सोनेरी नात्यांची वीण भाग 38
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
माहेरी आलेली सोनल काळजीत होती. ती आता रेग्युलर शाळेत जाणार होती. तिला तिचा जॉब टिकवायचा होता. तशी तयारी तिने केली होती. आर्या, सोनलला मिस करत होती. बहुतेक ऋषी ही... पण तो सांगत नव्हता. आता पुढे.
रात्री जेवताना आर्या खूप बडबड करत होती. आजी, पूनम तिच्याशी बोलत होत्या. आशाताई आत टीव्ही बघत होत्या. त्यांनी ही दोन तीन वेळा सोनल बद्दल विचारलं होत. पूनम, आर्या... दोघींनी सोनलला फोन लावला. ऋषी समोर बसला होता.
सोनलचं जेवण झालं होतं. पूनमचा फोन आलेला बघून तिला खूप छान वाटल." बोल ग पूनम. आर्या ठीक आहे ना? " तिने घाईने विचारलं.
" हो ठीक आहे. आर्या गुड गर्ल आहे. तिचं जेवण झालं. आता आम्ही झोपणार आहोत. सकाळी स्कूल आहे." पूनम सांगत होती.
"मम्मी तू केव्हा येशील?" आर्या रडवेला आवाजात विचारत होती.
" मी उद्या येईल बेटा." सोनलला कसतरी वाटत होतं.
"तू आजीकडे का गेली? "
सोनलकडे या गोष्टीच उत्तर नव्हतं. आर्या रडत होती.
" सॉरी बेटा. मी उगीच इकडे आली. तू शांत हो बर. आपण ना उद्या खूप छान सोबत वेळ घालवू. " सोनल तिच्याशी बोलत होती.
" मम्मी आत्ता घरी ये. "
"आता रात्र झाली ना. कस येणार बेटा. उद्या तू स्कूल मधून आली की मी येईल. प्रॉमीस. आता शांत झोप. यापुढे अस होणार नाही." सोनल तिला समजावत होती.
" डॅडी आपण आत्ता मम्मीला घ्यायला जावू. " आर्या मधेच म्हणाली.
ऋषी काही म्हणाला नाही.
बापरे हा फोन कॉल ऋषी इनामदार ऐकत आहेत. सोनल एकदम गप्प बसली. काही वेगळच तर मी बोलली नाही ना? बरोबर आहे आर्या लहान आहे. फोन स्पीकर वर असेल. आता सोनल काहीच बोलत नव्हती. तिने पटकन फोन ठेवला. तिला धडधड होत होती. फोन वर ही या माणसाची दहशत आहे.
ऋषी सगळं ऐकत होता. त्याला वाटल सोनल चांगली आहे. तो थोड्या वेळाने आर्याला झोपवायला आत घेवून गेला. तिचा एकच विषय सुरू होता. मम्मी, डॅडी, आर्या हॅप्पी फॅमिली आहेत. ऋषी तिची बडबड ऐकत तिथे बसून होता. गप्पा मारत मारत आर्या झोपली.
काल यावेळी सोनल इथे या रूम मधे होती. मी खरच निश्चिंत होतो. आर्याकडे बघावं लागलं नाही. दोघींच जमत आहे हे बर झालं. नाहीतर खूप प्रॉब्लेम झाला असता.
आर्यासाठी तरी सोनलकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आमच दोघांच काही झालं तरी ठीक आहे. पण आर्याला काही समजत नाही. तिला जपावं लागेल. तिच्या बालमनावर परिणाम होईल अस काही करायच नाही. तिच्या मनात सुखी कुटुंबाची कल्पना आहे. ठीक आहे तिला आईच प्रेम मिळेल. माझ्या लेकीसाठी तरी सोनलला सोडून देता येणार नाही. राहू दे तिला इथे. पण मला लगेच तिच्याशी बोलायला जमणार नाही.
थोड्या वेळाने तो रूम मधे गेला. तो बाल्कनीत उभा होता. माया... सगळा गोंधळ होतो आहे. मी काय करू समजत नाही? भूतकाळ धरून ठेवू की वर्तमानकाळाला स्वीकारू?
घरचे सगळे म्हणतात सोनल चांगली आहे. बरोबर आहे. ती नीट वागते. सुंदर आहे. आर्याची काळजी घेते. पण तरी ही मला हे जमणार नाही. आर्या तिला आपलं मानते. मी आर्या सारखा भोळा नाहिये. सोनल काय करते ते मला आधी बघावं लागेल. तो विचार करत होता.
मला वाटत तू विचार करतोस. हे तितके ही अवघड नाहिये. उगीच का स्वतः ला त्रास करून घेतोस. लग्न झालं ना? नीट रहा ना. सोनलला स्विकार. माया गेली. तिला ही वाटत असेल तू सुखी व्हावं. दुसर मन ओरडत होतं.
मला ही या अस्थिरतेचा कंटाळा आला आहे. तरी फॅमिली सिक्युरिटी महत्वाची. एक मन म्हणालं.
तुला काय वाटत सोनल चोर आहे? एवढी साधी मुलगी. ती पण अडचणीत असेल. डिवोर्स झाला. त्यात वडील आजारी. काय कराव तिला सुचत नसेल. दुसर मन म्हणालं.
तेच तर, तिचा डिवोर्स झाला. ती वागायला कशी आहे समजत नाही. सुरुवातीला सगळे गोड बोलतात. खरे रंग तर नंतर समजतात. मला थोडा वेळ हवा आहे. ती माझ्यासाठी नाही तर तिच्या वडलांच्या ट्रीटमेंट साठी इथे लग्न करून आली आहे. आर्याचं म्हणशील तर लहान मुले सगळ्यांना आवडतात. ती तिच्याशी नीट वागणारचं. स्वार्थ नसल्या शिवाय अशी कोणती मुलगी एका दिवसात लग्न करते? एक मन म्हणालं.
तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. अस वागलास तर तू कधीच सुखी होणार नाही. थोड सोडून द्यावं लागतं. दुसर मन त्याला समजावत होतं. तो आत आला. जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही. तो झोपायचा प्रयत्न करत होता. सकाळी ऑफिस आहे.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
