सोनेरी नात्यांची वीण भाग 51
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
सोनल थोडी तरी या घरी रूळली होती. तरी तिला बाबांच टेंशन होतं. त्यांच्या ऑपरेशन साठी पैसे मिळायला हवे. आता पुढे.
सोनल नाश्ता करून शाळेत गेली. आज लागोपाठ तास आहेत. तिने तीच सामान कपाटात ठेवलं.
" आज आबासाहेब येणार आहेत का काका? " तिने शिपाई काकांना विचारलं.
" हो दुपारनंतर येतील. मीटिंग आहे ना."
" हो, ते आले की मला सांगा. " मी त्यांना आधी भेटेल.
हो.
आबासाहेब शाळेचे ट्रस्टी होते. मोठ नाव होतं. ते बर्याच संस्थांचे अध्यक्ष होते. ती त्यांना लोन बद्दल विचारणार होती. बर्याच ठिकाणी प्रयत्न करून झाले. तीच काम होतं नव्हतं. हे ही ती ट्राय करणार होती.
राजेश दादा कडून काही होणार नाही. वहिनी ही खूप चिडते. मला आता सिरियस व्हावं लागेल. बाबांच ऑपरेशन लवकर व्हायला हवं.
संध्या आली. दोघी कामात होत्या.
******
ऋषी खाली आला. तो आशाताईंना भेटायला गेला. "आई नाश्ता झाला का?"
" हो बेटा." त्या खुश होत्या. खूप बोलत होत्या. "आज मी आर्या साठी केलेला थोडा पराठा खाल्ला."
" खूप छान आई. तुला काय आवडत ते करत जा."
आधी माया गेली. त्यानंतर बाबा गेले. एकावर एक धक्के आशाताईंना सहन झाले नाही. त्यांनी अचानक जेवण बंद केल होत. असच समजावून ज्यूस, पेज अस त्यांना देत होते. डॉक्टर ट्रीटमेंट बदलून बघत होते. पण स्वतः हून वाटत नाही तोपर्यंत तब्येतीत सुधार होणार नाही डॉक्टरांनी सांगून टाकल होतं. सोनल आल्या पासून त्या खूप बर्या होत्या. त्यामुळे ऋषी खुश होता.
"आज पेपर नाही का वाचायचा आई? मी तुला छान पुस्तक आणुन देतो." ऋषी म्हणाला.
"हे बघ दोन पुस्तक. मी पहीले दहा पान वाचले ही." आशाताई दाखवत होत्या.
"कोणी दिले?"
" सोनलने लायब्ररी मधून आणले. माझी आवड तिला माहिती आहे."
"आई संध्याकाळी बागेत फिरत जा." ऋषी म्हणाला.
"हो आता मी रात्री तुमच्या सोबत जेवणार आहे. "
" अरे वाह. मला उशीर होतो आहे. मी निघतो."
" नाश्ता करून जा. संध्याकाळी लवकर येत जा."
"हो आई. आजी चल." ते हॉल मधे आले.
पूनम नुसती बसली होती. राघव बद्दल विचार करत होती. त्याला ऑफिसला गेल्यावर फोन करते. जरा प्रेमाने बोलते.
" तुझ काम कुठे पर्यंत आलं पूनम? "
ती सांगत होती. ते तिघे नाश्ता करत होते.
आजी बघत होत्या ऋषी शांत झाला आहे. हा सोनलशी बोलतो की नाही माहिती नाही. ठीक होईल. सोनल गुणी मुलगी आहे. तिच्या पासून कोणी दूर राहू शकत नाही. पूनमचं नीट व्हायला हवं.
"पूनम, राघव कधी येणार आहे?" आजी विचारत होत्या.
" माहिती नाही आजी."
" अस कस? मग विचार. जरा प्रेमाने वागत जा. तो आला की इकडे बोलवून घे. अस किती दिवस वेगळं रहाणार एकतर इकडे कींवा तिकडे कुठेतरी सोबत रहा ग."
" हो आजी."
ऋषी, पूनम ऑफिसला गेले. आजी पुढे बसलेल्या होत्या. मामा, मामी, रिटा आले. ह्यांच काय आता? आजीच्या कपाळावर आठ्या होत्या. त्या रिटाकडे बघत होत्या.
"या बसा सुरेश, सुलभा, काय ग रिटा? ठीक आहेस ना. केव्हा घरी आलीस?"
"कालच आली." रिटा म्हणाली.
"मला वाटलं वर्ष... सहा महिने आता तू काही इकडे येणार नाही. नाही म्हटलं तरी जनाची नाही तरी मनाची लाज वाटतेच." आजी म्हणाल्या. त्या अश्या टोमणे मारणार्या नव्हत्या. पण सुलभा मामी, रिटाने त्यांना खूप त्रास दिला होता. त्यांना रिटा आणि सुलभाचा खूप राग येत होता.
" बघितलं का कारटे तुझ्यामुळे काय काय ऐकावं लागत. जा आजींच्या पाया पड. " सुलभा मामी ओरडल्या.
" राहू दे रिटा तू आता काही या घरची सुन नाहीस. तू तर या घरची मुलगी आहेस. ऋषी, पूनमची मामे बहीण. सुना पाया पडतात. बस जा." आजी म्हणाल्या.
"त्या मेल्यांनी भूल पाडून हिला नेलं. ती काय करेल. नाहीतर आमची रिटा अशी नाही. " मामी सारवासारव करत होत्या.
" हो ना बरोबर आहे. ही जशी लहान आहे . तिला काही कळत नाही. जावू द्या काळजी करू नका. अजून प्रसिद्धी होण्याआधी एखादा चांगला मुलगा बघून हीच ही लग्न करून टाका. " आजी म्हणाल्या.
" तीच मन नाही."
"का ग? "
"तिला इकडे तुमच्याकडे आवडतं."
"हो का. आधी समजत नव्हतं? आता काही उपयोग नाही. खूप उशीर झाला. मनात मांडे खावून उपयोग नाही. त्यासाठी वेळेवर नीट वागायचं होत." आजी म्हणाल्या.
" कधी कधी चुका होतात. आपणच त्यांना समजून घ्यायला हवं"
" आम्ही नाही, तुम्ही निस्तरा आता हे." आता बरी ही सुलभा हळू आवाजात बोलते आहे. ऋषीच्या लग्नात किती गोंधळ घातला. नेकलेस पदरात पाडून घेतला. भामटी आहे.
" तुम्ही हिच्या साठी स्थळ बघा आजी." सुलभा म्हणाली.
" नको बाई, तुमची पोरगी तुम्हाला वाटेल ते करा. उद्या काही करता काही झालं तर लोक मला विचारतील. एक तर रिटा फार गुणी आहे. घरकाम, स्वयंपाक पाणी काही जमत नाही. एक आम्ही होतो डोळेझाक करून होकार दिला होता. इथे मदतनीस आहेत म्हणून काही अडणार नव्हतं. दुसरीकडे अस चालणार नाही." आजी म्हणाल्या.
" बघितलं का रिटा तुझ्या एका चुकीमुळे काय काय होतं आहे. "
"ऋषी ऑफिसला गेला का?" सुरेश मामाने विचारलं.
" हो मग तो खूप सिरियस आहे. ऋषी, पूनम, सूनबाई सगळे बिझी असतात. "
" आशाताई आत आहे ना? "
" हो, हे बघ सुरेश यापुढे आशाला काही सांगू नको. तुम्ही लोकं तिला खूप इमोशनल ब्लॅकमेल करतात. नंतर तिला त्रास होतो. आधी ही तुम्ही अस केलं होतं. तेव्हा मी काही म्हणाले नाही. आता जर तिला काही सांगितलं आणि त्रास झाला तर माझ्याहून कोणी वाईट नाही. आता तुमचं तुम्ही बघत जा जरा. " आजी ओरडल्या.
सुरेश मामा, सुलभा मामी एकमेकांकडे बघत होते. रिटाच्या चेहर्यावर पस्तावा झाल्याचे भाव होते. तिला थोडी तरी जगाची ओळख झाली होती. ते आशाताईंच्या रूम मधे गेले. त्या उठून बसल्या. रिटा रडत होती.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
