Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 45

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 45

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषी खरतर सोनलला बोलला नव्हता. तो आजींशी बोलत होता. तिने ते ऐकलं. त्याचे आर्यासाठी काही नियम होते. आईविना मुलगी म्हणून तो जास्त काळजी करत होता. आजी सोनल निघाल्या. कुठे...?

"चल." आजी ऐकत नव्हत्या.

"नाही आजी मी येणार नाही." सोनल म्हणाली. तिला झोपायच होतं. उगीच भांडण करायचं नाही. हे बोलले ना. संपला विषय.

तिला समजलं त्या दोघी ऋषीच्या रूम मधे जात आहेत. आता परत तिकडे जावुन त्यांना उलट बोलायला तिला आवडत नव्हतं. उगीच ते चिडतील. मला मदत केली नाही तर? बाबांची ट्रीटमेंट कशी होईल. पण या आजी ही ऐकत नाहीत. त्या अजून यांना खूप बोलतील. ते ही चिडतील. तिची धडधड वाढली.

तिथे ऋषी चिडले तर मी लगेच पडत घेवू का? असच तर आयुष्य आहे. बाबां पेक्षा काहीच जास्त नाही.

आजींनी तिचा हात धरला होता. त्या दोघी जिना चढत होत्या.

"आजी, हे आधीच चिडले आहेत. भांडण वाढायला नको ना. आपण तिकडे का जातो आहोत?" सोनल विचारत होती.

" का जातोय म्हणजे? लग्न झालं आहे ऋषीकडे बघायचं. त्याच्या सोबत रहात जा. बोलला तर बोलू दे." आजी म्हणाल्या.

तिच्या पोटात गोळा आला. काय होईल म्हणून नाही तर रोज हे किती बोलतील. एक तर सुभाषशी भांडून ती एकदम कंटाळून गेली होती. नवरे मंडळी सहसा पडत घेत नाही. बायकोला बोलून त्यांना बर वाटत. हे तिला माहिती होत. म्हणजे तिला तरी असाच अनुभव आला होता. त्यात आज आर्या आमच्या घरी आली त्यामुळे हे चिडले आहेत.

तिला कधी प्रेम मिळालं नाही. कोणी आपलं समजून वागलं नाही. त्यामुळे ती असा विचार करत होती.

ऋषी टीव्ही बघत जेवत होता. त्याने दरवाजा कडे बघितलं. आजी आणि सोनल आत आल्या होत्या.

आता काय आहे? असे त्याच्या चेहर्‍यावर एक्स्प्रेशन होते.

" ही तुझी बायको आहे. ती आज पासून इथे राहील." आजी म्हणाल्या.

ऋषी सोनलकडे बघत होता. तिला बळजबरी इथे आणलं आहे समजत होत. ती गडबडली होती. ती पण त्याच्याकडे बघत होती. हे काय म्हणतात समजत नाही.

" आजी... " ऋषी कसतरी म्हणाला.

" गप्प बस. माझ्या समोर जास्त बोलायच नाही. मी म्हणेल ते करायचं. "

" मला हे जमणार नाही आजी ." अस तो म्हणणार होता. पण तो सोनल कडे बघून गप्प बसला.

"लग्न काय फक्त आई आणि लेकी साठी केलं का? हिला सांभाळ आता. छान सुरुवात करा. तू ही सोनल जरा प्रेमाने, हक्काने वागत जा. त्याला काय हव काय नको ते बघ." आजी दोघांना ओरडल्या.

तो आजी पुढे काही बोलू शकत नव्हता.

"सोनल रूम बाहेर जायचं नाही. नाहीतर मी तुला आत्ताच माहेरी पाठवून देईल. " आजींनी दरवाजा ओढून घेतला. ती थोडा वेळ तिथेच खुर्ची जवळ उभी राहिली. काय करू काही समजत नाही.

ऋषी अस बोलल्याने खूप राग ही येत होता. परत या खोलीत रहायचं. कस होईल? आर्या कुठे आहे? ती झोपली असेल. ती सोबत असती तर बर वाटलं असतं.

त्याच जेवण झालं. ती प्लेट उचलत होती.

" राहू दे. तू हे काम करू नकोस." तिला आवाज आला. ती मागे सरकली. चक्क ऋषी इनामदार माझ्याशी बोलले. ओह एम. जी. जगातले आठवे आश्चर्य झाले. एका साध्या मुलीशी एवढा श्रीमंत माणूस बोलला.

त्याने त्याची प्लेट ट्रे मधे ठेवली. लताताई आल्या. प्लेट घेवून गेल्या.

इथे कुठे झोपू ती बघत होती. रूम तर खूप छान मोठी होती. रूमचे दोन भाग झाले होते. एका बाजूला मोठा बेड होता. तीन जण आरामात मावतील एवढा. दुसऱ्या बाजूला बाथरूम होतं. कपाट होते. पुढच्या बाजूला बाल्कनी असेल बहुतेक. तिने जास्त इकडे तिकडे बघितलं नाही. रूम खूप स्वच्छ आणि टापटीत होती. तिथे एक वेगळ्या प्रकारचे दडपण येतं होतं. ऋषी बद्दल तिला काही वाटत नव्हतं. तसा तो चांगला होता. त्रास देईल असं वाटत नव्हता. एवढे तर लोक तिला समजत होते.

ऋषी ही थोडा गडबडला होता. काय कराव? ही मुलगी इथे राहील. मला काही सुचणार नाही. पण तिची काळजी घ्यावी लागेल.

"तू कॉटवर झोपतेस का?" त्याने विचारलं.

"नाही, नको... ती सोफ्याकडे बघत होती." उगीच माझ्यामुळे यांची गैरसोय नको. त्यांना आरामात रहायची सवय असेल.

" रूमची ही बाजू तुझी ती माझी."

" हो चालेल." सोनल म्हणाली. तिला ही आता इथे बर वाटत होतं. वाटत तेवढे हे खडूस नाहीत. बरच समजुतीने घेत आहेत. मग थोड्या वेळापूर्वी अस का बोलले. त्यांच्या लेकीसाठी त्यांना काळजी वाटत असेल.

त्याने बाजूचा सोफा थोडा सरकवला. त्याचा छोटा बेड तयार झाला. तिला उशी पांघरुन दिलं. ती सोफ्यावर झोपली. तिने सकाळची बेल लावली. ती मोबाईल मध्ये बघत होती काहीच करमत नव्हतं.

ऋषी पुस्तक वाचत होता. मधेच मोबाईल मधे बघत होता. सोनलला ही झोप येत नव्हती. तिने त्याच्याकडे बघायचं टाळलं. त्यांना काय वाटेल. अस नको. नवरा जरी असला तरी इतके दिवस आमच्यात काहीच नातं तयार झाल नव्हतं. याआधी ते एकदाही एकमेकांशी बोलले नव्हते.

ऋषीने तिला झोपायला जागा करून दिली होती. ते ही काही न बोलता. त्यामुळे तिला बर वाटलं. आजी ही का ऐकत नाही.

तिला वाटलं होत ऋषी चिडतील मला रूम बाहेर काढतील. पण त्याने हे शांत पणे हाताळलं. मी ही यापुढे समजुतीने घेईल. त्यांना आवडत नाही ते करायचं नाही.

आजी खाली आल्या. सोनल ऋषीच्या रूम मधे गेली हेच बर आहे. अस केलं नाही तर दोघ कधीच एकमेकांशी बोलणार नाही. काय भांडायच ते एकत्र राहून भांडा. बोला तरच यांचा संसार सुखाचा होईल.

ऋषी बघत होता. सोनल नीट झोपली नाही. तिला ही कसतरी वाटत असेल का? सहाजिकच आहे. ओळख नाही अश्या माणसासोबत रूम मधे रहायचं म्हणजे. तिला थंडी तर वाजत नसेल ना? त्याने एसी नॉर्मल वर केला. त्याने कपाटातून ब्लँकेट घेतलं. कस देवू? तो विचार करत होता. तो सोफ्या जवळ गेला. ती झोपलेली होती. त्याने ब्लँकेट तिच्या अंगावर पांघरलं.

तो बाल्कनीत उभा होता. माया... तू गेल्यापासून कोणीच माझ्या आयुष्यात, या रूम मधे ही आलं नाही. मीच हृदयाचे दरवाजे लावून घेतले होते. आज पहिल्यांदा सोनल इथे आली. इतके दिवस मी तिच्या सोबत जास्त बोलले नाही. पण आजीच्या सांगण्या नुसार मला तिला सांभाळावं लागेल. आज ती इथे आहे. बर वाटत आहे. तो झोपला.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा.
तिळ गुळ घ्या गोड बोला.
सोनल ऋषीची तर एकमेकांशी गोड बोलायची सुरुवात झाली आहे. पुढे काय होईल? त्यांच हे नातं असच बहरू दे.


0

🎭 Series Post

View all