सोनेरी नात्यांची वीण भाग 25
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
पूनमला राघवशी बोलून छान वाटतं होतं. आजींनी तिची समजूत काढली. आता पुढे...
सोनल हॉल मधे नुसती बसली होती. ती घर बघत होती. हॉल मधे उंची फर्निचर होतं. सुळसुळीत पडदे. रंगसंगती ही मॅचिंग होती. आईला अस छान घर ठेवायची हौस आहे. जस जमेल, खर्च झेपेल तस ती करत असते. माझे आई, बाबा माझ्या सोबत इथे असते तर किती छान वाटल असतं. मी त्यांना मिस करते. इथे सगळं काही आहे माझे माणसं सोडून. काही सुचत नाही. करमत ही नाही. आत्ताशी येवून एक तास झाला.
आर्या तिथे खेळत होती. ती तिच्या फ्रेंड्स बद्दल सांगत होती. "मम्मी दिशा म्हणते अशी दुसरी मम्मी नसते. खरी मम्मी आपली असते."
"अस कोणाच ऐकायचं नाही बेटा. मी तुझी आहे." बाकीचे लोक ही काय लहान मुलांच्या मनात काहीही भरवतात.
" हो मम्मी. आपण गार्डन मधे जावू. गेम झोन मधे जावू. डॅडी कुठे आहे. आपण त्याला आपला प्लॅन सांगू." आर्या म्हणाली.
तुझ्या डॅडीला नको बोलवू. सोनल मनातल्या मनात म्हणाली. तिला अजूनही ऋषी समोर कस वागवं ते सुचत नव्हतं.
लताताई चहा घेवून आल्या. सोनल उठून उभी राहिली. "द्या मी देते."
"असू द्या मॅडम. तुम्ही बसा."
" ताई तुम्ही मला सोनल म्हणा."
"अस कस मॅडम? ते जमणार नाही."
त्यांचा चहा झाला. बर्याच दिवसांनी असा आयता चहा मिळाला. नाहीतर घरी रसिका वहिनी मुद्दामून माझा चहा ठेवत नव्हती. तिने ते विचार झटकले.
सोनल बघत होती. ऋषी काही दिसत नाहीत. ते नंतर खाली आले नाहीत. यांची रूम कोणती आहे काय माहिती? एवढा मोठा बंगला आहे. असतील कुठे तरी. त्यांनी चहा घेतला की नाही? जावू दे आपल्याला काय? विचारणार तरी कस. छोट्या घरात बर असतं. सगळे डोळ्यासमोर असतात. वेगळ बघायची गरज नसते.
" जा सोनल कपडे बदल. आराम कर. " आजी म्हणाल्या.
पूनम गेस्ट रूम मधे सोनलला घेवून आली.
"इकडे नाही. मम्मी माझ्या सोबत राहील." आर्या ऐकत नव्हती. ती तिला ओढत होती.
"ही तुझ्या मम्मीची रूम नाही आर्या. ती या नंतर तुझ्या डॅडीच्या रूम मधे राहील. ती आजच्या दिवस इथे खाली आहे. " पूनम सोनलला चिडवत म्हणाली.
" मी पण त्या दोघां सोबत राहील." आर्या म्हणाली.
" आज तिच्या सोबत रहा ग सोनल. तीच कधीच मम्मी मम्मी सुरू आहे. " आजी म्हणाल्या. त्या भावूक झाल्या होत्या.
सोनल आर्याकडे बघत होती. एवढीशी मुलगी आई शिवाय कशी राहिली असेल. मी इतकी मोठी आहे तरी मला अजूनही आई लागते.
सोनलने आर्याला कडेवर घेतलं. आजपासून हीच जमेल तितक मी करेन. मी तुला कधीच अंतर देणार नाही आर्या. माझ ऋषीच काय होईल माहिती नाही. पण मीच तुझी आई आहे बेटा. तिने मनातल्या मनात ठरवलं. तिची गोड पापी घेतली. आर्या ही तिच्या गळ्यात हात अडकवून खुश होती.
" आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत."
" येस मम्मी. तू छान आहेस. "
" मी माझ सामान इकडे ठेवते. आर्या तू माझ्या सोबत रहा."
" ठीक आहे मम्मी."
सोनलने बॅग उघडली. आर्या बघत होती काय काय आहे.
"यात काही नाही बेटा."
" तुला थोडे क्लोथ्स आहेत. माझ्याकडे खूप आहेत. आपण डॅडीला सांगून तुला अजून ड्रेस घेवू. "
" नको आर्या हे एवढे ड्रेस ठीक आहेत. " सोनल म्हणाली. उगीच यांना मी हावरट वाटायची. पैसे, कपडे, दागिने यासाठी लग्न करून आलेली.
तिने कपडे बदलले. दागिने काढून नीट बॉक्स मधे ठेवले. किती आहेत बघून घेतले. बॉक्स बॅग मधे ठेवला. बॅग लॉक केली. उगीच एखादा नेकलेस गेला तर काय होईल? सोन्याचे भाव किती वाढले आहेत. मला दिलेले नेकलेस इथे कोणी परत मागितले तर देणार कसे. माझे दोन तीन पगार एकत्र केले तरी एक नेकलेस येणार नाही इतका महाग वाटतोय. आहे ते जपलं पाहिजे.
मामीचा नेकलेस कोणी घेतला ते समजलं नाही. कोणी चौकशी ही करत नाही. असे कसे लोक आहेत. बहुतेक त्यांना काही फरक पडत नाही. आई म्हणाली तसं मी पण माझं सामान सांभाळायला हवं. नंतर आजींकडे हे दागिने देवून टाकू.
पूनम आली. ती सोनलला मदत करत होती. हेअर स्टाइल मधे खुप पिन होत्या. "वहिनी तू छान दिसतेस. हा ड्रेस मस्त आहे."
" साधा आहे."
"असू दे. तू अशी साधी सिम्पल छान आहेस. केसांना काय लावतेस?"
सोनल सांगत होती.
" तू एवढी शांत आहेस. कस काय?"
" माहिती नाही." आता हिला काय सांगणार. कोणी ओळखीच नाही. घरची परिस्थिती अशी. बाबांच्या ट्रीटमेंट साठी लग्न केलं. इथे काय बोलणार. मी शक्यतो कोणाला दुखवत नाही.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
