सोनेरी नात्यांची वीण भाग 13
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
ऋषी ही तयार झाला. लग्नाला होकार तर दिला पुढे कस होईल त्याला समजत नव्हतं. त्यात आर्या अजिबात ऐकत नव्हती. तिला मम्मी हवी होती. तो आशाताईंच्या रूम मधे आला. आता पुढे...
" तयार झाला बेटा? " त्यांनी हळूच विचारलं. त्या ऋषीकडे प्रेमाने बघत होत्या.
" हो आई, पण तू अजून तयार नाहीस?"
" मी येत नाही." आशाताई म्हणाल्या.
"अस कस चालेल? आटोप." तो आग्रह करत होता.
" तुम्ही जा. मी इथेच तुमची वाट बघेल. लवकर या. उगीच परत ती व्हील चेअर काढा. सगळे बघत असतात कोण आलं. तिथे ही मला इतक्या वेळ बसता येत नाही. त्यापेक्षा मी घरी बरी. " आशाताई म्हणाल्या.
" तुला काही झालं नाही आई. तू ना एक्टीव रहात जा. बघ तुला छान वाटेल."
" हो आता नवीन सूनबाई आली की तिच्या सोबत वॉकसाठी जाईल. "
सगळे काय सोनल बरोबर वेळ घालवायचे स्वप्नं बघत आहेत. मला का काहीच वाटत नाही?
" आईने नाश्ता केला का?" त्याने नर्सला विचारलं.
तिने नाही सांगितलं. " त्या ऐकत नाहीत."
" तो शिरा इकडे द्या. चल आई पटकन खायचं हं. अजिबात गडबड नकोय." ऋषी हक्काने म्हणाला.
" मला नको. काही खाल्ले जात नाही ऋषी. झोपूनच तर असते. कश्याला हवा शिरा. " आशाताई म्हणाल्या.
" थोड इकडे तिकडे करत जा आई. किचन मधे जात जा. मला आवडतो तसा मसाले भात तू कधीचा केला नाही. "
" हो रे करेल. तब्येत साथ देत नाही. आता तुझी आवड निवड तुझ्या बायकोला सांगत जा." त्यांच्या डोळ्यात कौतुक होतं.
" तू ठरवं सगळं होईल आई. चल पटकन हे खा. आपल्याला ताकद हवी ना." ऋषी मुद्दाम त्यांना एक्टीव्ह करायचा प्रयत्न करत होता. तो छोटे छोटे घास देत होता.
" ऋषी तू आज फार छान दिसतोय." त्या नजर काढत म्हणाल्या.
तो काही म्हणाला नाही.
" खूप खुश रहा बेटा. येणार्या मुलीला सांभाळून घे. झालं ते गेलं विसर. तिच्या तुझ्या कडून काही अपेक्षा असतिल." आशाताई ऋषीला सांगत होत्या.
"आई मी प्रयत्न करेन. तू माझ्या सोबत चल ना? "
"नाही बेटा. मी अशी. माझे आशिर्वाद तुझ्या सोबत आहेत. तू आजीच ऐकून खूप चांगलं केलं. मी सोनलला भेटली आहे. चांगली मुलगी आहे."
सगळे सोनल बद्दल चांगलं बोलतात. रिटा बद्दल अस कोणी बोलत नव्हतं. उलट तिला सगळे वेळोवेळी ओरडत होते. सोनल समजूतदार दिसते आहे. मग तिचा डिवोर्स का झाला? श्रीमंत स्थळ बघून तिने दोन तासात होकार दिला. ती स्वार्थी असेल का? बरोबर... तिची पैशाची अपेक्षा असेल. यासाठी ती आजी कडून पन्नास लाख रुपये घेणार आहे. तिच्याकडे ही लक्ष द्यावं लागेल. ऋषी विचार करत होता.
"एक काम होतं. तू करशील की नाही माहिती नाही." आशाताई म्हणाल्या नंतर गप्प बसल्या.
" अस का म्हणतेस आई. सांग ना. तुला माहिती आहे माझ्यासाठी तुझा शब्द अंतिम आहे. तू आज्ञा करायची. " ऋषी म्हणाला.
" बेटा रिटा सापडत नाही. मामा काळजीत आहे. ती पोरगी कुठे आहे समजत नाही. वरती एक फोन कर ना. म्हणजे तपास जोरात सुरू होईल. " त्यांना माहिती होतं ऋषीच्या एका फोनने मोठे मोठे काम सहज होतात. पोलीस स्टेशन, पॉलिटिक्स मधे त्याला खूप मान होता. लोक सहज त्याचं ऐकत होते. पैसे असला की जग समोर झुकत. ऋषी अतिशय चांगला, श्रीमंत उद्योगपती म्हणून प्रसिद्ध होता.
" काय करणार रिटाला शोधून? ती तिच्या मनाने गेली ना? मग का बळजबरी परत आणताय?" ऋषीने विचारलं.
" हो रे. पण ती कुठल्या संकटात सापडायला नको." आशाताई म्हणाल्या. त्यांना भावाची काळजी होती.
" ती काही लहान नाही. विचार करून निर्णय घेतला असेल. ठीक आहे आई, तू म्हणते म्हणून मी फोन करतो. पण आता तू... मामा, मामी आणि रिटा पासून दूर रहा. आपला त्यांचा काही संबंध नाही. " ऋषी म्हणाला.
आशाताई भावाला सोडू शकत नव्हत्या. पण ऋषीच ही बरोबर होतं. रिटाने सगळा गोंधळ घातला होता.
ऋषी पार्किंग मधे आला. संग्रामने दरवाजा उघडला.
"अरे तू गावाहून आला का? बर झालं. घरी सगळे कसे आहेत? काकांना घरी सोडल का?"
ते अॅडमिट होते म्हणून संग्राम त्याचा बॉडीगार्ड गावाला गेला होता.
"हो बाबा ठीक आहेत साहेब."
" काही लागलं तर सांग."
" हो साहेब."
कार मधे आर्या, आजी त्याच्या जवळ बसल्या होत्या. पूनम पुढच्या सीट वर होती. ते निघाले. पूर्ण रस्ता आर्या बडबड करत होती. ते मंदीरा जवळ आले. आजी, पूनम, आर्या आत गेले. ऋषी कार मधून सामान घेत होता.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
