सोनेरी नात्यांची वीण भाग 14
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
आशाताईंना भेटून ऋषी, आर्या, पूनम मंदिरात आले. आजी, पूनम, आर्या आत गेले. बघू आता पुढे काय होतय...
रस्त्यावर अचानक थोडा गोंधळ झाला. ऋषी तिकडे बघत होता. एक मुलगी एका काकांना रस्ता क्रॉस करून देत होती. त्यांच्या जवळ एक कार जोरात येवून थांबली.
" हा रस्ता आहे. गार्डन नाही. इथे असे आरामात फिरताय. आता काही करता काही झालं असतं म्हणजे लोक कार वाल्यांना दोषी धरतात. आम्हाला मारतात." तो कारवाला जोरात म्हणाला.
"या काकांना दिसत नाही. त्यांना रस्ता क्रॉस करून देत होते. जरा तरी माणुसकी ठेवा. मुळात मंदिराच्या पार्किंग मधे तुम्ही एवढ्या जोरात गाडी का चालवताय?" ती चिडली. दोघांच भांडण झालं. ती मुद्देसूद बोलत होती. सगळे मधे पडले. ती कार गेली.
ऋषी बघत होता. ही कोण आहे? सुंदर मुलगी आहे. लाल साडी नेसली आहे. ही नवरी सारखी तयार झाली आहे का? ही तर सोनल नसेल ना? त्याला का माहिती नाही पण तिला बघून छान वाटलं. चांगली मुलगी वाटते आहे. रिटा सारखी नाहिये.
मी हिला कुठे तरी बघितलं आहे. ओह ही तीच आहे त्या दिवशी मंदिराच्या प्रोग्राम मधे आजीं सोबत होती. खूप काम करत होती. त्या दिवशी ही साध्या ड्रेस मधे खुप सुंदर दिसत होती. आज तर अगदी कमाल झाली. ही फारच सुंदर आहे. चांगली वाटते आहे.
ती त्या काकांशी खूप प्रेमाने बोलत होती. तिने त्यांना आत मंदिरात सोडलं. तिला कोणीतरी बोलवायला आलं. ती पटकन आत निघून गेली. ती जाई पर्यंत ऋषी तिच्याकडे बघत होता.
ऋषीने आवाज दिला... संग्राम. त्याने सामान घेतलं. पार्किंग मधून तो दिलेल्या रूम मधे आला. मनीष आलेला होता. तो सगळी व्यवस्था नीट आहे की नाही याबद्दल मॅनेजरशी बोलत होता.
लग्न मंदिराच्या परिसरात होतं. मागच्या बाजूला हॉल होता. आजी ट्रस्टी ग्रुप मधे होत्या. तिथे असे बरेच हॉल होते. छान व्यवस्था होती. आज तिथे अजुन दोन तीन लग्न होते. बरेच पाहुणे इकडे तिकडे करत होते.
तस तर हा प्रोग्राम फाईव्ह स्टार हॉटेल मधे ही होवू शकत होता. पण आजींनी मंदिर परिसर निवडला. खरच तिथे खूप छान वाटत होतं. ऋषी ही ओके होता. साध्या पद्धतीने हे लग्न होणार होतं.
सोनल आत बसलेली होती. मीनलताई तिच्या सोबत होत्या. नंदा लक्ष देवून होती.
"चला मुलाकडचे आले." रसिका बोलवायला आली. मीनलताई बाहेर गेल्या. स्वागत झालं.
ऋषी इनामदार कसे दिसत असतिल? सोनल विचार करत होती. खिडकीतून बघू का? नको. कोणी बघितलं तर कस वाटेल.
आता का तुला उत्सुकता वाटते आहे? एक मन म्हणालं.
अस काही नाही. जे होईल ते बघत बसायचं. नाही तरी त्यांचा माझा काही संबंध नाही. दुसरं मन म्हणालं.
काल आई फोटो दाखवत होती तो तरी बघितला असता. तिला थोड हसू आलं. माझ्यात किती पटकन बदल झाला. काल मी किती विरोध केला. आज मला ते कोण आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. एकदाही भेटलो नाही. डायरेक्ट लग्न होतय. त्यांना ही हे आवडत असेल का? त्यांना ही माझ्यात इंट्रेस्ट नसेल तर? इथे ही परीक्षा आहे. सगळीकडेच स्वतः ला सिद्ध कराव लागेल. सहज काहीच मिळत नाही.
ती बाहेरचा आवाज घेत होती. आजींचा आवाज ओळखीचा होता. बाकी काही समजत नव्हतं.
रसिका उगीच इकडे तिकडे करत होती. मधेच ती नवरदेवाच्या रूमकडे ही थोडी जावून आली. पूनम कामात होती. आर्या तिथे होती.
"नवीन मम्मी कुठे आहे डॅडी? तू म्हणाला होता ती इथे आहे." आर्या इकडे तिकडे बघत होती.
"येईल थोड्या वेळाने. तिला फक्त मम्मी म्हणत जा. नवीन मम्मी नाही." ऋषी म्हणाला.
हो.
आर्या बाहेर खेळत होती. मनीष, ऋषी खुर्चीवर बसलेले होते. ते चहा घेत होते. संग्राम बाजूला उभा होता.
पूनम, आजी कामात होत्या. आजी खुर्चीवर बसुन सूचना देत होत्या. पूनमला सवय नसल्याने काही काम जमत नव्हतं. हे दुसर लग्न असल्याने विशेष प्रोग्राम नव्हते. डायरेक्ट लग्न लागणार होतं.
" पूनम अग हे पूजेचं साहित्य या ताटात नाही त्या ताटात ठेव. मी पण दमते. एकदाच या ऋषीचं लग्न झालं म्हणजे सोनल वर सगळं सोपवून मी मोकळी होईल. मग तुम्ही राजा, राणी काहीही करा. मला काही सांगू नका. मी आता अध्यात्मात मन रमवणार आहे." आजी बडबड करत होत्या.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा