सोनेरी नात्यांची वीण भाग 47
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
सोनल मुळे हळूहळू घरचं वातावरण बदलत आहे. सगळे समजुतीने घेत आहेत. आता पुढे.
सोनलला शाळेत खूप छान वाटत होतं. सुरवातीचे दोन तास झाले. ती स्टाफ रूम मधे येवून बसली. "काका चहा आहे का?"
" हो मॅडम. "
ती नुसतीच बसली होती. ऋषीचा विचार मनात होता. हे रात्री आजींजवळ खूप बोलले, पण माझ्याशी वागतांना व्यवस्थित वागले. रात्री मला ब्लॅंकेटही दिल वाटतं. कारण झोपतांना माझ्याकडे ब्लॅंकेट नव्हतं. तिला थोडसं हसू आलं. कसं असतं ना कोणी थोडंसं जरी व्यवस्थित बोललं तरी आपण इतर झालेल्या गोष्टी विसरून जातो. मग अस असेल तर सगळे कायमच चांगलं का नाही वागत?
आज मला यांचा राग येत नाही. तस आधी ही येत नव्हता. राग येण्या इतकी आमची ओळख नाहिये. मी माझ्या मनाने लग्न केलं. एवढच आहे की आधी काही बोलणं झालं नाही.
ऋषीचं बरोबर आहे, आजींनी आर्याला आमच्याकडे आणायचं नव्हतं. जाऊदे आता मला हे सगळं सांभाळून न्यावं लागेल.
तिचा फोन वाजत होता. हा कोणाचा नंबर आहे? ती बघत होती. तिने फोन उचलला नाही. लोन घ्या वगैरे असेल. मेसेज आला. "हाय."
अरे कोण असेल? लगेच तास असल्याने तिने लक्ष दिले नाही.
अरे कोण असेल? लगेच तास असल्याने तिने लक्ष दिले नाही.
लंच ब्रेक मधे संध्या, मीरा बाकीच्या तिची चेष्टा मस्करी करत होत्या.
"तू अशीच छान राहत जा सोनल आज तू सुंदर दिसते आहेस. तू खरच फिरायला जायचं होतस. हेच तर दिवस असतात. नंतर काय मुलांना घेवून फिरणार आहेस?"
" आत्ताही जर जायचं असेल तर आम्ही आर्याला सोबत नेवू. " सोनल म्हणाली.
"आर्या कोण आहे? का कबाब मैं हड्डी?" संध्या म्हणाली. बाकीच्या हसत होत्या. त्यांना वाटल नणंदेची मुलगी वगैरे असेल.
"ती माझी मुलगी आहे." सोनल म्हणाली.
"म्हणजे?"
" आमच्या यांची मुलगी." सोनल सहज म्हणाली.
बाकीच्या मुली एकमेकींकडे बघत होत्या. असं काय स्थळ बघितलं... असे भाव त्यांच्या चेहर्यावर होते.
पण सोनल खुश होती. ती जेवत होती. आर्या बद्दल सांगत होती. तिच्या सांगण्यात खूप प्रेम होत. आर्या तिला परकी, डिस्टर्ब करणारी वाटत नव्हती. सोनल बिझी झाली. वर्गावर गेली.
स्टाफ रूम मधे दोघी तिघी तिच्या बद्दल बोलत होत्या. हिने लग्नाची घाई केली वाटतं. तरुण आहे. सुंदर आहे. वय ही काहीच नाही. अस मूल असलेलं स्थळ का निवडलं असेल?
"जावू दे आपल्याला काय."
******
मोहनरावांना आज बर वाटत नव्हतं. सकाळ पासुन ते झोपून होते. मीनाताई तयार झाल्या. त्यांनी रिक्षा बोलावली.
"रसिका आम्ही हॉस्पिटलमध्ये जावून येतो."
" आई पैसे आहेत का?"
" मागे सोनलने दिले होते ते आहेत."
मोहन रावांना दर पंधरा दिवसांनी महाग इंजेक्शन होतं. ऑपरेशन करणं गरजेच होतं तोपर्यंत इंजेक्शन वर धकवत होते. ते हॉस्पिटल मधे पोहोचले. थोड्या वेळाने त्यांचा नंबर होता. ते आत गेले. नेहमी प्रमाणे तपासणी झाली. इंजेक्शन दिल्यावर दोन तास तरी तिथे रहावं लागायचं. मीनलताईंनी सोनलला फोन लावला.
" काय आई?"
" बाबांना इंजेक्शन साठी आणलं आहे. " मीनलताई म्हणाल्या.
ओह मी विसरली होती. बरोबर आहे आज तारीख होती. मी इतकी स्वतः मधे गुरफटली की बाबां बद्दल विसरली होती. ती काळजीत होती. बाबांची ट्रीटमेंट कशी होईल? दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत आहे.
" आई पैसे आहेत का? " तिने विचारलं.
"हो आहेत तूच दिले आहेत."
"ठीक आहे घरी पोहोचले की सांग. रिक्षा करून घे. मी तिकडे येवू का?"
"नको बेटा आम्ही थोड्या वेळाने निघू. " मीनलताई म्हणाल्या.
सोनलने तिचा बँक बॅलन्स बघितला. खूप कमी पैसे बाकी होते. ती हिशोब करत होती. ठीक आहे ही ठरविक रक्कम बाबांसाठी बाजूला ठेवू. अस कारने आली तर माझे रिक्षाचे पैसे वाचतील.
ती घर आली. आजींना पैशा बाबत बोलू का? त्या घरी नव्हत्या. मंदिरात गेल्या होत्या. तिने चहा घेतला. आर्या अभ्यास करत होती. तिची टीचर गेली. त्या दोघी आशाताईं जरा वेळ बसल्या होत्या. आर्या खेळत होती. सोनल काळजी करत होती.
आशाताईंना फोन आला होता. त्या बोलत होत्या. मामा होते वाटत. ते रिटाला घेवून परत आले. ती तिकडे एका मुलाकडे सापडली. अश्या लोकांचा काही भरोसा नसतो. लगेच एक्शन घेतली म्हणून तरी हाती आली.
"तरुण मुलींना अजिबात धोका समजत नाही." आशाताई बोलत होत्या. सोनल ऐकत होती.
ही तीच मुलगी ना यांच तीच लग्न जमलं होत. ती आता आली वाटत. आता काय होईल? ऋषीच तीच काही होत का? सोनलला अचानक इनसिक्युअर वाटायला लागलं. एक झालं की एक आहेच.
लताताई विचारत होत्या. त्यांना स्वयंपाक काय करायचा ते सोनल सांगत होती. थोड्या वेळाने पूनम घरी आली. ती नुसती बसली होती
"काय ग थकली का?" सोनलला ती आली तर बर वाटत होतं.
" हो. वहिनी. पण काम केल्याचं समाधान आहे."
आर्या तिला खेळायला ओढत होती. "आत्तु चल."
"थोडा वेळ बसू दे ना पिल्लू."
सोनल तिच्याकडे बघत होती. ही शारीरिक पेक्षा मानसिक रित्या जास्त थकली आहे.
" काय झालं पूनम? "
" काय झालं पूनम? "
"जो जवळचा असतो ना तो सोडून बाकीचे नीट वागतात वहिनी. ज्याच्या कडून अपेक्षा असते तो त्रास देतो. कींवा मीच त्रास करून घेते. मी म्हणत नाही माझं चुकत नसेल. पण मला प्रेम हवं, थोडा सम्मान हवा अशी अपेक्षा केली तर ते काय चुकीच आहे वहिनी?" पूनम म्हणाली.
" हो बरोबर आहे. असच होत. यावर काही उपाय ही नसतो. आपण कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी त्यांना या गोष्टी समजत नाहीत. " सोनल तिच्या पूर्वानुभवावरून म्हणाली.
" अस का असतं?"
"या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे ही नाही. काय झालं. तुमच काही ठरलं का?" सोनलने विचारलं.
" नाही ना. तस आज आम्ही दोघ शांततेत बोललो. लग्न करण्याआधी किती उत्साह असतो ना वहिनी. एक सुंदर जग आपल्याला खुणावत असतं. पण नंतर आपण समजतो तस काही नसत ना. तिथे राजा राणीच्या संसाराला काही अर्थ नसतो. दुसरं कोणी तरी त्यांच जग कंट्रोल करत असतात. आपल्याला त्रास देण्यात त्यांना कोणता आनंद मिळतो समजत नाही. " पूनम म्हणाली.
नक्की हिच्या सासरी काही प्रॉब्लेम असेल. अस का होतं? घरोघरी मातीच्या चुली.
" आम्ही ही खुश राहू घरचे ही सांभाळले जातील. अस नाही का होवू शकत वहिनी? उगीच आई बाबांकडे दुर्लक्ष झाल तर राघव गिल्टी होतो. लक्ष दिले तर ते अति करतात. मी घरीच होते तर मलाच त्रास देत होते ." पूनम सांगत होती.
" मला सांग तुमच दोघांच नातं कस आहे? बाकीच्यां साठी तू तुझ्या नवर्याला का सोडते?" सोनल विचारत होती.
"आमचं दोघांच खूप पटतं. फक्त घरच्यांमुळे वाद होतात. तस आम्ही असलो तर प्रेमाने रहातो. आता मी म्हणते आहे की मी सासरी रहाणार नाही. राघवला आई बाबांना सोडता येणार नाही. हा प्रॉब्लेम आहे." पूनम खूप सांगत होती.
" असच असतं. पण आता वयस्कर मंडळींचा संसार करून झाला ना. त्यांनी थोड नीट वागून तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे. " सोनल म्हणाली.
" तेच तर, त्यांना हे कोण सांगेल. त्यांना समजत नसेल का की आपण चुकीच वागतो आहे. "
" नाही समजत. यावर उपाय नाही. जावू दे. तुमचं आता काय ठरलं? "
" काहीच माहिती नाही वहिनी. हे नीट होईल ना? " पूनम काळजीत होती.
"नक्की होईल बघ तू चांगली आहेस."
" आता मी काय करू? "
"राघवशी मोकळ बोल. त्यांना सांग मला तुमच्या सोबत रहायचं आहे. आनंदाने प्रेमाने कस करता येईल तुम्ही बघा."
" हो तेच करते. "
" सुवर्ण मध्य साध ग. "
" हो वहिनी."
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
