेळ लागला नाही.
घरामध्ये तर सगळेच जमले होते. लग्नाच्या वेळेस जे उपस्थित होते त्या सर्वांना बोलावून घेण्यात आले होते. सर्वांना खूप मोठा प्रश्न पडला होता; शिवाय एकच गोंधळ उडाला होता की खुनी नक्की कोण असेल? घरातील असेल की बाहेरचा असेल? बाहेरचा असेल तर ठीक पण घरातील असेल तर पुढे काय करायचे? अशी शंका सर्वांच्या मनामध्ये सुरू होती. सर्वजण आपापसात कुजबुज करत होते; पण अनिकेत मात्र सर्वांचे चेहरे निरखून पाहत होता. ओवी देखील त्या सर्वांमध्ये उभी होती. सगळे पुरावे तर ओवीच्या विरुद्ध होते. ओवी मात्र कोणाशीच न बोलता एकटीच शांत उभी होती.
आता मात्र अनिकेतचे सर तिथे आले होते; शिवाय सारंग आणि गौरी देखील आले होते. खुनी कोण असेल यातील कोणतीच गोष्ट सारंगला आणि गौरीला माहीत नव्हते. सगळेजणच अनिकेतच्या निर्णयाकडे जीव एकवटून पाहत होते. नक्की खुनी कोण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घुमत होता. अनिकेत अजूनही शांतच उभा होता.
"अनिकेत सुरू कर." असे म्हणून त्याच्या सरांनी अनिकेतला सांगितल्यावर अनिकेत पुढे सरसावला.
"त्यादिवशी लग्नात मी देखील हजर होतो; पण मी पाहुण्यांच्या ओळखी करून घेण्यात व्यस्त होतो. ओवी माझ्यासोबतच आली होती, मात्र ती तिथून स्वयंपाक घरात गेली आणि त्यानंतर इथे अनघाला भेटण्यासाठी तिच्या खोलीत आली होती. जेव्हा अनघाचा खून झाला त्यावेळी ओवी आणि अनघा दोघी या रूममध्ये होत्या. त्या दोघीच होत्या, दुसरे कोणीच तिथे नव्हते. शिवाय अनघा ओवीच्या मिठीत येऊन नंतर ती खाली पडली त्यामुळे या गडबडीत ओवीला देखील काही सुचले नाही. त्याचवेळी अनघाची लहान बहिण अपूर्वा अनघाला खाली बोलावण्यासाठी आली. सर्व पाहुणे मंडळी खाली होती आणि या तिघी बहिणी फक्त इथे वर होत्या. अपूर्वाने सारे काही पाहिले आणि ती एकदम ओरडली. तिच्या आवाजाने आपण सगळेजण इथे वर आलो. वर येऊन पाहतो तर अनघा एकीकडे पडली होती तर ओवी सुद्धा चक्कर येऊन पडली. या रूममध्ये दोघीच होत्या; त्यामुळे हा खून नक्कीच ओवीने केला असे सर्वांनी ठरवले आणि तिच्याविरुद्ध सारे काही पुरावे मिळाले." अनिकेत बोलत होता.
"अहो अनिकेत राव, तुम्ही असे का बोलत आहात? नाही हो. आमची ओवी असे काही करणार नाही. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती असे कधीच वागणार नाही." ओवीची आई रडत बोलत होती. ओवी मात्र शांतच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर तसूवरही भाव नव्हते. अनिकेत काय बोलतोय इकडे लक्ष देऊन ती ऐकत उभी होती हे अनिकेतच्या नजरेतून सुटले नाही.
"सगळे पुरावे ओवीच्या विरुद्ध होते; पण मी मात्र आणखीन पुरावे गोळा करण्यासाठी विचारपूस केली. सारे काही केले; पण त्यातील काही समजले नाही. त्यानंतर मात्र रोहनबद्दल समजले आणि त्याची चौकशी करण्यासाठी त्याच्या घरी गेलो. रोहनला तर अटक होणारच आहे; कारण मुलींना आपल्या प्रेमात ओढून त्यांची विक्री करण्याचा त्याचा जो काही छंद आहे तो आता उघड झाला आहे. त्याच्यावर केस नोंद झाली आहे. त्याला काय शिक्षा होईल माहित नाही." अनिकेत बोलत होता.
"हो अनिकेत जिजू, हा रोहनच आहे. जो अनघाताईच्या जीवावर बेतला असेल; कारण त्याचे अनघावर देखील प्रेम होते. आधी या ओवीताईला त्याने फसवले आणि तिचे लग्न झाल्यावर अनघा ताईच्या मागे लागला. तिचे लग्न होत आहे असे त्याला जेव्हा समजले तेव्हाच त्याने हा प्लॅन आखला असेल." अपूर्वा ओरडून बोलत होती. ती जणू रोहनला खुनी घोषित करत होती.
"एक मिनिटं अपूर्वा, शांत हो. रोहन हा खुनी नाही. खुनी वेगळाच आहे." अनिकेत वेगळ्याच ट्यूनमध्ये म्हणाला.
"खुनी कोणी वेगळाच आहे! कोण आहे तो घरातील आहे की बाहेरील आहे?" ओवीच्या आईने पुन्हा प्रश्न केला.
"ते तुम्हाला लवकरच कळेल. रोहनला भेटून झाल्यावरही मला खुनी लवकर सापडत नव्हता. खुनी खूप चालाख आहे. त्याने एका गोड पदार्थातून अर्थातच लग्नादिवशी तो गोड पदार्थ बनवला होता त्यातून ते विष कालवून ओवी रूममध्ये जायच्या आधी अनघाजवळ अनघासाठी म्हणून नेऊन ठेवले होते आणि जेव्हा ओवी गेली तेव्हा अनघाने तो पदार्थ खाण्यासाठी म्हणून घेतला होता. तो पदार्थ खाल्ल्यानंतर जेव्हा अनघा पडली तेव्हा ओवी खूप घाबरली होती त्यामुळे तिचे कुणाकडेच लक्ष नव्हते आणि तेव्हाच त्या व्यक्तीने ते जे काही भांडे होते ते उचलून लगेच बाहेर नेले; त्यामुळे आम्हाला कोणताच असा पुरावा सापडत नव्हता. ते भांडे लगेच विसळून ठेवल्यामुळे भांडे देखील सापडायला मार्ग नव्हता. सगळे पुरावे नष्ट झाले होते; पण म्हणतात ना जिथे पूर्ण अंधार असतो तिथे प्रकाशाची एक लकेर देखील पुरेशी असते. तसेच झाले आणि तसाच एक पुरावा मला सापडला. आणि या केसची दिशा बदलली." अनिकेत म्हणाला.
"अच्छा म्हणजे या सगळ्यांमध्ये ओवी गुन्हेगार नाही हेच खरे बरोबर ना?" ओवीची आई म्हणाली.
"हो अगदी बरोबर. ओवी ही गुन्हेगार नाहीच. गुन्हेगार तर ही आहे." असे म्हणून अनिकेतने तिच्याकडे बोट केले, तेव्हा सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. कोण असेल ती व्यक्ती म्हणून सगळेजण अनिकेतने बोट केलेल्या दिशेने पाहू लागले.
"अपूर्वा तू! तू केलेस हे! अगं, तुझी सखी बहीण होती ना ती." अपूर्वाची आई अपूर्वाला म्हणाली.
"पण तुम्ही असा आरोप अपूर्वावर कसा काय लावू शकता? आम्हाला हे काही पटले नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय तुम्ही असे कसे बोलू शकता?" अपूर्वाचे बाबा म्हणाले.
"बिना पुराव्याचे मी काहीच बोलत नाही. मला इथे अनघाची रूम पाहताना ते हे सोनचाफ्याचे अर्धे तुटलेले किचन सापडले. मला सुरुवातीला ओवीनेच हा खून केला असे वाटले, कारण असेच सेम किचन हे ओवीकडे देखील होते; पण जेव्हा परवा अपूर्वा आमच्या घरी आली होती तेव्हा तिच्या बॅगमध्ये असेच तुटलेले किचन मला दिसले आणि तेव्हाच माझी शंका खरी ठरली. रोहनने असेच सेम किचन ओवीला आणि अपूर्वाला दोघींना दिले होते. अपूर्वा ही ओवी आणि अनघा सोबत फारसी नसायची; पण अपूर्वाची मैत्रीण रोहनच्या शेजारी राहायची त्यामुळे हिचे तिकडे जाणे व्हायचे. तेव्हाच अपूर्वाची आणि रोहनची भेट झाली. जेव्हा अनघाने ओवी आणि रोहनबद्दल घरात सर्वांना सांगितले तेव्हा अपूर्वाला रोहन आणि ओवीबद्दल समजले. तोपर्यंत ती रोहनच्या प्रेमात अखंड बुडाली होती, त्यामुळे हे लग्न व्हावे म्हणून तिने देखील सर्वांची साथ दिली; पण जेव्हा अनघाला समजले की अपूर्वा देखील त्या रोहनच्या प्रेमात आहे तेव्हाच अनघा घरी सर्वांना सांगणार होती; पण तिचे लग्न असल्याने ती मोठा इशू नको म्हणून शांत राहिली. तिचे लग्न झाल्यानंतर ती या सगळ्या गोष्टी घरात सर्वांना सांगणार होती आणि त्याच भीतीने अपूर्वाने हे काम केले. बरं, हे सोनचाफ्याचे किचन एवढाच पुरावा नव्हता, तर मगाशीच तुम्हां सर्वांसमोर अपूर्वांने सांगितले होते की, ओवीताई आणि अनघा दोघी त्याच्यावर प्रेम करायच्या. अनघाचे देखील त्याच्यावर प्रेम होते हे अपूर्वा इतक्या कॉन्फिडन्सपणे कसे सांगू शकते? ओवीचे तर सर्वांना माहीत होते पण अनघाचे कुणालाच माहीत नव्हते. अनघाने असे कबूलही केले नव्हते, शिवाय ती रोहनला जास्त भेटली देखील नाही. मग ही गोष्ट अपूर्वाला कशी समजली? बोल अपूर्वा, तुझ्या तोंडून सारे काही ऐकायचे आहे." अनिकेत आवाज चढवत म्हणाला.
"हो. अनिकेत जिजू बोलत आहेत ते खरं आहे. मीच अनघाताईला मारले, कारण तिने मला धमकी दिली होती. जर रोहनबद्दल आणि माझ्याबद्दल तिने घरी सांगितले असते तर माझे शिक्षण अर्धवट ठेवून मला लग्न करावे लागले असते. जे मला कधीच नको होते. अनघाताईचे सुरुवातीला रोहनवर प्रेम होते; पण त्याची जी कारस्थाने आहेत मुलींना स्वतःच्या जाळ्यात ओढवून त्यांची विक्री करायची हे जेव्हा तिला समजले तेव्हा तिला रोहनचा तिरस्कार वाटू लागला आणि तिने त्याचा नाद सोडला. शिवाय ओवी ताईलाही या सर्वातून वाचवले; पण मी मात्र वेडी हे सगळे काही होऊनही त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला. तो कधीच कुणावरही प्रेम करू शकणार नाही, कारण मुलींचा फक्त वापर करून घ्यायचा एवढेच त्याला माहित आहे." असे म्हणून अपूर्वा रडू लागली आणि तेव्हाच ओवीला अनिकेतची खरी ओळख पटली. शिवाय रोहनबद्दल तिरस्कार वाटू लागला.
समाप्त.
समाप्त.
© प्रियांका अभिनंदन पाटील.
फोटो क्रेडिट: पूजा चौगुले.
फोटो क्रेडिट: पूजा चौगुले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा