Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 40

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 40

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

पूनमला न सांगता राघव दिल्लीला निघाला होता. तिला समजत नव्हतं तो अस का करतो आहे. दोघांमधले गैरसमज वाढत चालले आहेत. त्यांचे प्रॉब्लेम मिटतील का? आता पुढे.

ऋषी पूनमकडे बघत होता." तुमचं हे काय सुरू आहे? "

" तू बघतो ना दादा आता मी राघवला काही म्हणाले का? तोच माझ्याशी बोलत नाही. काही सांगत नाही. आता ही एअरपोर्टवर आहे. दिल्लीला जातो आहे. मला वाटतं मला इथे रहावं लागेल. राघवने ठरवलं आहे वाटत त्याला माझ्या सोबत रहायचं नाही. तो आजकाल माझ्याशी बोलत नाही. " पूनम रडवेली झाली होती.

" अस काही नाही. उगीच टेंशन घेवू नकोस. मी आहे ना. मी राघवशी बोलेल. " ऋषी म्हणाला.

"मुलींच आयुष्य कठिण असत दादा. किती का श्रीमंत असे ना की गरीब. त्यांना स्वतः च घर नसत. नवरा काय म्हणतो? काय नाही? ते बघत बसायचं. तो ठरवेल ते होईल. राघव मुद्दाम अस करतो आहे. म्हणजे मी हट्ट सोडून घरी परत जाईल. हा प्रॉब्लेम मिटेल. परत तिकडच्या लोकांचा त्रास आहेच. " पूनम चिडली होती.

" हे सगळं तुझं आहे सोनल. माझ्या सोबत तुझा ही या प्रॉपर्टी वर बरोबरीचा हक्क आहे. मला कोणी नाही, घर नाही... अस बोलू नकोस. तुला काय हव ते सांग? हे घर तुझ्या नावावर करू का?" ऋषी म्हणाला.

"मला हव ते देशील? " पूनम म्हणाली.

" हो. "

"वहिनीशी नीट वाग दादा. तिला असा त्रास देवू नको. मला माझ्या वरून समजत ना. नवर्‍याचा सपोर्ट हा हवाच. ती आज जॉबला जॉईन झाली. तिला या लग्नात सिक्युरिटी वाटत नाही." पूनम म्हणाली.

ऋषी सोनलचा विचार करत होता. तिला ही अस अस्थिर वाटत असेल का? कोणाचा आधार नाही. लग्न तर झालं पण मी तिच्याशी बोलत नाही. वडील आजारी, त्यांची ट्रीटमेंट कशी होईल याची तिला काळजी असेल. म्हणून तिने अस घाईत लग्न केलं असेल. ओळख नसून तिला इथे येवून रहावं लागेल. तीची गोष्ट वेगळी आहे. ते काय आहे मी नंतर बघेल. या दोघी गोष्टींना एकत्र करून चालणार नाही.

पूनमला त्रास होता ते ऋषीला सहन होत नव्हत पण तो ही असच करत होता. तो सोनलला समजून घेईल का?

आजी ही ऐकत होत्या. पूनम, राघव, सोनल, ऋषी अस काय करतात समजत नाही. अजिबात समजुतीने घेत नाही. त्यांच्यात नुसते भांडण सुरू असतात. हेच सोनेरी दिवस असतात. हे गेले तर परत येत नाही. परत जोडीदार किती महत्वाचा असतो आम्हाला विचारा. किती ही सांगा त्यांना समजत नाही. जावू दे. त्यांना त्यांचा अनुभव येवू दे.

आजी पूनमला समजावत होत्या. ऋषी कॉफी घेत होता.

पूनम ऋषी सोबत ऑफिसला गेली.

"आज साहेब इकडे कसे आले." सगळे बघत होते. जाधव काका पुढे आले. ते ती कंपनी सांभाळत होते.

"पूनम आजपासून इथे काम करेल."

"हो साहेब."

" तिला पूर्ण काम शिकवा. डीसीजन मेकर तुम्ही आहात. ती फक्त ट्रेनी असेल. काही वाटल तर मला विचारा." ऋषी भराभर सूचना करत होता.

" हो साहेब."

पूनमच ट्रेनिंग सुरू झालं. तिला त्या कंपनी मधे सोडून ऋषी मेन ब्रांचला आला. तो ही खूप बिझी होता. दोन तीन दिवस सुट्ट्या झाल्या होत्या. खूप काम पेंडींग होत. खूप डीसीजन घ्यायचे बाकी होते. एक दोन मॅनेजर सह्या घ्यायला उभे होते. मनीष त्याच्या सोबत होता. एका मागून एक मीटिंग सुरू होत्या.

"तू लग्न झाल्यानंतर असा तिसर्‍या दिवशी ऑफिसला आला वहिनी चिडल्या नाहीत का?" मनीषने सहज विचारलं. नॉर्मल लग्न झालेल्या माणसाला असच वाटेल.

सुरवातीला ऋषीला काही समजलं नाही. " ओह. काहीही आपलं मनीष. सोनल माहेरी गेली."

" अच्छा म्हणून तुला यायला जमलं. तुझं स्वातंत्र गेलं. आता घरचे म्हणतील तेच करा ." मनीष त्याला चिडवत होता.

"अस काही नाही. ऑफिस आणि घर वेगवेगळं आहे. मला हव तेच मी करेन. इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मेहताच्या ऑर्डरचं काय झालं?" ऋषी नेहमी प्रमाणे एटीट्युड मधे म्हणाला.

" ती ऑर्डर आपल्याला मिळेल. आपण पुढे आहोत. " मनीष माहिती देत होता.

" हो ते काम व्हायला हव." ऋषी त्या लोकांना मेल करत होता.

" सोनल वहिनी तस आपल्याला लकी आहेत. काल पासून खूप पेंडींग पेमेंट येत आहेत. ज्यांच्याकडून आशा नव्हती त्यांनी पण पेमेंट दिले आहे." मनीष म्हणाला.

"असं लकी वगैरे काही नसतं मनीष. हे आपण एवढं काम केलं आहे म्हणून त्या लोकांनी पेमेंट दिला. तस ही त्यांनी पेमेंट नाही दिला तरी आपण त्यांना मटेरियल दिलं होतं. त्यांची मदत केली होती. त्याचा विचार करून ते पेमेंट आलं आहे. ही लकी ती लकी अस करु नकोस. " ऋषी म्हणाला.

" ठीक आहे ऋषी, तुझ असं म्हणणं असेल तर काही हरकत नाही. पण बर झालं तु हे लग्न केल. तुझं आणि आर्याच लाइफ आता सेटल होईल. आधी मला वाटल होतं तू घाई केली. पण सोनल वहिनी शांत, समजूतदार आहेत." मनीष परत म्हणाला. मनीषला फोन आला तो बाहेर गेला.

ऋषी नुसताच विचार करत होता. खरंच सोनल घरी आली तर चांगलं वाटतं आहे. आर्या सुद्धा खुश आहे. आई, आजी पूनम एकदम उत्साहात आहे आणि काल ती घरी नव्हती तर करमलं नाही. होतं असं. नवीन व्यक्ती घरी आली की कुतूहल वाटतं. त्यात काय? तो त्याच्या कामाला लागला.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"