सोनेरी नात्यांची वीण भाग 27
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
पूनमचा तरी सपोर्ट आहे नाहीतर एवढ्या मोठ्या घरात काही सुचलं नसतं. सोनल विचार करत होती. आर्या तिच्या सोबत होती. ऋषी बिझी होता. आता पुढे बघू... सोनल ऋषीची आज भेट होईल का?
ऋषीची मीटिंग संपली. त्याला वेगळचं वाटत होत. मीटिंग मधे ही त्याने गोडी गुलाबीत घेतलं होतं. नाहीतर त्याचा आवाज ऐकून सगळे घाबरत होते. बर्याच जणांना माहिती होत आज ऋषी साहेबांच लग्न झालं. सगळ्यांच्या चेहर्यावर गोड हसू होतं.
आज काय सुरू आहे? मला कसलाच राग येत नाही. पूर्ण जग छान आहे अस वाटतं आहे. खाली काय सुरू आहे? त्याला उत्सुकता होती. त्याने लॅपटॉप वर सीसीटीव्ही फुटेज ऑन केला.
अस बघायला नको. एक मन म्हणालं.
त्याने काय होतय? कोणाला थोडी समजणार आहे. दुसर्या मनाने त्याला सपोर्ट केला.
अस बघायला नको. एक मन म्हणालं.
त्याने काय होतय? कोणाला थोडी समजणार आहे. दुसर्या मनाने त्याला सपोर्ट केला.
तो बघत होता. हॉल मधे कोणी नव्हतं. किचन मधे काहीतरी काम सुरू होतं. लताताई काम करतांना दिसत होत्या. त्याला वाटत होत तीच दिसत नव्हती. सोनल कुठे असेल? गेस्ट रूम कडे गडबड दिसत होती.
बेडरूम मधे सीसीटीव्ही नव्हते. फक्त आशाताईंच्या रूम मधे कॅमेरा होता. आशाताई टीव्ही बघत होत्या. त्यांच्या खोलीत ही सोनल नव्हती.
आजी, पूनम गेस्ट रूम बाहेर दिसल्या. त्या काहीतरी बोलत बाहेर आल्या. आर्या, सोनल दिसल्या नाहीत. त्या आत असतिल वाटतं.
त्याचा फोन वाजत होता. मामा होता. त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. त्याने फोन बाजूला ठेवला. परत दोन मिनिटात कॉल आला. याच काय आहे आता? त्याने फोन उचलला. "बोल मामा."
" तू ते वरती फोन केला का? "
" नाही. मी बिझी आहे. उद्या करतो. ठेवू मग फोन?" ऋषी म्हणाला. तो अजूनही लॅपटॉप कडे बघत होता.
" ऋषी ऐक तरी. प्लीज बघ ना रिटा कुठे आहे? ती सापडायला हवी. हे काय सुरू आहे? मला आणि तुझ्या मामीला काळजी वाटते. तेवढी मदत कर." मामा रीक्वेस्ट करत होता.
"आता यावेळी फोन कसा करणार? उद्या सकाळी करतो म्हणालो ना." ऋषी वैतागला होता. काय पण ती गुणी रीटा. पळून काय गेली. अजूनही डोक्याला ताप आहेच.
मामी मागून काहीतरी म्हणाली असेल.
" ऋषी अरे आत्ता फोन कर. मी रीक्वेस्ट करतो. थांब सुलभाशी बोल. "
" मामीशी मी बोलत नाही. ठीक आहे मामा मी फोन करून बघतो. मग तुला सांगतो. " तस त्याने ठरवलं तर तो एका मिनिटात मामा मामीला झटकून टाकू शकत होता. पण जावू दे मोठे लोक आहेत. आई त्यांना मानते म्हणून तो गप्प होता.
" ऋषी थँक्स, तू खरच नेहमी मदत करतोस. तुला रीटाकडे बघायच आहे." मामा सहज म्हणाला.
"नाही मामा, माझा रिटाचा काही संबंध नाही. मी फक्त तू म्हणतोस म्हणून फोन करणार आहे. रिटाच्या काळजीने नाही. इतक लक्ष्यात ठेव. यापुढे अस काहीही बोलायच नाही." ऋषी चिडला. फाडफाड बोलला. त्याचा आवाज ऐकून मामा घाबरला होता. त्याने पटकन फोन ठेवला.
ऋषी फोनवर बोलत होता. ही चौकशी लवकर झाली तर बर होईल... हो डिटेल्स देतो... थँक्स.
" मामा रिटा बद्दल माहिती या नंबर वर पाठवून दे. " त्याने मामाला मेसेज केला.
" ठीक आहे. " मामा मेसेज करत होता. सुलभा मामी बाजूला बसली होती.
"तुझा नेकलेस मिळाला का?" मामाने विचारलं.
"हो, तो सोबत घेतला नव्हता. ऋषी कडून दुसरा नेकलेस ही मिळाला. चांगला दोन तोळ्याचा आहे. डिझाईन ही लेटेस्ट आहे. कानातले ही आहेत. " सुलभा मामी खुश होती.
" म्हणजे? आपला नेकलेस घरीच होता का?"
" हो अहो."
"मग तिकडे का अस केलं?"
" त्या सोनलच्या घरचे... ती ही चोर आहे असच आपल्याला भासवायचं आहे. " सुलभा म्हणाली.
" त्याने काय होईल? " सुरेश मामा एवढा हुशार नव्हता. त्याला मामीची आयडिया माहिती नव्हती.
" तुम्हाला काहीच कस समजत नाही हो. आता तर ते लग्न झालं. अजून खूप काही होवू शकतं. ऋषीच्या मनात अजून तरी त्या पोरीने जागा तयार केली नाही. त्याआधी त्यांनी काय काय केल ते त्याला दाखवलं म्हणजे आपलं अर्ध काम होईल. तो तिच्या सोबत रहाणार नाही. तो पर्यंत रिटा परत येईल. मग बघू... तिला आशाताईच्या मदती साठी बंगल्यावर पाठवता येईल. ती ऋषीच्या डोळ्यासमोर राहील. ती त्याची होणारी बायको होती. तो थोड तरी तिचा विचार करेलच. "
" अस झाल तर बर होईल." सुरेश मामा म्हणाले.
" हो होईलच... मी करेन. "
" त्या मूर्ख मुलीचा काही पत्ता नाही. आपण तिच्यासाठी इतके प्रयत्न करतो. ती कुठे फिरते आहे समजत नाही."
" ऋषीने फोन केला आता सापडेल." सुलभा मामी म्हणाली.
******
मीनलताई, मोहनराव, राजेश, रसिका ही घरी पोहोचले. रसिका आवरत होती. सोहम पुढे खेळत होता. मीनलताई रडत होत्या.
"आता काय झाल?" मोहनराव काळजीने त्यांच्याकडे बघत होते.
"सोनल सासरी गेली किती सुनं वाटत आहे."
"तीच चांगल झालं. आपण शोधून ही अस स्थळ सापडल नसतं. ते मोठे लोक. आपण त्यांच्या पर्यंत पोहोचू शकत नाही." मोहनराव म्हणाले.
"हो ते आहेच. पण तिची तिकडे कोणाशी ओळख नाही. अचानक हे झालं. पोरीला तिकडे करमेल ना? त्यात ते श्रीमंत लोक. गरीब म्हणून पोरीला त्रास दिला तर? " मीनलताई म्हणाल्या. त्यांना भीती वाटत होती.
" आजी खूप चांगल्या आहेत त्या सांभाळून घेतील. सगळं नीट होईल बघ. काळजी करू नकोस." मोहनराव म्हणाले.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा