Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 16

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 16

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

राघव, पूनम मधले गैरसमज काही दूर होत नव्हते. दोघ एकमेकांना समजून घेतील का? बघू पुढे...

"चल ऋषी. हातपाय धुवून घे. " आजी बोलवत होत्या. गुरुजी तयारी करत होते. तो फ्रेश होऊन आला. समोर उभा राहिला. तो इकडे तिकडे बघत होता. सोनल अजून का आली नाही? ती मुलगी सोनल होती ना? इथे खूप लग्न आहेत. ती तिथली नवरी तर नसेल ना? त्याची दोन मिनिट धडधड वाढली. कुठे तरी मनातून वाटत होत ती इथली नवरी असू दे. त्याला ती आवडली होती. त्याची उत्सुकता वाढली होती. तो ही नवरीच्या रूमकडे बघत होता.

"नवरीला बोलवा." गुरुजींनी आवाज दिला.

" चला सोनलताई." रसिका बोलवायला आली.

सोनल आरश्यात बघत होती. जावू की नको? तिला काही सुचत नव्हतं. बाहेर कोण आहेत काही समजत नाही. हे मी बरोबर करते की चुकीच? तस मला कोणी विचारलं नाही. सगळ्यांनी त्यांचा निर्णय माझ्यावर लादला. मी बाबांसाठी हे करते. त्यांच ऑपरेशन झाल्यावर बघू. पटलं तर रहायचं नाहीतर मी माझं बघून घेईल.

नंदा तिच्या सोबत होती. तिने सोनलचं सामान नीट ठेवलं.

सोनल बाहेर आली. सगळे तिच्याकडे बघत होते. नवरी फार गोड दिसते आहे. आजी समाधानी होत्या. त्या हसुन मीनलताईं कडे बघत होत्या. "नेहमी प्रमाणे सोनल खूप छान दिसते आहे. दोघांचा जोडा अगदी शोभेल." त्या म्हणाल्या.

"मूल सुखी व्हायला हवी. बाकी आपल्याला काही नको." मीनलताई मनापासून म्हणाल्या.

"हो तसच होईल. आजचा मुहूर्त खूप चांगला आहे." आजी म्हणाल्या.

पूनम दोन मिनिट बघत राहिली. होणारी वहिनी खरच छान आहे.

ऋषी तिच्याकडे बघत होता. चला बर झालं सोनल इथे आहे. सुंदर तर ती आहेच. वागायला ही चांगली आहे. तिचा काही प्रश्न नाही. त्याला त्याच्या विचाराचं आश्चर्य वाटलं. काल पर्यंत तो मायाच्या आठवणींवर जगत होता. आज अचानक त्याला पार्किंग मधे बघितलेली सोनल इथे हवी होती. त्याला गिल्टी वाटतं होतं. त्याने खाली बघितलं.

आर्या खूप खुश होती. मम्मी... तिने हाक मारली. सोनलने तिच्याकडे बघितलं. ती छान हसली.

तिने आर्याकडे बघून तिने दिलेलं स्माईल बघून त्याला बर वाटलं.

सोनल अंतरपाठाच्या दुसर्‍या बाजूने उभी राहिली. तिची समोर बघायची हिम्मत नव्हती. तस ही ऋषी इनामदार दिसत नव्हते. आता मी आणि माझा नशीब. कोण असेल माहिती नाही. मी फारच रिस्क घेतली.

त्यांची मुलगी खूप गोड आहे. मुलगी लहान आहे. बालवाडीत असेल. म्हणजे ऋषी पस्तीसचे असतिल. तिने हिशोब केला.

आर्या पूनमचा हात सोडवून सोनल जवळ येवून उभी राहिली. मंगलाष्टके सुरू झाली. सोनलने एकदम देवाला नमस्कार केला. जस असेल तस यावेळी तरी माझं चांगल होवू दे देवा.

नाहीतरी माहेरी सगळा आनंदी आनंद आहे. आई, बाबा सोडले तर दादा, वहिनी मधे मला इंट्रेस्ट नाही. त्यांना ही मी तिथे रहायला नको आहे. रोजचे भांडण होतात. मला शांत छान आयुष्य मिळणार नाही का?

शेवटच मंगलाष्टक सुरू झालं. दोघांच्या हातात हार दिले. लग्न लागलं अंतरपाठ दूर झाला. तो तिच्याकडे बघत होता. ती अजूनही खाली बघत होती. गुरुजींनी आवाज दिला. तिने पुढे होवून त्याला हार घेतला. त्याने ही लगेच हार घातला. एकमेकांना पुष्प गुच्छ दिला. गुरुजींना त्यांचे हातात हात दिले. आता तिने थोड त्याच्याकडे बघितलं. हळूच हात सोडवून ती बाजूला उभी राहिली.

" डॅडी मला फ्लॉवर्स?" आर्या विचारत होती.

सोनलने लगेच तिचे फुल आर्याला दिले. दोघं खुर्चीवर बसले.

" मम्मी मी पण..." ती सोनलच्या सोबत होती. तिच्या बांगड्या बघत होती. साडीला हात लावत होती.

सोनलला काही सुचत नव्हतं. तीच लग्न काही पहिल्यांदा होत नव्हतं. तरी वेगळीच धडधड वाढली होती. मधेच आधीच लग्न आठवत होत. सुभाष... त्याला माहिती असेल का की आज माझ लग्न आहे. तो इथे आला तर? गोंधळ घातला तर? ती उगीच थोडी घाबरली. त्याची आठवण काढायला नको. तसही इथे इनामदारांची सिक्युरिटी खूप आहे. मला ही सोबतीला नंदा आहे. ती पण खूप बोल्ड आहे. एका मिनिटात तिने रसिका वहिनीला शांत केलं.

ऋषी इनामदार इतके भारी, हॅन्डसम असतिल वाटल नव्हतं. तिला दोन मिनिट तिच्या विचाराच हसू आलं. आज तर ते खूपच छान दिसत आहेत. तो कुर्ता त्यांना शोभतो आहे. त्यावर घेतलेला दुपट्टा माझ्या साडीला मॅचिंग आहे का?

असे हीरो चित्रपटात असतात. हे जसे दिसतात तसे वागायला असतिल का? डॅशिंग. एवढ्या मोठ्या बिझनेसचे बॉस. श्रीमंत लोक. खरच छान आहेत.

मागे एक सिरियल बघितली होती. त्यात एक हीरो होता अगदी असाच होता. मला तो खूप आवडला होता. मी त्याच्यासाठी सिरियल बघायची. विचार करायची याची बायको किती लकी असेल. तसेच हे आहेत आणि आता मी त्यांची बायको. पण सत्य परिस्थिती वेगळी आहे.

यांनी माझ्याशी लग्न का केलं असेल? त्यांच्या लेकीला आई हवी होती म्हणून का? की आजी म्हणाल्या म्हणून? की त्यांना जोडीदार हवा असेल? अस असत तर ते काल माझ्याशी बोलले असते. त्यांची होणारी नवरी पळून गेली म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं. ती कशी होती? नक्किच तरुण सुंदर असेल.

ऋषी समोर मी काहीच नाही. माझ्याकडे काहीच नाही. पैसा नाही, एकदम साधी नोकरी, बँक बॅलन्स नाही. पगार झाला नाही तर पंधरा दिवस ही मी काढू शकत नाही. बाबांची ट्रीटमेंट साधी करू शकत नाही म्हणून अस माहिती नसलेल्या लोकांना लग्नासाठी हो म्हणाले.

तिचे विचार थांबत नव्हते. ती बाजूला बघत होती. ऋषी आर्याशी बोलत होता. त्याचा आवाज ही इम्प्रेसीव होता. मॅगनॅटीक.

तो तिच्याकडे बघत ही नव्हता. तिला थोड दुःख झालं. मी माझ्या स्वप्नांच्या जगातून थोड बाहेर यायला हवं. हा एक समझोता आहे. कसलीच अपेक्षा ठेवायची नाही. हे असच होईल वाटतं. माझ्या सारखं यांच ही लग्न जबरदस्तीने लावलं आहे. पण मग हे माझ्याशी कधीच बोलणार नाही का? माहिती नाही... जावू दे निदान स्थळ तरी चांगल आहे.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all