Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 43

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 43

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

पूनमचा त्रास बघून सोनलला जूने दिवस आठवले. कठिण परिस्थितीचा सामना तिने केला होता. तिची तिथून कशीतरी सुटका झाली होती. आता हे लग्न झालं. पण अजूनही सुखाचे दिवस दिसत नव्हते. आता पुढे...

सुभाष आणि तिचे भांडण संपत नव्हते. कोणी माघार घेत नव्हतं. शाळेतून घरी जायचं म्हणजे सोनलच्या अंगावर काटा येत असे.

लग्नाला सहा महिने झाले. एक दिवस घरी पाहुणे आले होते. शाळेत इन्स्पेक्शन होतं. सोनलला घरी रहाणं शक्य नव्हतं. ती स्वयंपाक करून शाळेत गेली. पाहुण्यांना जेवण वाढायचं काम राहील होत. तो दिवस तिचा खूप बिझी गेला. तिच्या वर्गावर इन्स्पेक्शन झालं. ते सर इम्प्रेस झाले होते. त्याने शाळेला फायदा होणार होता. शिक्षक चांगले आहेत. सगळे तीच अभिनंदन करत होते.

तिला घरी यायला थोडा उशीर झाला. तिला खूप आनंद झालेला. ती ही बातमी कोणासोबत शेअर करू शकत नव्हती. ते कोणी तिला समजून घेत नव्हते.

घरी आलेले पाहुणे गेले होते. सुभाष पुढे बसलेला होता. त्याने तिला घरात येवू दिलं नाही.

"अहो अस काय करताय? मला घरात येवू द्या. मग आपण बोलू. तुम्ही आधी माझं अभिनंदन करा. मला काहीवेळस वरचा वर्ग मिळू शकतो. मला आज खूप महत्वाचं काम होतं." सोनलला काय कराव सुचत नव्हतं. ती त्याला सगळं सांगत होती.

" तुझ्या शाळेच मला काही सांगू नकोस. ह्या काम न करायच्या पळवाटा आहेत. बाकी काही नाही. तुला माझं ऐकायचं नाही ना मग नीघ इथून. रोज तीच कटकट. तू हुशार असशील तुझ्या घरी. माझ्या समोर शहाणपणा चालणार नाही. इथे कोणाच काही करत नाही. ऐकत नाही." सुभाष खूप बोलत होता.

" आज इन्स्पेक्शन होतं. मी सांगितलं होतं ना. माझ्या ही कामाला तुम्ही महत्व द्यायला हवं. मुलांना शिकवायचं चांगलं काम आम्ही करतो. एक पिढी आम्ही घडवतो. मुलांवर चांगले संस्कार करतो." सोनल म्हणाली.

"मला भाषण ऐकायचं नाही. शहाणपणा नकोय. मला तू इथे डोळ्यासमोर नकोय. माझा हात चालेल. नीघ इथून." त्याने तिला माहेरी पाठवून दिलं. तिने किती फोन केलं. तो नीट बोलत नव्हता.

" नोकरी सोडली की परत ये. " त्याने हट्ट सोडला नाही.

नोकरी सोडली की काय होणार आहे? कितीही केलं तरी आपण कोणाला खुश करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला हवं तेच केलेल बर. असा सोनलने विचार केला.

" मी नोकरी सोडली तरी तुमच्या घरचे दुसरा मुद्दा काढतील. त्यांना आपण दोघ खुश रहायला नको आहे. पण मला आता अस वाटत खरा प्रॉब्लेम आपल्यात आहे. नवरा बायको म्हणून आपणचं एकमेकांना समजून घेत नाही. आपल्यात प्रेम नाही. कोणी कितीही मधे मधे केल तरी आपण ठाम नाही ना. तुम्हाला मी सोडून सगळे बरोबर वाटतात. कधी माझी नोकरी, तर कधी हुंडा. त्यांना बरोबर मुद्दा मिळतो. त्या मला बोलत असतात." सोनल म्हणाली.

"बरोबर आहे. नाहीतरी तू काय घेवून आलीस? हे स्थळ तुम्हाला स्वस्तात मिळालं. तुझ्या माहेरचे लोक फारच हुशार आहेत." सुभाष म्हणाला.

"अस का बोलताय? लग्न हा व्यवहार नाहिये. ते प्रेमाच नात आहे."

" माझ्यासाठी नाही. माझी फसवणूक झाली आहे . " त्याने तिला ठकललं. ती त्याला समजावत होती काही फायदा झाला नाही.

" मी जाते. तुम्हाला एक दिवस या बद्दल पस्तावा होईल. " सोनल थोडसं सामान घेवून निघाली.

" काही पस्तावा होणार नाही. अशी शहाणी बायको मला नको. ना रंग ना रूप काही येत नाही तिला. गळ्यात लोंढणं बांधुन दिलं. "

सुभाष बद्दल तिला काही प्रेमाचे शब्द आठवत नव्हते. आठवत होत ते फक्त वाद भांडण. त्याची आठवण आली की अंगावर काटा येत होता. कित्येक रात्री तिने रडून काढल्या होत्या.

माझा काही दोष नव्हता तरी त्याने अलगद मला त्याच्या आयुष्यातून बाजूला केलं. एवढ्यात दुसर लग्न ही केलं. आता चोवीस तास आईची सेवा करणारी आणली असेल. आता तरी सासुबाई खुश असतिल ना? की परत त्यांची काही तक्रार असेल. काय माहिती? मला काय करायच आहे.

माहेरी येवून काय झालं? घरी ही भाऊ, वहिनी राग राग करत होते. उठता बसता टोमणे. आई बाबा काय ते जीव लावत होते. जावू दे. विचार करायला नको.

तिने थोडा वेळ आराम केला. जुन्या गोष्टी आठवून तिला त्रास होत होता. डोक दुखत होतं.

******

"मम्मी मम्मी..." आर्या तिच्या आजुबाजुला खेळत होती. "भूक लागली."

"हो चल... लताताई आर्याच ताट वाढा."

"हो पाच मिनिट मॅडम."

"चल आर्या तुझी आत्तू काय करते ते बघू." त्या दोघी पूनमच्या रूम गेल्या.

"येवू का?"

" हो ये ना वहिनी."

"आराम झाला का?"

" हो."

" चल जेवायला. अशी गप्प राहू नको. त्रास कोणाला नसतो. सांग ना." सोनल म्हणाली.

पूनम सोनलकडे बघत होती. खर आहे हिने काय काय सहन केल असेल. अजूनही तिचा त्रास कमी होत नाही.

*******

रात्री जेवायची वेळ झाली तरीसुद्धा ऋषी ऑफिसहून आला नव्हता. तो अजूनही बिझी होता. मनीष आत आला. " घरी जायचं नाही का? आता तर वहिनी घरी आल्या असतिल. "

"तू नीघ, मला थोडा वेळ लागेल. एवढी मेल करतो. " ऋषी म्हणाला. खर तर त्याला घरी जावून काय करावं ते सुचत नव्हतं.

मनीष घरी गेला.

ऋषी सोनल बद्दल विचार करत होता. ती घरी आली असेल का? मग आता काय आमचा संसार सुरू होईल? तो सीसीटीव्ही बघत होता. डायनिंग टेबल जवळ आर्या बसलेली दिसत होती. पूनम, लताताई बोलत होत्या. आजी ही होत्या.

सोनल कुठे गेली? ती खरच घरी आली नाही की काय? तिला नक्की माझा राग आला असेल. नाहीतर तिला ही हे लग्न नको असेल. पैशासाठी तिने हो म्हटलं असेल. बर झालं आठवलं तिला पैसे द्यायचे आहेत. आजीने सांगितले आहे. आजीसाठी तरी मला हे करावं लागेल. कोणाची ट्रीटमेंट केली तर त्यांचे आशीर्वाद मिळतील.

तेवढ्यात त्याला सोनल समोरून येतांना दिसली. ती आर्याच ताट घेवून आली. साध्या ड्रेस वर ती छान दिसत होती. ती आर्याला काहीतरी सांगत होती.

अरे वाह ही परत आली म्हणजे हिला माझ्या सोबत रहायचं आहे वाटत. पण मला जमणार नाही. कितीही प्रयत्न केला तरी राॅंग नंबर मॅडम. सत्यनारायण पूजेच्या वेळी ही ती माझ्या जवळ सरकत होती का? त्याला थोड हसू आलं. त्याने लॅपटॉप बंद केला तो घरी यायला निघाला.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all