Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 48

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 48

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

सोनल पूनम बोलत बसल्या होत्या. या जगात सुख कमी दुःख जास्त आहे. काहीच नीट होत नाही म्हणून पूनम नाराज होती. तिने ठरवलं ते होईल का? राघव तिचं ऐकेल का? आता पुढे.

" पूनम तू राघवशी मोकळ बोल. त्यांना सांग मला तुमच्या सोबत रहायचं आहे. आनंदाने प्रेमाने कस करता येईल तुम्ही बघा." सोनल म्हणाली.

" हो तेच करते. आता मी शांततेत घेणार आहे."

" सुवर्ण मध्य साधं ग. "

" हो वहिनी. तू ही. दादाशी आपणहून बोल. तुमच नात नीट कर ग. मला तुम्ही दोघ कायम सोबत रहायला हवे आहेत. " पूनम म्हणाली.

"हो मला ही तेच वाटत आहे. अस्थिरता नको आहे. पण माझ्यासाठी हे सगळं फारच नवीन आहे. म्हणजे यांच्याशी कस बोलू समजत नाही. हे कसे आहेत? रागीट का? " सोनलने विचारलं.

" नाही, ऋषी दादा साधा प्रामाणिक मुलगा आहे. घरातल्यांना छान सांभाळतो. भांडत नाही. प्रेम दिल तर तुला खूप प्रेम मिळेल. तुझ्या कृतीतून दाखवून दे." पूनम सांगत होती.

सोनल थोडी लाजली होती. " हो. हे नात नीट करावं लागेल. "

मला, माझ्या घरच्यांना ही यांच्या सपोर्टची गरज आहे. त्या बदल्यात त्यांना काय हव? त्यांची आई, आजी, लेक सुखी हवी. मी त्यांच खूप करेन.

"पूनम एक विचारू? ती रिटा की कोण आहे? ती परत आली? म्हणजे आता काय होईल?"

"हो ना. काही होणार नाही. तू काळजी करू नकोस. मामाचा फोन आला होता. आई ही सांगत होती. "

" यांच तिच्याशी लग्न होणार होत ना?"

"हो."

" मग आता? "

"काही नाही, दादा तेव्हा तर यापेक्षा जास्त चिडचिड करत होता. मला ही ते आवडलं नव्हतं. तेव्हा मी सासरी होती. मामा, मामीने आईला इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं. आई आजारी असते म्हणून तिला कोणी नाही म्हणतं नव्हतं. ऋषी दादा, आजी... आर्याला सांभाळत होते. दोघांच ती ऐकायची नाही. खूप रडायची. तिला मम्मी हवी होती. दादा ही कंटाळला होता. म्हणून त्याने रिटा बरोबर लग्नाला होकार दिला. आता तर तो खूपच शांत आहे. त्याच्या मनात तूच आहेस. तुमचं खूप चांगल होईल. " पूनम म्हणाली.

सोनल ऐकत होती. खरच कठिण परिस्थिती होती. अश्यात काय करावे सुचत नाही. जावू दे त्या रिटा बद्दल विचार करण्यात काही अर्थ नाही.

ऋषी कार मधे खुश होता. निदान घरी जायची ओढ तरी आहे. आर्या ही घरी छान रहाते. नाहीतर रोज संध्याकाळी ती फोन करायची की डॅडी केव्हा येतोस? ती अभ्यास करायची नाही. मागच्या परीक्षेत तिला किती कमी मार्क मिळाले.

तो घरी आला. सोनल, पूनम, आर्या पुढे बसलेल्या होत्या. आशाताई, आजी ही होत्या.

डॅडी... आर्या नेहमी प्रमाणे त्याला भेटली. ती त्याला दिवसभर काय झालं ते सांगत होती. सगळे तिच्याकडे बघून खुश होते.

तो फ्रेश होवून आला. सगळे जेवायला बसले. आशाताईंच जेवण झालं होतं. तरी त्या ही थोडा वेळ हॉल मध्ये बसल्या होत्या.

" ऋषी अरे सुरेश मामाचा फोन आला होता. रिटा परत आली. तो काळजीत आहे. आता रिटाचं काय होईल? " आशाताई सांगत होत्या.

कोणीच काही म्हणालं नाही. सोनल ही ऐकत होती. तिने ऋषी कडे बघितलं. तो ही तिच्या कडे बघत होता.

आर्या खूप बोलत होती. पूनम शांत होती. ऋषी पोळी घेत होता.

"दादा ही घे." पूनम म्हणाली.

" काय झालं?"

"वहिनीने तुझ्या साठी स्पेशल पराठा केला आहे."

सोनल गडबडली. ऋषी ही काही म्हणाला नाही. त्याने पराठा घेतला. खूप छान झाला होता. त्याने अजून एक घेतला. सोनल खुश होती. चला यांना मी केलेलं थोड तरी आवडतं.

"डॅडी, मला ही मम्मीने छोटा पराठा केला होता. मी केली ती भाजी खाल्ली."

" आर्या आता खूप हुशार झाली आहे." पूनम म्हणाली.

"मम्मी म्हणेल ते मी ऐकणार." आर्या म्हणाली.

खूप तरसुन एखादी गोष्ट मिळाली की त्याची फार किम्मत असते. आईच प्रेम अशीच गोष्ट होती. आर्या इतक्या लहान वयात हे जाणून होती.

ऋषी बघत होता ही मनापासून सगळ्यांच करते.

" मम्मी मी तुझ्या जवळ झोपू का?" आर्या विचारत होती.

" हो चल बेटा. "

" नाही आर्या तुझ्या रूम मधे जा." पूनम म्हणाली.

आर्या हात धुवायला गेली.

" ती मोठी होते आहे. ती खाली झोपेल. आजी तिच्या सोबत असते. काळजी करू नकोस सोनल वहिनी. त्यांच्या दोघींच्या खोलीला आतून दार आहे ." पूनम म्हणाली.

"तू मला झोपव मम्मी." सोनल तिला घेवून गेली.

ऋषी आशाताईं सोबत बोलत होता. " आई पुरे झालं ना मामा, रिटा प्रकरण. सगळे जमले असतांना तर तिच्या बद्दल काही बोलू नकोस. "

" बरोबर आहे सोनल समोर मी हे बोलायचं नव्हत ना. " आशा ताई ओशाळल्या.

" तस नाही आई. तो मामा तुला उगीच त्रास देतो. इमोशनल ब्लॅकमेल करतो. आता ही काहीतरी काढेन."

" हो तेव्हा मला असच वाटलं होतं. तेव्हा ही तो मला फार टेंशन देत होता. मला काही सुचत नव्हतं म्हणून तुझं लग्न त्या रिटा सोबत ठरवलं होत. पण बर झालं त्यामुळे सोनल या घरी आली. " आशाताई म्हणाल्या.

"हो ना. " नकळत ऋषी म्हणाला.

आता आशाताई हसत होत्या. " खूप सुखी रहा. बेटा. तिला सांभाळून घे. बघ मला, तुझ्या आजीला आता किती बर वाटतं. आर्या तर एकदाही रडली नाही. नाहीतर तिचा आवाज थांबत नव्हता. "

" हो ना. आर्या फार त्रास देत होती. "

आजी ही ऐकत होत्या." मला माहिती होतं आपलं चांगल होणार आहे. सोनल समजूतदार आहे." तिघे बोलत बसले.

थोड्या वेळाने ऋषी, आशाताईंना आत रूम मधे घेवून गेला. त्या झोपल्या. तो बाहेर आला आर्याच्या रूम कडे बघत वरती रूम मधे निघून गेला.

सोनल आर्याशी बोलत होती. थोड्या वेळाने ती झोपली. वर कस जावू? सोनल विचार करत होती.

आजी आत आल्या. " लताताई, सोनलच समान वरती शिफ्ट करा. "

लताताईं सोबत ती रूम मधे आली. त्या परत गेल्या. तिने तिचं सामान कोपऱ्यात ठेवलं .

"तुझं सामान कपाटात ठेव. या बाजूचं कपाट तुझं." ऋषी म्हणाला.

ती सामान लावत होती. ऋषी टीव्ही बघत होता. काल पेक्षा तो आज जास्त कंफर्टेबल होता. तीच सामान ठेवून झालं. तिला घरी फोन करायचा होता. आई-बाबा घरी आले की नाही समजत नाही. तिने फोन घेतला. ती बाल्कनीत गेली.

" काय झालं आई? बाबांना बर वाटत का ? "

"हो इंजेक्शन घेतलं. आता तुझे बाबा ठीक आहेत. झोपले आहेत." मीनलताई सांगत होत्या.

"औषध आणले का?"

" तू त्या दिवशी आणले ना. आहेत. काळजी करू नकोस."

" आई पैसे लागले तर सांग."

" हो बेटा."

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all