सोनेरी नात्यांची वीण भाग 54
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
मामी च्या बोलण्याने सोनल दुखावली गेली होती. त्यात घरचं टेंशन. सोनल ऋषीला बाबांच्या ट्रीटमेंट बद्दल सांगेल का? आता पुढे.
सोनल आशाताईंच्या रूम मधे आली. ऋषी, आर्या ही सोबत होते.
" आई चला, तुम्ही बाहेर जेवायला येत आहात ना? सॉरी आज उशीर झाला. आर्याला, तुम्हाला जेवायला दिलं नाही. " ती प्रेमाने म्हणाली. खर तर आज तीचं लक्ष नव्हतं. एक तर मामा, मामी आल्याने ती कंटाळली होती त्यात लोनचं काम होत नव्हतं. किती फिरणार.
"हो सोनल, सॉरी बेटा." आशाताई म्हणाल्या.
" का आई? काय झालं?" ऋषी विचारत होता.
" काही झालं नाही. " सोनल पटकन म्हणाली. उगीच वाद नको.
"ते थोड्या वेळा पूर्वी रिटा, सुलभा... सोनलला वाटेल ते बोलत होत्या." आशाताई सांगत होत्या.
"मी बघतो. "ऋषीने आर्याला खाली उतरवलं. तो बाहेर येत होता.
सोनल मागे पळाली." अहो नको. प्लीज त्यांना काही बोलू नका. "
" का बोलायच नाही? तू घाबरू नकोस. त्या काय म्हणाल्या?" ऋषी विचारत होता.
सोनल गप्प होती.
"मी काय विचारतो आहे सोनल? " त्याचा आवाज वाढला होता.
" आई तुम्ही सांगा ना. भांडण नको वाटत. मला त्रास होतो आहे." ती खाली बसली. ऋषीने तिला पाणी दिलं.
" काय होत आहे सोनल? "तो घाबरला होता.
" जावू दे ऋषी. ती नको म्हणते आहे. वाद नको. ती घाबरली आहे. जा बेटा जेवून घे. " आशाताई म्हणाल्या.
" थांब आई. सोनल काय झाल? तुला मामी जास्त बोलल्या का? " ऋषी विचारत होता.
" नाही, हेच म्हणाल्या की मी साधी दिसते. मध्यमवर्गीय वाटते. त्यांना मी पसंत नाही. त्यांना काय बोलायच ते बोलू द्या. त्यातून त्यांचे स्वभाव, संस्कार दिसतात. आपण का आपल्या घराची शांती बिघडवायची. तुम्ही दिवस भर ऑफिस मधे थकतात. चला जेवून घ्या." तरी तिने नेकलेस बद्दल टोमणे मारले ते काही सांगितलं नाही.
" मग तू का घाबरली? " त्याने विचारलं.
"मला कोणी मोठ्याने बोललं तरी भिती वाटते. पहिल्या लग्नानंतर अस झालं आहे. ते लोक माझ्याशी खूप भांडत होते." सोनल म्हणाली.
आशाताई, ऋषी गप्प बसले. आर्या सोनल जवळ गेली." मम्मी काय झालं? "
" काहीच नाही बेटा, चल तुला जेवायला देते. आई चला."
"काय लोक आहेत. मामा मामी का आले आहेत. आई त्यांना या पुढे इथे बोलवत जावू नकोस. " ऋषी म्हणाला.
" जावू दे जेवण करून जातील. चला." आशाताई म्हणाल्या.
आशाताई ऋषीच्या मदतीने बाहेर आल्या. पुनम, आजी, मामा, मामी, रिटा आधीच टेबल जवळ बसले होते. रिटा मुद्दामून ऋषीच्या नेहमीच्या खुर्चीच्या जवळ बसली होती.
सोनलने आधी आर्याचं ताट केल. ती जेवत होती. मग तिने आशाताईंची पेज आतून आणली. त्यांना थोडी पोळी भाजी ही दिली.
" सोनल तुला माहिती नाही का आशाताईंना या जेवणाने त्रास होईल." मामी ओरडल्या.
" आई पोळी भाजी खाते. फार नाही अर्धी पोळी घेते." पूनम सांगत होती.
" अग सोनलला माझी खूप काळजी आहे. ती माझ खूप करते." आशाताई सांगत होत्या.
रिटा वेगळच वागत होती. ती ऋषीला वाढायला उठली.
" सोनल... " ऋषीने आवाज दिला." माझ ताट वाढ. "
ती पटकन उठली.
रिटाने वाढलेलं ताट त्याने मामाला दिलं. सोनलने त्याच ताट केलं.
" मला भेंडी जास्त दे. पनीर काढून घे. " त्याने ती भाजी सोनलच्या ताटात ठेवली. सोनल आर्या जवळ बसायला जात होती.
" कुठे जाते आहेस? इथे माझ्या जवळ बस." ऋषी म्हणाला.
" रिटा इकडे ये. माझ्या बाजूला बस." आजी आवाज देत होत्या.
सोनल ऋषी जवळ बसली. एकीकडे ती आर्या कडे बघत होती. दुसरीकडे ती ऋषीला वाढत होती.
दोन दिवसात बरीच प्रगती झाली. बायको शिवाय याच पान हलत नाही. मामीची चिडचिड होत होती. रिटा ही आजी जवळ बसुन त्या दोघांकडे बघत होती.
जेवण झालं. आर्या आत गेली. पूनम तिच्या सोबत होती. मामा, मामी, रिटा, आजी, ऋषी पुढे बसले होते. आशाताई आत आराम करत होत्या. सोनल आवरत होती. थोड्या वेळाने ती कोणाशी न बोलता ऋषीच्या रूम मध्ये गेली. मामी बघत होत्या. रिटाला खूप राग आला होता.
सोनलने कपडे बदलले. उद्या कोणते तास आहे ती बघत होती. आज ती खूप थकली होती. नोट्स काढून का? ती विचार करत होती.
तिचा फोन वाजत होता. पर्स मधून तिने फोन बाहेर काढला. अननोन नंबर होता. कोणाचा फोन असेल? फोन कट झाला. परत आला. तिने उचलला
"कोण बोलत आहे?"
" मी सुभाष."
ती घाबरली होती. हा वेगळा नंबर दिसतो आहे. तिने फोन कट केला. बापरे यावेळी आता यांचा फोन का आला? मला त्रास द्यायचा प्रयत्न सुरू आहे. ऋषीला सांगू का? नको... आज ते खूप चिडले होते. तिने त्याचा नंबर ब्लॉक केला. तिने पटकन पाणी पिलं. फोन सायलेंट वर टाकला.
******
"चला आम्ही निघतो." मामा, मामी जागेवरून उठले. रिटा तिथेच बसून होती.
"ऋषी हीच काम कर ना. तिला जॉब हवा आहे." मामांनी विषय काढला.
" तिला ऑफिस मधे डायरेक्ट एप्लाय करायला सांग मामा. इथे सांगून उपयोग नाही. इंटरव्ह्यू मधे पास झाली तर घेतील." ऋषी म्हणाला.
" अरे पण तू सांग ना. तुझ्या एवढ्या कंपनी आहेत."
"मी का सांगू मामा? सगळीच का बळजबरी? स्वतः च्या हिमतीवर जॉब मिळवायला हवा." ऋषी म्हणाला.
" ठीक आहे तू म्हणतो तस. " मामा म्हणाले.
" उद्या फोन कर रिटा." सुलभा मामी म्हणाली.
" हीचं काय अजून? "आजींनी विचारलं.
" ही इथे थांबते आहे. पुनम सोबत राहील. तिला काहीतरी विचारायचं आहे. " सुलभा मामी सांगत होती.
"अजिबात जमणार नाही. हिला तुमच्यासोबत घेऊन जा. ति इथे राहणार नाही. " आजी म्हणाल्या.
मामी आजीचं ऐकत नव्हत्या. रिटाला सोडून जात होत्या.
"काय सांगितलं सुलभा? तुमचं आता इथे सगळं संपलं. ती रिटा इथे अजिबात नको. तिला घेवून जा. " आजी ओरडल्या.
" मामा, मामी, तुम्ही आम्हाला त्रास का देता आहात? इथे येऊन तुम्ही सोनलला पण खूप बोलला आहात असं मला समजलं. आता तुम्हाला काय हवं आहे." ऋषी विचारत होता.
" आम्ही काहीच बोललो नाही. तीच तुझ्या मनात आमच्याविरुद्ध भरते आहे. तिला वाटत रिटा इथे यायला नको. तिला एकटीला या घरावर सत्ता गाजवायची आहे. " मामी म्हणाल्या.
" बरोबर आहे ना मग. हे सगळं सोनलचं आहे. ती सत्ता गाजवले नाहीतर काही पण करेल. तुम्हाला त्याच काय? तिने मला काही सांगितलं नाही. मला आईने सांगितल. " ऋषी म्हणाला.
" तुझ्या बायकोच्या अंगात किती गुण आहेत लवकर समजेल. तेव्हा आम्हाला काही सांगू नका ऋषी. असे मध्यमवर्गीय पैशासाठी लग्न करतात. रिटा आता तुम्हाला इथे रहायला नको आहे. ठीक आहे आम्ही तिला घेवून जातो. पण ती काही तुम्हाला परकी आहे का. ती आत्या जवळ राहू शकत नाही का? सगळं त्या सोनल मुळे झालं. तिच्यामुळे ऋषी आम्हाला बोलत आहेत. " सुलभा मामी म्हणाली.
" सोनल मुळे नाही तुमच्या खराब वागण्या मुळे तुम्हाला त्रास होतो आहे." ऋषी म्हणाला.
" चला अहो. आता हे सगळे एका बाजूला झाले. आधी लग्न झालं नव्हतं तेव्हा आपली गरज होती. रिटा साठी मागे मागे करत होते. "
" काहीही बोलशील सुलभा? रिटा चं स्थळ तुम्ही घेवून आले होते. ऋषी नाही म्हणत होता." आजी म्हणाल्या.
" जुना विषय आत्ता काढायची गरज नव्हती मामी. माझ लग्न झाल आहे. माझ्या बायकोला तुम्हाला मान देता येत नसेल तर इथे यायचं नाही. " ऋषी म्हणाला.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
