सोनेरी नात्यांची वीण भाग 49
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
आई बाबांच्या काळजीने सोनलला काही सुचत नव्हतं. पैसे तर हवे पण आजींना कस सांगणार? त्यांनी प्रॉमीस केल्या प्रमाणे मदत करायला हवी. बघू पुढे काय होतय...
"सोनलचा फोन आहे का?" राजेश विचारत होता.
"हो." मीनलताई म्हणाल्या.
"इकडे दे... सोनल, बाबांच ऑपरेशन लवकर करायला हवं. "
" हो ना दादा. मी बघते. काहीतरी करते. तू ही लोन मिळत का ते बघ. " सोनल म्हणाली.
" आजी मदत करणार होत्या ना?" त्याने विचारलं.
" हो दादा ,पण मी अजुन त्यांना काही विचारलं नाही. आता लगेच कस बोलु? सगळं नवीन आहे. त्या फार चांगल्या आहेत. नंतर मदत करतील. त्यांनी पैसे दिले की घेतलेलं लोन भरून टाकू. बाबांकडे बघायला हवं. आता घाई करायला हवी. " सोनल म्हणाली. तिची अडचण कोणी समजून घेत नव्हतं.
" हो मी लोनचं बघतो. "राजेश हळूचं म्हणाला. बरोबर रसिकाने ऐकलं.
" काय बघतो? हे लोन वगैरे आपण काही घेणार नाही. सांगा त्यांना. सोनल ताई आहे का? अहो बोला ना. इनामदार आजी मदत करणार होत्या त्याच काय झालं? " रसिकाचा आवाज येत होता.
" काय बघतो? हे लोन वगैरे आपण काही घेणार नाही. सांगा त्यांना. सोनल ताई आहे का? अहो बोला ना. इनामदार आजी मदत करणार होत्या त्याच काय झालं? " रसिकाचा आवाज येत होता.
"हो आम्ही तेच बोलतो आहोत. तू गप्प बस रसिका." तो ओरडला.
"काय झालं दादा?" सोनलने विचारलं.
"काही नाही. आपलं बोलून झाले. तू फोन ठेव." राजेश म्हणाला.
" इथे चांगला जॉब नाही. आपण कस करतो आपलं आपल्याला माहिती. त्यात आई, बाबा आजारी. तुम्ही जावू दे जावू दे करतात. एवढा खर्च कसा होईल. " रसिका ओरडत होती.
" जॉबच म्हणतेस तर ही सोनलची जबाबदारी नाही ना. तिला लगेच कस सांगणार? ती अजून त्या इनामदार साहेबांशी नीट बोलली नसेल. तिच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही रसिका. थोड शांततेत घे. " राजेश म्हणाला.
" त्यांच नवीन लग्न आहे. सोनल ताई म्हणतील ते ऋषी इनामदार ऐकतील. मग आपला फायदा का करून घेवू नये सांगा ना." रसिका म्हणाली.
सोनल ऐकत होती. तिला कसतरी वाटलं. तिने फोन ठेवला. ती ऋषीचा विचार करत होती. खरच मी म्हणेल ते हे ऐकतील? इतक सोपं आहे का? आयुष्य निघून जात तरी मनाप्रमाणे होत नाही. हे मला, माझ्या फॅमिलीला सांभाळून घेतील? या बदल्यात त्यांना काय हव? माझी साथ?
तस तर हे वागायला फार चांगले आहेत. पण तरी ही मी लगेच यांना माझे प्रॉब्लेम सांगू शकत नाही. अजून तसं कोणतच नातं आमच्यात नाही. सगळं कठिण आहे.
मी यांच्याशी आत्ताशी एक दोन शब्द बोलते आहे. अस पैशाच्या व्यवहारात मधे मधे करू शकत नाही. त्यांनी निदान मला रूम मध्ये तरी येऊ दिलं म्हणजे ते थोडे तरी या नात्यासाठी तयार आहेत. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
रसिका वहिनी अशी काय करते समजत नाही. जरा दम धीर नाही. इथे माझं नीट नाही. इतर कुटुंबाबद्दल काय बोलणार. आणि पैसे आहेत म्हणून ऋषी का सगळ्यांच करतील? मी त्यांना गृहीत धरू शकत नाही. शेवटी आपलं आपल्याला करायच असतं.
ती आत आली.
ऋषी थोडं ऐकत होता. बोलू की नको तो विचार करत होता.
ती इकडे तिकडे बघत होती.
"बस." तो म्हणाला. त्याने बातम्या लावल्या होत्या.
"काय झालं?"
" आज माझे बाबा हॉस्पिटलमध्ये गेले होते. ते विचारत होती." सोनलने सांगितलं.
"ओह आता ते कसे आहेत?" ऋषीने विचारलं.
" ठीक आहेत."
मोहन रावांना इतका त्रास होत असेल ऋषीला वाटलं नाही. त्याला वाटल रेग्युलर चेकअप असेल.
यांना ट्रीटमेंट बद्दल सांगू का? नको, आजी त्या बाबतीत मदत करणार आहेत. यांना काही माहिती नाही. त्यांना काय वाटेल? बोलायला सुरुवात केल्या बरोबर पैसे मागितले.
सोनल गप्प बसली. एकीकडे बाबांची काळजी तर दुसरीकडे ऋषी. दोघी महत्वाचे. हे नात अगदी नवं आहे. काही बोलता येत नव्हतं.
ती सोफा कम बेड वर बसली होती. तिचा फोन वाजला दुपारी आला त्या नंबर वरून हॅलोचा मेसेज आला होता. हे काय? आता कोण आहे ते ही समजत नाही. तिने फोन बाजूला ठेवला उद्याचे नोट्स काढायला घेतल्या.
"तू काय करतेस?" त्याने विचारलं.
"मी शाळेत टीचर आहे. उद्याच्या तासाची तयारी करावी लागते. आपण अपटूडेट असू तरच मुलांना शिकवता येतं." सोनल म्हणाली.
" अगदी बरोबर. आमच्या ही कामाच असच असत. आधी पूर्व तयारी हवीच. इथे ठीक आहेस ना? "
"हो. थँक्स तुम्ही समजून घेतलं."
"हे लग्न, हे नातं आपल्या दोघांसाठी नवीन आहे. थोडा वेळ लागेल पण आपण ही निभावून नेवू. चालेल ना?" तो तिच्याकडे बघत होता.
तिला उगीच धडधड झाली. पण बर ही वाटलं. ती काही म्हणाली नाही. हे सोबत रहायचं म्हणत आहेत का?
" मला माहिती आहे तुझ्या मनात जुन्या आठवणी असतिल. " तो म्हणाला.
" नाही, माझ्या मनात जून काही नाही. मला ते आठवायचं ही नाही. आता जे काही आहे ते इकडेच. तुम्ही, आर्या माझी फॅमिली आहात ." सोनल एकदम म्हणाली आणि गप्प बसली.
त्याला बर वाटलं आणि कसतरी ही वाटलं. हिला आधी नक्की खूप त्रास झाला असेल. लोक असे का वागतात? मी तर मायाला फुलासारखं जपत होतो. तो एकदम गप्प झाला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ते सुंदर क्षण माझ्या सोबत कायम असतिल.
" माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या लगेच जाणार नाहीत. मी हे हळूहळू नीट करेन." ऋषी म्हणाला.
" काही हरकत नाही. तुम्ही तुमचा वेळ घ्या."
"मला ही या लग्नाबद्दल माहिती नव्हतं. सगळं अचानक झालं."
"हो ना."
ती त्याच्याकडे बघत होती. "एक विचारू का?"
"हो."
"ते रिटा परत आली. तुम्हाला तिच्या बद्दल वाटत का?"
" माझा तिचा काही संबंध नाही सोनल."
तिला बर वाटलं. तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होत.
" मग तुमच्या मनात कोण आहे? म्हणजे सॉरी. " तिने विचारलं. एकदम गप्प बसली.
" आर्याची आई, माझी पहिली पत्नी माया. सॉरी म्हणजे मी आता अस तुझ्या समोर हे बोलतोय."
"चांगल्या आठवणी सोबत असाव्यात. तुमचं नात कसं होतं?"
" खूप मैत्री पूर्ण." तो सांगत होता.
" त्यांना काय झालं होतं?"
" ती आजारी होती. निधन झालं."
"ओह सॉरी. चांगले लोक आयुष्यातून गेले की त्रास होतोच. त्या खरच फार चांगल्या असतिल. आर्या किती गोड मुलगी आहे. अगदी प्रेमळ. आईचे गुण तिच्यात असतिल." सोनल म्हणाली.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
