Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 44

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 44

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषीने सोनल बद्दल गैरसमज केला होता. तो तिला समजून घेईल का? आता पुढे.

सोनल आर्याला खाऊ घालत होती. ती टीव्ही बघत होती.

"ही अशी सवय चांगली नाही आर्या. तुझ्या हाताने जेवत जा. काय हवं ते सांगायचं. उद्या पासून मी तुला ओरडणार आहे."

" हो मम्मी."

" जे केल आहे ते खायचं. सारखं गोड मागायचं नाही. हे बघ बाकीच्यांना एवढं ही जेवण मिळत नाही." सोनल म्हणाली.

" बाकीच्यांना जेवण का मिळत नाही मम्मी?" आर्याने विचारलं.

" तुला अजून समजणार नाही. थोड सांगते त्यांच्याकडे पैसे नसतात. कठिण परिस्थिती असते. त्यामुळे जेवणाला रीस्पेक्ट करायचा."

"हो मम्मी."

ही इनामदारांची राजकन्या, पण मी तिला स्पाॅईल कीड होवू देणार नाही. ती एक जबाबदार मुलगी म्हणून वागेल. मोठी होईल. तिने तिला पोळी तोडून दिली. ती हळूहळू जेवत होती.

सोनल, पूनम जेवायला बसले. बोलू की नको? सोनलची चुळबुळ सुरू होती.

" काय झालं सोनल? सुरुवात कर."

" आजी हे?" सोनलने विचारलं. तिच्या माहेरी रात्रीच्या जेवणासाठी सगळे सोबत असायचे. हे घरी आले की नाही काही माहिती नाही.

"हो ना दादा अजून आला नाही. तुला जेवण जाणार नाही का?" पूनम म्हणाली. ती हसत होती.

"काहीही पूनम. पण फार वेळ झाला ना. म्हणुन विचारलं. " सोनल म्हणाली.

"हो ऋषी दादाच असच असतं. ऑफिसला वेळेत जातो. संध्याकाळी लवकर येत नाही." माया गेल्या पासून त्याने स्वतःला कामात जुंपून घेतल होत. तो दिवसरात्र मेहेनत घेत होता.

" तो रात्री उशिरा घरी येईल. मग तू त्याला जेवायला वाढून दे. तेव्हा हॉल मधे कोणी नसतं. " पूनम हळूच म्हणाली.

सोनल थोडी लाजली होती. तस सगळं नीट असत तर मी आज पासून यांच्या सोबत राहिली असती.

आजी फोनवर बोलत होत्या. त्यातून समजलं ऋषी थोड्या वेळाने येणार आहे. त्यांच जेवण झालं.

सोनल जरावेळ आशाताईं जवळ बसली होती. त्या थोडं तिच्याशी बोलत होत्या. आजीने लताताईं जवळ पेज दिली. ती पेज थोडीशी सोनलने खाऊन बघितली.

"याला अजिबातच चव नाही. बघू तुमची फाईल." सोनल फाईल बघत होती. त्यात आशाताईंना विशेष काहीच झालेलं नव्हतं. अपचन पोटाचे विकार अस काहीतरी दिसत होतं.

" आईंना अस जेवण का देता? म्हणून त्या खात नाहीत. मी थोड नीट करून आणू का?" सोनल म्हणाली.

" त्यांना पथ्य आहेत."

"ठीक आहे मी डॉक्टरांशी बोलेल. आता तरी त्यांना या सोबत अजुन काही देता येईल का?"

" हो फळ ज्यूस. "

" आई तुम्ही चालत का नाहीत. म्हणजे पूर्वी पासून असच होत का? " सोनल विचारत होती.

" नाही ग मी ओके होते. आता पायात जोर नाही. " आशाताई म्हणाल्या.

" जेवण नाही म्हणून असेल. रोज थोडी हालचाल करत जा."

"हो. "

आशाताईंचे जेवण झालं. सोनल त्यांच्या पायाला तेल लावून देत होती. त्या नको म्हणत होत्या. तिने ऐकलं नाही. तिची बडबड ऐकून त्या छान हसत होत्या.

" आई ज्यूस प्या. थोडा तर आहे."

" हो बेटा जा आराम कर. सकाळी शाळा असेल. " आशाताई म्हणाल्या.

" मॅडम मी उद्या लंच बनवते. डबा न्यायचं विसरू नका." लताताई म्हणाल्या.

"थँक्यू लताताई."

******

थोड्या वेळाने ऋषी आला. आजी पुढे बसलेल्या होत्या. तो इकडे तिकडे बघत होता.

"सोनल आत आहे." त्या म्हणाल्या.

"आर्या कुठे आहे? तिच्यासाठी मी विचारतो आहे." ऋषी म्हणाला.

" बर... ती पण आत आहे. " आजी सांगत होत्या.

" मी तिच्या रूम मधे जावू का? " त्याने विचारलं. उगीच तिथे सोनल असायची.

" हो जा. अस का विचारतोस. "

पूनम तिला झोपवत होती. दोघी बोलत होत्या.

"डॅडी..." आर्या तो आल्यामुळे खुश होती.

" जेवण केलं का माझं बाळ? " त्याने तिला जवळ घेतलं.

" हो डॅडी, मम्मी आजीकडून परत आली. मी भाजी ही खाल्ली. मम्मी ने सांगितलं फूड वेस्ट करायच नाही. कोणाला जेवायला मिळत नाही."

" बरोबर. तुझी टीचर आली होती का?"

" हो होमवर्क झाला. ती बघ उद्याची बॅग ही पॅक केली. " आर्या बॅग दाखवत होती.

" वाह किती हुशार आहेस. पूनम थकली का? "

" हो दादा. पण फॅक्टरी मधे काम छान चालत. जाधव फार चांगले आहेत. " पूनम आज काय झालं ते सांगत होती.

" हो आपल्याकडे चांगले लोक आहेत. "दोघ बोलत होते.

" डॅडी मी मम्मीच्या घरी गेली होती." आर्या मधेच म्हणाली. ती तिकडे काय झालं ते सांगत होती.

इकडे ऋषी चिडला होता. त्याला ते आवडलं नाही.

पूनम त्याच्याकडे बघत होती. ओह माय गॉड आता काही खर नाही. दादा... दादा... तिने हाक मारली. त्याने ऐकलं नाही. तो बाहेर आला. "आजी, आर्याला कुठे घेवून गेली होतीस?"

" सोनलकडे, अरे मी तिला घ्यायला गेली होती तर नेल. तुझी आर्या कुठे ऐकते किती रडत होती. सोनल कडे ती गप्प बसली." आजी सांगत होत्या.

" यापुढे असे करायच नाही. आर्याला तिकडे नेत जावू नकोस." ऋषी म्हणाला.

"का पण? अस का करतोस?"

"माझ्या लेकीसाठी माझे काही नियम आहेत ते मी पाळणार. त्यांना इकडे यायच तर ते येतील. माझी आर्या तिकडे परत जायला नको." ऋषी म्हणाला.

सोनल आशाताईंच्या रूम मधून बाहेर येत होती. तिने ते ऐकलं. ती पटकन मागे सरकली. दाराआड ती उभी होती. ऋषी चिडला होता. आजी त्याची समजूत काढत होत्या.

आमचं घर म्हणजे इतक डेंजर ठिकाण आहे का? की यांना तिकडे त्यांच्या लेकीला धोका वाटतो. हे आम्हाला काय समजता? आम्ही म्हणजे अगदी कमी. हेच भारी का? सोनल चिडली होती. तिला वाटत होत पुढे जावून बोलाव. पण नको ते माझ्याशी बोलत नाही. आजीशी बोलत आहेत. उगीच मधे पडण्यात अर्थ नाही.

जन्म घेतांना गरीब श्रीमंत असा चॉईस असता तर सगळ्यांनी स्वतः ला श्रीमंत घर निवडलं असतं. कोणाची परिस्थिती गरीब आहे म्हणून ते लोक चांगले नाहीत अस नाही ना. ती नाराज होती. तिला रडू येत होत. ती रूम मधे जात होती.

"सोनल... " आजींनी हाक मारली.

ऋषी तिच्याकडे बघत होता. आता तो गप्प झाला.

"ऋषी जा फ्रेश हो. सोनल त्याच ताट कर."

" हो." ती म्हणाली.

"नाही नको. लताताई..." त्याने हाक मारली. त्या बाहेर आल्या.

"माझं ताट वरती पाठवा." तो वरती निघून गेला.

आजी सोनलकडे बघत होत्या. "तो थकला असेल." त्या म्हणाल्या.

सोनल काही म्हणाली नाही. ती गेस्ट रूम मधे आली. ती आता रडत होती.

तीच दार वाजलं. आजी होत्या. त्या तिच्याकडे बघत होत्या. त्या आत येवून बसल्या." अग ऋषीच्या आयुष्यात खूप काही होवून गेलं आहे म्हणुन तो असा कोरडा झाला. तो तुला बोलत नव्हता. "

" ठीक आहे आजी. मला काही वाटल नाही. आमचं घर खरच साध्या एरिया मधे आहे. आम्ही गरीब आहोत. यापुढे तुम्ही ही तिकडे येवू नका. आर्याला आणू नका. मी संध्याकाळी म्हणाली होती की आर्या इकडे आलेली यांना आवडणार नाही. तुम्ही ही मला घ्यायला यायची गरज नव्हती. मी माझी आली असती. " सोनल म्हणाली.

"अस नाही सोनल म्हणजे आर्या आई शिवाय वाढलीय ना. त्यामुळे ऋषी तिची अति काळजी करतो. " आजी म्हणाल्या.

" हो ते समजल आजी. जावू द्या. आपण या विषयावर बोलायला नको. मी झोपते. उद्या शाळा आहे. आजी मी रोज शाळेत जाईल. " सोनल कॉटवर बसली.

" हो बेटा. तू शाळेत जा. चल आता... "

" कुठे? " सोनलला समजत नव्हत या वेळी कुठे जायचं आहे?

आजींना तिचा हात धरला दोघी रूम बाहेर आल्या...

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all