सोनचाफा 2
ओवीला गाडीतून येताना दुरूनच आपले घर दिसू लागले. घराची ती गॅलरी जिथे त्या बहिणी मिळून छान खेळ खेळत होत्या. घरासमोरील तो मोठा अंगण; त्या अंगणात भातुकलीचा खेळ खेळता खेळता ती मोठी झाली होती. दुरूनच तिला अंगणातील फुललेले सोनचाफ्याचे झाड दिसले. ते झाड पाहून ती गालातच हसली; कारण तिला लहानपणापासूनच सोनचाफा खूप आवडायचा. सोनचाफ्याचे रोज एक फूल केसात माळल्याशिवाय तिला करमायचेच नाही. आजही ते सोनचाफ्याचे झाड फुलांनी खूप छान बहरले होते. जणू तिच्या स्वागतासाठीच ते उभे होते की काय असे भासत होते. घराजवळ जातात ती गाडीतून पटकन उतरली आणि आत गेली. हॉलमध्ये गेल्यावर तिची नजर तिच्या आईला शोधत होती. सगळे नातेवाईक, पाहुणे गप्पा मारत बसले होते. घरातील मंडळी आपापल्या कामात व्यस्त होते. काही जण बसले होते; पण त्या सगळ्यांमध्ये तिला तिची आई काही दिसली नाही.
ओवीला गाडीतून येताना दुरूनच आपले घर दिसू लागले. घराची ती गॅलरी जिथे त्या बहिणी मिळून छान खेळ खेळत होत्या. घरासमोरील तो मोठा अंगण; त्या अंगणात भातुकलीचा खेळ खेळता खेळता ती मोठी झाली होती. दुरूनच तिला अंगणातील फुललेले सोनचाफ्याचे झाड दिसले. ते झाड पाहून ती गालातच हसली; कारण तिला लहानपणापासूनच सोनचाफा खूप आवडायचा. सोनचाफ्याचे रोज एक फूल केसात माळल्याशिवाय तिला करमायचेच नाही. आजही ते सोनचाफ्याचे झाड फुलांनी खूप छान बहरले होते. जणू तिच्या स्वागतासाठीच ते उभे होते की काय असे भासत होते. घराजवळ जातात ती गाडीतून पटकन उतरली आणि आत गेली. हॉलमध्ये गेल्यावर तिची नजर तिच्या आईला शोधत होती. सगळे नातेवाईक, पाहुणे गप्पा मारत बसले होते. घरातील मंडळी आपापल्या कामात व्यस्त होते. काही जण बसले होते; पण त्या सगळ्यांमध्ये तिला तिची आई काही दिसली नाही.
ओवीला पाहून तिचे बाबा तिची विचारपूस करण्यासाठी तिच्या जवळ आले. "हे काय ओवी, तू आता आलीस! कधीपासून आम्ही सगळेजण तुझी वाट पाहतोय. जा, वरती अनघा तुझी वाट पाहत आहे." ओवीचे बाबा म्हणाले.
"बाबा, आई कुठे आहे? मला पहिल्यांदा आईला भेटायचंय." ओवीने बाबांना विचारले.
"अगं, ती आत मध्ये काहीतरी काम करत असेल. जा बघ जा." असे बाबांनी म्हणताच ओवी तिकडे जायला निघाली. आईला पाहून तिचे डोळे भरून आले आणि तिने आईला जाऊन मिठी मारली. तिथे सर्वांना भेटून झाल्यावर ती तिथेच गप्पागोष्टी करत बसली तेव्हाच ओवीची आई म्हणाली, "अगं, अनघा कधीची तुझी वाट पाहते आहे. आधी तिला भेटून ये बघू. ती सासरी गेल्यानंतर तुम्हा दोघींना काही भेटता येणार नाही." असे आईने सांगताच ओवी तिथून उठली आणि ती वर अनघाच्या रूममध्ये जाऊ लागली.
अनघा तिच्या रूममध्ये तिची तयारी करत होती. तिचा शालू नेसून झाला होता, केसांची हेअर स्टाईल आणि मेकअप करण्यासाठी पार्लरवाली आली होती. तिने तिचे सारे काही मेकअप केले होते. अजून मुहूर्तास बराच अवधी असल्याने रूममध्ये फक्त अनघा तेवढीच बसली होती. बाकी सर्वजण बाहेर होते. ओवी अनघाच्या रूममध्ये गेली आणि तिला अशी वधू वेशात पाहून तिचे डोळे भरून झाले. ती खूप भावुक झाली.
"अनु, इतकी का गडबड केलीस? माझ्या पाठोपाठ लगेच तुझी देखील पाठवणी! तुला इतकी गडबड होती का?" ओवी भावुक होत म्हणाली.
"तसे नाही ग दीदी. पण तुझे लग्न झाल्यानंतर घरातील वातावरणच बदलून गेले. सर्वांच्या मनात काय आले काही माहित? पण सर्वांनी लगेचच माझे लग्न करण्याचा विचार केला. मी त्या सर्वांना प्रतिकार करू शकले नाही. त्यांच्या म्हणण्याला मी देखील होकार दिला आणि आता हे चांगले स्थळ सांगून आले होते म्हणून लगेच होकार देऊन लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला. पण तू आत्ता येतेस! तुला चार दिवस आधी देखील येता आले नाही? इतकी संसारात तू रमली आहेस का?" अनघाने पुन्हा प्रतिप्रश्न केला.
"अगं, तुला तर माहीतच आहे ना? अनिकेतच्या आई पाय घसरून पडल्या; त्यामुळे त्यांना काहीच करता येईना. तिथे देखील कोणीच नव्हते. त्या म्हणत होत्या की मी हँडल करते. तुझी तू जा. पण तसे सोडून पण येता येत नाही ना ग? त्यामुळे मला येता आले नाही; पण आता आले आहे ना! तू पुन्हा येशील तेव्हा चांगले आठ दिवस मी राहीन मग तर खुश." असे ओवी म्हणताच अनघा धावत येऊन तिच्या मिठीत शिरली. बराच वेळ त्या दोघी तशाच अवस्थेत होत्या.
अनघा आणि ओवी या दोघींमध्ये वर्ष दोन वर्षाचेच अंतर होते. त्या चुलत बहिणी असल्या तरीही त्या दोघी सख्ख्या बहिणींपेक्षा सुद्धा जीव देणाऱ्या होत्या. लहानपणापासून त्या दोघी एकत्रच वाढलेल्या होत्या. भातुकलीचा खेळ असो की लपंडाव; त्या दोघी एकत्रच खेळत होत्या. शाळा, क्लासेस सगळीकडे दोघी एकत्रच असणार. ओवी अनघापेक्षा मोठी असल्याने ती अनघाची पूर्ण काळजी घेत होती. तिला काही अडले नडले तर ती मदत करण्यास जात होती. त्या दोघी बहिणी एकमेकांच्या गोष्टी एकमेकींसोबत शेअर करायच्या. अगदी कोणतीही गोष्ट असो ती सांगितल्याखेरीज त्यांना करमत नव्हते. त्यामुळे आता देखील सासरी जाणार म्हणून नकळत ओवीच्या डोळ्यातूनही पाणी आले. मुलीचे आयुष्यात असे असते. वयाची 20-22 वर्षे एकत्र घालवायचे आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या घरात जाऊन ते घर आपले म्हणून तिथे राहायचे. अनघा बराच वेळ ओवीच्या मिठीत होती. आता मात्र बराच वेळ झाला म्हणून ओवी अनघाला दूर करत होती; पण काही केल्या अनघा दूर जात नव्हती. तिने जोरात हिसका मारला आणि अनघा तिच्यापासून दूर गेली. अनघा बाजूला झाली आणि धाडकन खाली कोसळली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. अचानक घडलेल्या या प्रसंगाने ओवीला मात्र काय करावे ते समजेना. ती खूपच घाबरून गेली.
लग्नाचा मुहूर्त जवळ येत आहे आणि तुम्हाला सगळे खाली बोलावत आहेत असा निरोप सांगण्यासाठी त्यांच्यातलीच एक पाहुणी वर आली होती; पण अनघाला असे खाली पडलेले पाहून शिवाय तिच्या डोक्यातून येणारे रक्त पाहून त्या मुलीला मात्र काहीच समजेना. ती जोरात ओरडली. "ओवी ताई, तू हे काय केलेस?" आणि याच आवाजाने ओवी भानावर आली. तिला तर काहीच समजेना. अचानक घडलेल्या प्रसंगाने तीदेखील खूपच घाबरली होती आणि त्याच घाबरल्यामुळे तिने जोरात किंकाळी फोडली. त्या दोघींच्या आवाजाने खालील सगळी मंडळी वर आले आणि सर्वांना ते पाहून खूपच मोठा धक्का बसला. हे असे अचानक झाले तरी कसे? हा प्रश्न सर्वांच्या मनात घुमसत होता. ना कसला आवाज, ना कसला वाद आणि अचानक ही अनघा पडून तिच्या डोक्यातून रक्त आले तरी कसे? हा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत होता.
सर्वजण कुजबुजत होते. अनिकेत आणि ओवीच्या घरचे सगळे धावतच आले. अनघाच्या आईने तर टाहो फोडला. तिचे बाबादेखील रडू लागले. आपल्या लेकीचे लग्न आत्ताच काही मिनिटात होणार होते आणि ती अशी सोडून गेली असे म्हणून तिची आई रडू लागली. तिथे असलेले सर्वजणच ओवीवर आरोप करत होते. करणारच ना! कारण अनघा जेव्हा कोसळली तेव्हा तिथे ओवी आणि अनघा दोघीच होत्या.
"ओवी, तू हे काय केलंस?" अनघाची आई म्हणाली तशी ओवी आणखीनच घाबरली. तिथे जे काही घडले ते सर्वकाही अनपेक्षित होते. ओवी खूप घाबरली होती. तिला तिचे आईवडील धीर देत होते.
"आईबाबा, हे मी नाही केलं. आई, यात माझी काहीच चूक नाहीये. हे कसं घडलं मला काहीच समजलं नाही ग. मी काहीच केलं नाही." असे म्हणून ओवी रडू लागली. तिला तिचे आईबाबा धीर देत होते. इतक्यात तिथे अनिकेत आला.
"थांबा. बाॅडीला कुणीही हात लावू नका. आधी व्यवस्थित तपासणी होऊ दे; मग तुमच्या ताब्यात देण्यात येईल." असे इन्स्पेक्टर असलेल्या अनिकेतने म्हणताच पुन्हा कुजबुज सुरू झाली. अनिकेत त्या सर्वांचे तपासणी करत होता इतक्यात कुणीतरी पोलीस स्टेशनला फोन लावला. अनिकेत जवळ पाहून त्या बॉडीची तपासणी करत होता. अनघाचा देह काळा निळा दिसत होता. नक्कीच तिच्या पोटात विष गेले असणार हे त्याने ताडले. पण नक्की ही हत्या होती की आत्महत्या? हे मात्र त्याला समजू शकले नाही.
अनिकेतने त्या खोलीभर नजर फिरवली. खोलीतील सगळे सामान जिथल्या तिथे होते. त्या खोलीतील कोणतेच सामान विस्कटले नव्हते याचा अर्थ तिथे काहीच वाद वगैरे झाला नव्हता; पण या रूममध्ये, या दोघींमध्ये असे काय घडले असेल? अनघाने इतकी टोकाची भूमिका का घेतली असेल की तिला भरीस ओवीने पडले असेल? काहीच कळायला मार्ग नव्हता. ओवी तर बिचारी खूप घाबरली होती. असा विचार अनिकेत करत होता इतक्यात तिथे पोलीस आले. पोलिसांच्या मदतीने त्याने अनघाच बॉडी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली आणि तो तपासणी करायला लागला. त्याने आजूबाजूला पाहिले तर तिथे सगळ्या वस्तू जिथल्या तिथे होत्या. फक्त अनघाच्या मेकअपचे सामान आणि तिच्या साड्या तेवढेच वर होते; याचा अर्थ ह्या रूममध्ये कोणतीच झटापट झाली नव्हती असे त्यांने ताडले. मग ओवीने येऊन असे काय केले असेल, त्यामुळे अनघाचा अशाप्रकारे मृत्यू झाला असेल? हा प्रश्न अनिकेतला सतावत होता. तिचे शरीर काळे निळे पडले होते याचा अर्थ तिने विष प्राशन केले होते; पण नक्की तिनेच प्राशन केले होते की ओवीने तिला दिले असेल की यामध्ये इतर कोणा व्यक्तीचा समावेश असेल? अशा विचारात अनिकेत तिथेच उभा होता. आता फॉरेन्सिक लॅबमधून काय रिपोर्ट येतो याची तो वाट पाहत होता.
ओवी तर काही सांगण्याच्या मनःस्थितीत नव्हती; त्यामुळे तिला काही विचारून फायदा नव्हता त्यामुळे तो इतर ठिकाणी तपासणी करत होता.
क्रमशः
क्रमशः
© प्रियांका अभिनंदन पाटील.
फोटो क्रेडिट: पूजा चौगुले.
फोटो क्रेडिट: पूजा चौगुले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा