Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 17

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 17

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषी सोनलच लग्न लागलं. नाही, नाही म्हणता म्हणता दोघांना एकमेकांबद्दल उत्सुकता आहे. ते हे नातं निभावतील का? पुढे बघू...

पूनम आली. तिने स्वतः ची ओळख करून दिली. ऋषी ते करणार नव्हता. तिला माहिती होतं. त्या सगळ्यांच्या मते ती गरीब साधी मुलगी होती. जिने काहीतरी स्वार्थ होता म्हणून लग्नाला होकार दिला होता. ऋषीने ही आजी म्हणाली म्हणून लग्न केलं असं होतं.

सोनल तिच्याशी बोलत होती. ही चांगली आहे. तिला बर वाटलं.

दोघ पूजेला बसले. गुरुजी सांगत होते हाताला हात लावा.

कसा लावणार? हे किती दूर बसले आहेत. माझा हात तरी त्यांच्या पर्यंत पोहोचतो का? सोनल ऋषीकडे बघत होती. तो पुढे बघत होता.

गुरुजींनी परत सांगितलं. ती थोडी त्याच्या जवळ सरकली. हाताला हात लावून बसली. तो त्याच्या बाजूने काही प्रयत्न करत नव्हता. माझं काही खर नाही. इथे ही स्ट्रगल दिसतो आहे. ती मनातल्या मनात म्हणाली.

पूनम मदतीला होती. आर्या, सोहम खेळत होते. दागिने आणायला पूनम रूम मधे गेली. तिने रूम लॉक केला नाही. तशीच घाईने परत आली.

ऋषीने सोनलला मंगळसुत्र घातलं. कुंकू लावलं. बाकी दागिने आधीच दिले होते. पूनमच्या मदतीने तिने जोडवे, साखळ्या घातल्या. सोनल फारच छान दिसत होती. अगदी मनापासून पूजा करत होती तर ऋषी करायच म्हणून करत होता.

सोनल मंगळसुत्राकडे बघत होती. आधीची डिझाईन वेगळी होती. ते मागेच मोडलं. तेव्हा पैसे लागत होते. बाबा अ‍ॅडमिट होते. आई म्हणत होती स्त्री धन आहे राहू दे. जिथे नवरा माझा नाही मंगळसूत्र सांभाळून काय करू? बाबांची तरी ट्रीटमेंट झाली.

या लग्नाच्या वेळी तरी हे मंगळसूत्र गळ्यात टिकायला हवं. ती विचार करत होती.

तुला खरच ऋषी सोबत रहायच आहे का? एक मन म्हणत होतं.

माहिती नाही पण हे लोक चांगले वाटत आहेत. शांत आयुष्य कोणाला नको असतं? दुसर मन म्हणालं.

त्यांना हे लग्न मान्य नसेल तर?

तर मग राहीलं. मी... आई, बाबा आम्ही सोबत राहू.

******

सुरेश मामा, सुलभा मामी मागे बसले होते. ते फक्त इकडे तिकडे बघत होते.

"आज या जागी आपली रिटा असती. आपले पाचही बोट तुपात असते. आपण इतक छान ठरवल होतं सगळं जुळवून आणलं होतं. रिटा ऋषीरावां सोबत सुखात लोळली असती. तर ती मूर्ख मुलगी पळून गेली." मामी चिडली होती.

" हो ना सुलभा. रिटाला समज जरा कमीच आहे. पण ही नवरी मुलगी छान आहे." मामा म्हणाला.

"हो या अश्याच असतात सुंदर अप्सरा. श्रीमंत मुलांवर सोडलेल्या. पैसा पोखरणे आणी स्वतःच घर भरणे हेच त्यांच काम असतं. तिच्या माहेरचे बघितले ना. किती साधे. कपडे ही नाहीत त्यांच्याकडे. इकडची श्रीमंती बघून एका पायावर तयार झालेले दिसत आहेत. " मामी बडबड करत होत्या.

" त्या ताई आजींची मैत्रीण आहेत. पोरीच्या घरचे चांगले वाटत आहेत. तिचे आई, बाबा शांत समजूतदार आहेत बघ. " मामा म्हणाले.

" तुम्ही गप्प बसा जरा. चान्स मिळला तर ऋषी रावांना भेटा. त्यांना वरती फोन करायला सांगा. रिटा भेटायला हवी. ती पोरगी घरी आली म्हणजे मी तिला अशी सुतासारखी सरळ करणार आहे. " मामी चिडल्या होत्या.

मामा, मामी आजीला भेटले." आम्ही निघतो. "

"जेवण करून जा." आजी म्हणाल्या.

" नाही नको. थोड कामं होतं. " मामी म्हणाल्या.

" हो तुम्हाला रिटाला शोधायचं असेल. " आजी म्हणाल्या.

"पोरीने नाक कापलं. तुम्ही तरी अस म्हणू नका. " मामा म्हणाले.

" हे चिडवल्या सारखं नाही का वाटत आजी? ठीक आहे तुमची वेळ आहे बोला. मी पण पुढे काय होणार आहे ते बघते. मुलीकडची मंडळी एकदम साधी दिसता आहेत. तुम्ही या लग्नाची एवढी घाई का केली?" मामीला राग आला होता.

" मग काय रिटा परत यायची वाट बघायची होती का? ठरवलेल्या वेळेत लग्न झालं. नाहीतर पाहुणे तसेच परत गेले असते. आजचा मुहूर्त खूप चांगला आहे. लग्न झालेलं दाम्पत्य खूप सुखात राहील मला खात्री आहे." आजी ही म्हणाल्या.

" आम्ही रिटाला शोधत होतो. थोड थांबल्या असत्या. तीच या इनामदार घराण्याला सुन म्हणून बरोबर होती. आम्ही तुमच्या थोड तरी बरोबरीच आहोत. आता अगदी गरीब श्रीमंत झालं ना. बरोबर आहे तुम्हाला असच हव होतं. म्हणजे सुनेवर वचक रहातो. पन्नास लाखात तुम्ही नवरी विकत घेतली. " मामी म्हणाल्या.

"सोनल इतकी हुशार, चांगली आहे तिच्याकडे बघायची गरज नाही. तीच आम्हाला सांभाळेल. " आजी म्हणाल्या.

" हो... थोडे दिवसात तिचे गुण दिसतील. " सुलभा मामीने तोंड वाकडं केलं.

"जावू द्या. आता वाद नको. आम्ही निघतो." मामा मधे पडले.

" तुम्ही टेंशन घेवू नका. काही लागलं तर सांगा. " आजी म्हणाल्या.

" हो तेवढं ऋषीला वरती फोन करायला सांगा." मामा म्हणाले.

" बर मी आठवण देते. " आजी म्हणाल्या.

मीनलताई सगळं ऐकत होत्या. त्या नाराज होत्या. बाकीचे पाहुणे कसे बोलत आहेत. जावू दे मला ह्यांची ट्रीटमेंट व्हायला हवी आहे. नवरा मुलगा किती चांगला दिसतो आहे. सोनल सुखात राहील मला खात्री आहे. तसं आजींवर ही खूप विश्वास आहे.


0

🎭 Series Post

View all