Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 18

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 18

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

मामा मामी नाराज होते. त्यांना नवरी पसंत नव्हती. रिटाची जागा तिने घेतली अस वाटत होतं. स्वतः च्या मुलीची चूक दिसत नव्हती. आजींशी दोन दोन शब्द झाल्यावर त्या बॅग घ्यायला गेल्या. आता पुढे.

मामी रूम मधे गेल्या. ओरडत बाहेर आल्या. " माझी बॅग कोणी उघडली. माझा नेकलेस चोरीला गेला. मला वाटलं होतं इथे असच होईल. काय लोक आहेत. शी... अगदी गरीब आणि चोर. आजी आता काहीतरी बोला. चोराला शोधा. तुम्हाला त्या लोकांची चूक दिसत नाही का? "

सगळे एकमेकांकडे बघत होते. आजी ही इकडे तिकडे बघत होत्या. असा प्रसंग त्यांच्याकडे कधीच आला नव्हता.

" सुलभा अग चोर नक्की कोण आहे ते अजून ठरायचं आहे. आधीच किती तोफांड करते. पण तू नेकलेस आणला होता का? " आजींना शंका होती. ही अशीच आली असेल. आता नेकलेस गेला अस ही सांगते आहे. तिला या लग्नात गोंधळ घालायचा आहे.

" हो आणला होता. " सुलभा मामी म्हणाली.

" मग तो नेकलेस घालायचा सोडून बॅग मधे का ठेवला होता? " आजी विचारत होत्या.

"ते रीटा पळून गेली म्हणून वाटलं इतकी तयारी नको करायला. " सुलभा मामी म्हणाली.

" काहीही असत बघ तुझ."

" मला सगळ्यांच्या बॅगची झडती घ्यायची आहे. हे काम नक्की मुली वाल्यांच आहे." सुलभा मामी मोठ्याने बोलत होती.

" काहीही बोलशील? बाकीच्यांना कमी समजतेस का? आधीच सांगते मला हे चालणार नाही. हे लोक आता आमचे व्याही आहेत. त्यांचा मान तो आमचा मान. " आजी चिडल्या होत्या. त्यांना माहिती होतं. सोनल कडचे गरीब असले तरी अतिशय चांगले लोक होते. त्या त्यांचा असा अपमान होवू देणार नव्हत्या.

सुलभा मामी ऐकत नव्हती. थोडा गोंधळ झाला.

मीनलताई मोहन रावांकडे बघत होत्या.

" हे सगळं कठिण आहे. "

" जावू दे शांत रहा. कर नाही त्याला डर कशाला?"

रसिका मात्र केव्हाची इकडे तिकडे करत होती. मधेच ती सोहम साठी जेवण घेवून आली होती. ती आर्या, सोहमला खावू घालत होती. दोघं मूल तिच्याशी छान बोलत होते.

सोनल ही बघत होती. बापरे हे काय सुरू आहे? आता काय होईल? तिला धडधड होत होती. हे रसिका वहिनीने तर केलं नसेल का? ती सारखी राजेश दादाकडे नेकलेस मागते. नाही, पण ती अशी नाही. आम्ही गरीब आहोत. चोर नाही. तरी सुध्दा रसिका वहिनीकडे काही सापडलं तर? माझं इथे सगळ्यां समोर काय राहील? अपमान होईल. सासरी कायम बोलतील.

आधीच्या अनुभवावरून तिला माहिती होतं सासरचे कसे असतात. अजिबात सोडत नाही. फार त्रास देतात. तिला अचानक घाम फुटला. खूप भीती वाटत होती. पाणी... ती हळूच म्हणाली. ऋषीने ऐकलं. त्याने वेटरला इशारा केला. तो पटकन पाणी घेवून आला.

ही सोनल का घाबरली? ऋषी बघत होता. त्याने रुमाल पुढे केला. तिने तो घेतला हळूच घाम टिपला.

" सगळ्यांनी बॅग दाखवा." सुलभा मामीचं अजून तेच सुरू होतं. ती मोठ्याने ओरडत होती.

पूनम, सोनल, ऋषि जवळ उभी होती. सोनलची चुळबुळ वाढली होती. काय करू यांच्याशी बोलू का? हे ऐकतील का? नको, उलट हे मलाच काही बोलले तर माझा अपमान होईल. नाहीतर हे माझ्याकडे दुर्लक्ष करतील. जस सकाळ पासून करत आहेत तसं.

" जे चाललं आहे ते थांबवा. मामा, मामी घरी जा. मनीष... मॅनेजरला सांगून मामीसाठी नवीन नेकलेस मागवून घे." ऋषीचा आवाज आला. सगळे गप्प बसले. शोधाशोध थांबली. मामा, मामी निघाले.

सोनलला आता बर वाटतं होत. यांनी एका मिनिटात हा प्रश्न सोडवला. वाह... हे खूपच पाॅवरफुल आहेत. पैसे असतिल तर काहीही करता येत. नाहीतर आमच्या कडे अस झालं असत तर सगळ्यांची झडती घेतली गेली असती. किती भांडण झालं असतं.

पण नक्की नेकलेस कोणी घेतला? ती विचार करत होती. ती मीनल ताईंकडे बघत होती. त्याही तिच्याकडे बघत होत्या.

सगळे जेवायला बसले.

"आर्या." ऋषीने आवाज दिला.

" डॅडी माझ जेवण झालं. त्या काकूंनी दिलं." रसिकाकडे बोट दाखवतात आर्या म्हणाली.

ऋषी रसिकाशी छान हसला.

ती ऋषी जवळ बसली. " डॅडी मला पापड दे."

"अस खेळत जेवायच नाही आर्या. चल इकडे ये." ती पूनम जवळ होती.

"दोघांनी एकमेकांना गोड घास खाऊ घाला." पूनम चिडवत होती. ऋषीने लक्ष दिलं नाही. तो त्याच त्याचे जेवत होता. सोनल ने ही नावाला थोड खाल्लं.

बापरे इथे तर मी करते त्यापेक्षा जास्त विरोध यांचा आहे. सहाजिकच आहे. अचानक सगळं झालं. त्यांची होणारी नवरी पळून गेली. यांना तिची आठवण येत असेल का? की पहिल्या बायकोची आठवण येत असेल? एवढं होत तर लग्न का केलं? जावू दे. मला काय. बाबांकडे बघायला हवं. त्यांची ट्रीटमेंट महत्वाची. या ऋषी इनामदार कडे दुर्लक्ष करायला हवं.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"