सोनेरी नात्यांची वीण भाग 2
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
ऋषी काळजीत होता. रिटा सोबत लग्न केल्याने तो आणि आर्या सुखी होतील का? समजूतदारपणाचे कोणतेच लक्षणं त्याला रिटा मधे दिसत नव्हते. अतिशय अल्लड अशी ती. कस होईल? त्यात आर्याच्या मम्मी कडून खूप अपेक्षा होत्या.
आता पुढे.
ऋषी कार मधे बसला होता. आर्याची त्याला खूप काळजी वाटत होती. ती अगदी निरागस आहे. कस होणार? रिटा बरोबर मी आधी बोलून ही बघितलं नाही. ती प्रेमळ आहे की नाही? लहान मुलांना सांभाळू शकेल की नाही माहिती नाही? तिच्या कडून का अपेक्षा ठेवा. माझी लेक मी बघणार.
असं काय नशीब आहे समजत नाही. सगळं काही पैशाने विकत घेता येत नाही हेच खरं. सगळं काही चांगलं व्हायला हवं.
त्याला मायाची खूप आठवण येत होती. दोघ कॉलेज मधे सोबत होते. ते लव मॅरेज होतं. अतिशय सुखात दिवस गेले. दोघ खूप खुश होते. आर्याचा जन्म झाला. तेव्हा पासून माया आजारी होती. ऋषी तिची खूप काळजी घेत होता. परदेशात ही ट्रीटमेंट घेतली. त्याच आजारात तीच निधन झालं तेव्हा आर्या अगदी सहा महिन्याची होती. घरच्यांनी तिला सांभाळलं. ऋषी वर्ष दोन वर्ष डिप्रेशन मधे होता. हळूहळू त्याने स्वतःला कामात गुंतवून घेतलं.
माया शिवाय माझ्या मनात, हृदयात कोणाला जागा नाही. तो नवीन नात्यासाठी तयार नव्हता.
आई आजारी झोपून आहे. आजीच वय झालं. पूनम सासरी जाईल. आर्या लहान. शेवटी आजीच्या आग्रहाला स्वीकारून तो लग्नाला तयार झाला.
मामा, मामी बर्याच वेळा इथे येत असतं. ते आशाताईंना सांभाळून घेत होते. ते आले म्हणजे त्याही खुश होत्या. त्यांचा आग्रह होता रिटाचं लग्न इथे व्हावं.
ऋषीने खूप समजावलं हे माझ दुसर लग्न आहे रिटाचं पहीलं. तरी घरचे ऐकत नव्हते. त्याला वाटलं सगळं सांभाळलं जाईल.
रिटाचं नुकतच कॉलेज झालं होतं. ती जरा अल्लड होती. तिचे स्वप्नं वेगळे होते. त्यात तीच कॉलेज मधे एक प्रकरण ही होतं. एवढ्यात ब्रेकअप झाला होता. तिला सिनेमात कामाची आवड होती. त्या संदर्भात ती एक दोघांना भेटली होती. तिला कसतरी मामा मामीने लग्नाला तयार केलं होतं.
"आई तो ऋषी दादा आहे. मी त्याच्याशी लग्न कस करणार? तो मोठा आहे." रिटा चिडली होती.
"मूर्खा सारखी बोलू नकोस. वयात एवढाही फरक नाही. तो तुझी आत्याचा मुलगा आहे. नातेवाईकांमधे राहशील. लोक चांगले आहेत सांभाळली जाशील. श्रीमंतीत लोळशील सोन्याचा चमचा तोंडात राहील. गप्प बस आणि लग्नाला तयार हो. त्याला ऋषी म्हणत जा. दादा नाही. " मामी ओरडली.
रिटाला वेगळेच वेध लागले होते. माझं आयुष्य मी काहीही करेन.
शेवटी व्हायचं तेच झालं. नकार देवून रिटा पळून गेली. तिला तिच्या मित्राने सिनेमात काम करायची ऑफर दिली.
******
ऋषी त्याच्या आलिशान ऑफिस मधे मीटिंग मधे बिझी होता. सकाळ पासुन त्याने दोन ऑर्डर मिळवल्या होत्या. लंच ब्रेक घेतला नव्हता. मनीष इतर स्टाफ नुसता आजुबाजुला होता. सगळे दमले होते. इतकं काम होत. पण कोणाची त्याच्या समोर बोलायची हिम्मत नव्हती.
"ऋषी बाकीच्यांना जेवायला सुट्टी दे. वेळ झाला. " मनीष म्हणाला.
"सॉरी किती वाजले? मला समजल नाही." तो केबिन मधे आला. त्याने कॅन्टीन मधून ऑर्डर दिली. फोन वाजत होता. घरून फोन होता. पूनम होती. त्याने फोन उचलला.
"रिटा पळून गेली." पूनम सगळं सांगत होती. ऋषीने फोन ठेवला. त्याने जेवून घेतलं. त्याला काही वाटल नाही. तो शांतपणे पुढच्या मीटिंग साठी गेला. तस ही त्याला त्या लग्नात अजिबात इंट्रेस्ट नव्हता.
******
आजी, आशाताई, मामा, मामी, पूनम खोलीत बसले होते. सगळे रिटा बद्दल बोलत होते.
"काय करावं कार्टीने तोंड काळ केलं. " मामी रडत होती.
मामा फोन वर बोलत होते. सगळीकडे चौकशी सुरू होती.
"एकतर मोठ्या मुश्किलीने इतकं चांगलं स्थळ मिळालं. त्यात हे अस." मामी म्हणाल्या.
मधेच आजी उठल्या. त्या घाईत होत्या.
" आजी कुठे चालली आहेस?" पूनम विचारत होती.
"एके ठिकाणी काम आहे. आलीच."
" मी सोबत येवू का? "पूनम विचारत होती.
" नको."
" ते डेकोरेशन वाले आले आहेत त्यांना काय सांगू. " पूनमला वाटल लग्न मोडलं. आता या डेकोरेशनचा काही उपयोग नाही.
" उद्या सांगितलेल्या मुहुर्तावर लग्न होईल. फक्त नवरी वेगळी असेल. " निर्मला आजी म्हणाल्या.
मामा मामी एकमेकांकडे बघत होते.
" आजी एक चान्स द्या. मी रिटाला शोधून आणतो. " मामा म्हणाले.
"नाही आता त्याची गरज नाही. एकदा पळून गेलेली मुलगी इथली सुन होणार नाही. " निर्मला आजी निघाल्या. ड्रायवरला त्या पत्ता सांगत होत्या.
*******
पाठकांच्या घरी दुपारचे जेवण झाले होते. मीनलताई, मोहनराव पुढच्या खोलीत पडले होते.
" अहो गोळ्या घेतल्या का?"
" हो. " मोहनराव आजारी होते. मीनलताई त्यांच्याकडे लक्ष देवून होत्या. त्यांना दोन मुल होते. सोनल, राजेश.
पुढे काय होईल? आजींच्या मनात असलेलं स्थळ त्यांना होकार देईल का? बघू पुढच्या भागात.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा