Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 26

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 26

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

साधी भोळी सोनल, तिला इनामदारांकडे सगळं सांभाळायला जमेल का? ती हक्काने तिथे राहील का? मेन म्हणजे ऋषीला ते चालेल का? आता पुढे.

" तू एवढी शांत कशी वहिनी?" पूनम विचारत होती.

" अस काही नाही पूनम ताई. गरीब परिस्थिती, वरचढ लोक त्यामुळे स्वभाव भित्रा झाला आहे. मला स्वतःला भांडण करायला आवडत नाही. प्रसंगी कमी पणा घेते." सोनल म्हणाली.

" आता त्याची गरज नाही. " पूनम म्हणाली.

" कसली?" सोनलला समजल नाही. ती तिच्याच विचारात होती.

" कमीपणा घ्यायची. तू आता मेन मेंबर आहेस वहिनी. इनामदार घराण्याची सुन. तुझा नवरा एकदम डॅशिंग आहे. शंभर लोकांना मीटिंग मधे एका वेळी गप्प करतो. एका वेळी सहा सात कंपनीच काम बघतो. त्याला सगळीकडेच काय सुरू असत ते माहिती असतं. त्याला कोणी फसवू शकत नाही. ऋषी दादा अतिशय समजूतदार आहे. तो बरोबर तुला सांभाळेल. आता दादा बरोबर छान रहा. मोकळी रहा."

सोनल विचार करत होती खरच हे माझ्याशी बोलतील? माझ्या बरोबर प्रेमाने संसार करतील? तस तर वाटत नाहिये.

" आधी आजीने तुझ्या बद्दल सांगितल होतं. तेव्हा मला ही वाटलं होतं तू कशी असशील? अचानक लग्न होतय. पण पहिल्या भेटीत आपल जमलं हो ना? " पूनम अजूनही खूप बोलत होती.

" हो पूनम ताई. " तसच ऋषीला ही वाटत असेल का की मी कशी असेल. एक गरीब मुलगी म्हणून त्यांना शंका असेल. यांच्या त्या होणार्‍या नवरी बद्दल विचारु का? जी पळून गेली. नको. मग त्यांच्या पहिल्या पत्नी बद्दल विचारू का? नको उगीच आगाऊ पणा करायचा नाही. पूनमशी ही नवीन ओळख आहे. जपून बोलायला हवं.

" वहिनी मला पूनम म्हण. मला ही सांग ना अस शांत छान कस वागायचं. मला ना काय करावं तेच समजत नाही. सारखा राग येतो. " पूनमला ही अस वागायचं नव्हतं. ती पण हे भांडण नीट करायचा प्रयत्न करत होती.

" हो आपण या विषयावर नंतर बोलू. तुझं लग्न झालं आहे ना? " सोनल तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघत होती.

" हो. " पूनम म्हणाली. तिच्या चेहर्‍यावर दुःख होत.

" काय झालं? "

" काही नाही. "

" ओह आज तुझे मिस्टर इथे आलेले दिसत नाही वाटतं म्हणून तू नाराज आहे का पूनम." सोनलला तिच्या आणि राघवच्या भांडणाबद्दल माहिती नव्हतं. तिला वाटल पूनम लग्नासाठी माहेरी आलेली आहे. ती उगीच तिला चिडवत होती.

" तस नाही वहिनी." हिला सांगू का आमच्यात वाद आहेत. नको पहिल्या दिवशी काय सांगणार. पूनम विचार करत होती.

" एक सांगते स्वतः ला बिझी ठेव. वेळ नसेल तर इतर गोष्टी सुचत नाहीत. " सोनल स्वानुभव सांगत होती.

" बरोबर आहे वहिनी. मी काम सुरू करते आहे. "

" जॉब मिळाला का? " सोनलने सहज विचारलं.

" माझ्या नावावर कंपनी आहे ना. तिथे काम सुरू करणार. सध्या दादा त्याची टीम ते काम बघतात. " पूनम सांगत होती.

मी विसरली होती. मोठे लोक मोठ्या गोष्टी. यांच्या नावावर कंपन्या आहेत. सोनल गप्प बसली.

आजी बोलवत होत्या. पूनम बाहेर गेली. ती काहीतरी कामात होती. आर्या सोनल जवळ बसुन ड्रॉइंग करत होती.

खरतर पहिल्या लग्नानंतर डिवोर्स वगैरे झाल्यानंतर सोनलने स्वतः ला शाळेत गुंतवून घेतलं होतं. कोणत्या गोष्टीचा विचार करायला वेळच नव्हता. घरी आल्यावर ही ती बिझी असायची. नोट्स काढणे. ट्यूशन घेणे त्यासोबत घरकाम ही होतं.

सुभाष का असा वागला असेल? मी त्याला कधीच काही म्हणाली नाही. त्याच्या घरच्यांचा जाच सहन केला. पैशासाठी त्याने मला अलगद घराबाहेर काढून लगेच दुसर लग्न केलं. त्याला तिकडून भरपूर हुंडा मिळाला अस ऐकलं होतं.

तिला या गोष्टीचा खूप त्रास होत होता. पैसा इतका महत्वाचा असतो? माणुसकी प्रेम काहीच नसतं का? बाकीचे तर जावू दे नवर्‍या कडून तिला ही अपेक्षा नव्हती. शेवटी तिने त्याच्या सोबत संसार केला होता.

आता परत तेच करायचं. नवरा फक्त वेगळा. यावेळी तरी काही धोका व्हायला नको. ऋषी बद्दल ती बरच ऐकून होती. बापरे यांच्यात एवढे गुण आहेत. हे खरच बिझी दिसता आहेत. त्यांच्या खूपच कंपनी आहेत वाटत. ते समजूतदार आहेत अस ऐकलं आहे.

त्यांचा माझ्यात काहीच साम्य नाही. ते श्रीमंत, मी गरीब. ते बिझनेस मॅन, मी टीचर. त्यांचे विचार कसे असतिल? मला समजून घेतील का? आम्ही थोड बोलायला हवं. पण ते तसा प्रयत्न करत नाही.

त्यांनी दादाला मदत केली तर बर होईल. दादाकडे फार प्रॉब्लेम आहे. तो किती हुशार आहे पण नोकरी नीट नाही. सोहमची शाळेची फी भरली नाही. आई बाबांची ट्रीटमेंट असते. वहिनी ही चांगले दिवस यायची वाट बघते आहे. दादाची कमाई वाढली तर मोठ घर घेता येईल. दादा वहिनी खुश रहातील.

पण मी अस यांना मुळीच सांगणार नाही. ते अजून तरी एकदाही माझ्याशी बोलले नाहीत. त्यांना हे लग्न पसंत नसेल तर? त्यांनी मला इथून जायला सांगितल तर? इथे माझचं नीट नाही दादा साठी कुठे बोलणार. तिला टेंशन आल होत.

नवरे असे असतात सगळ्यांना सपोर्ट करतात बायकोला सोडून. त्यापेक्षा आपलं आपलं शांत रहा. कोणाकडून काही अपेक्षा ठेवायची नाही.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"