Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 57

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 57

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

राजेशला लोन मिळणार होत म्हणुन सोनल रीलॅक्स होती. ऋषी, सोनल पार्टी साठी आले. मनीष अनिता ही आले होते. ते एन्जॉय करत होते. आता पुढे...

मेहता साहेब आले. त्यांची पत्नी, मुलगा, सुन सोबत होते. त्यांनी ओळख करून दिली. "मेहता ग्रुप तर्फे तुमच स्वागत आहे इमानदार साहेब. तुमच्या बरोबर काम करायला मिळत आमच सौभाग्य आहे."

"ही सोनल माझी पत्नी."

"हॅलो मॅडम."

मीटिंग मधे ऑर्डर बद्दल सांगत होते. ऋषी किती महत्वाची व्यक्ति आहे सोनलला समजल. सगळीकडे त्याला फार मान होता. मोठी ऑर्डर साठी ते सोबत काम करणार होते. मोठे मोठे करोडोचे आकडे ऐकून सोनल गप्प बसली.

ऋषी, मेहता साहेबां सोबत बिझी होता. थोड्या वेळाने तो सोनल जवळ येवून बसला.

"अरे असे आरामात बसायला इथे अलाऊ नाही." त्या दोघांना डान्ससाठी पुढे केलं.

ऋषीने हात पुढे केला. सोनलने त्याच्याकडे बघितलं.

"डान्स." तो म्हणाला.

ती आजुबाजुला बघत होती बरेच कपल छान नाचत होते. बापरे अस करायचं. यांच्या इतक्या जवळ जावून? ते ही लाइट किती मंद आहेत. वेगळचं वातावरण आहे. या नात्याची सुरुवात तर कधी ना कधी होईलच.

"मला डान्स जमत नाही." ती हळूच म्हणाली.

"मला ही. नाचायचं आपोआप येईल."

तिने त्याच्या हातात हात दिला. दोघं छान नाचत होते. एकमेकांकडे बघत होते. त्यांच्यात फार छान केमिस्ट्री होती. एकमेकांचा होणारा स्पर्श दोघांसाठी हवाहवासा होता. तिचा हात हातात घेवून तो खुष होता. तिला भक्कम साथ मिळाली होती. मधेच त्याने तिच्या कमरे भोवती हात टाकून तिला थोड उचलून घेतलं. गोल फिरवलं. बाकीचे असे नाचत होते.

तिने लाजून त्याच्या छातीवर चेहरा लपवला. या जगात ते दोघं आहेत अस त्यांना वाटत होत. सोनल ऋषीच्या मिठीत होती. तिने डोळे बंद केले. खूप छान वाटत आहे. त्याला ही समजत होतं. तो तिला छान सांभाळत होता. मंद लाइट पूर्व वत झाले. म्युझिक ही बदललं. ती बाजूला झाली.

"अहो पुरे आता."

"लेडीज अँड जेंटलमन. मिस्टर अँड मिसेस ऋषी इनामदार यांचे खूप अभिनंदन. त्यांच आताच लग्न झालं आहे. खर तर ही पार्टी फक्त ऋषी, सोनल साठी आहे. बोथ ऑफ यू एन्जॉय आणि तुमचा हनीमून फेज कधीच संपू नये. खूप खुश रहा." अनाऊन्समेंट होत होती.

सगळे टाळ्या वाजवत होते. अभिनंदन करत होते. ऋषी तिचा हात धरून उभा होता. सोनल लाजली होती.

अस ही जग असतं मला माहिती नव्हतं. हे सगळे किती आनंदात जगत आहे. नाहीतर काही काही लोक दुसर्‍याला त्रास देवून उगीच टेंशन युक्त वातावरण तयार करून ठेवतात. जगण्याचा आनंद घेत नाही. हे खर आहे का? तिला समजत नव्हतं. ती पण ऋषीकडे बघत होती.

"काय झालं?" त्याने विचारलं.

तिने काही नाही अशी मान हलवली.

"अजून डान्स करायचा?" त्याने मिश्किल टोन मधे विचारलं.

"नाही." ती हसत होती.

माझ्या जवळ हिला आवडत वाटतं. ऋषी लांबून तिच्याकडे बघत होता. तीच सौंदर्य त्याला वेड लावत होतं. त्यापेक्षा तिच्यातले गुण त्यामुळे ती सगळ्यांना प्रिय होती.

"आधी नाही म्हणत होता. आता बरा लाइन वर आला ." मनीष अनिताला सांगत होता.

" ऋषी भाऊजी सोनलला नाही म्हणत होते?" तिला आश्चर्य वाटल. एवढी सुंदर चांगली मुलगी आहे.

"हो, हे दुसर लग्न आहे ना. एकदम मन तयार होत नाही."

"बरोबर आहे. पण हे दोघे मेड फॉर इच अदर आहेत." अनिता म्हणाली.

" पण ते अजूनही फिरायला गेले नाही."

" ओह मग हे सगळ्यांसमोर का फक्त. " अनिता विचारत होती.

" प्रेमाची सुरवात असेल."

******

पूनम एअरपोर्ट वर आली. फ्लाइट लॅण्ड झाली होती. राघव बॅग घेऊन बाहेर यायला अजून दहा पंधरा मिनिटे होती. ती वाट बघत होती. ती तिथे कॉफी शॉप मधे बसली. थोड्या वेळाने तो येतांना दिसला. ती पळत त्याला भेटायला गेली. दोघ खुश होते. त्याने तिला एकदम जवळ घेतलं.

"लग्नाआधी भेटायचो तस वाटत आहे ना?" तो म्हणाला.

"हो." ती पण खूप खुश होती.

"वाह पूनम तू खूपच सुंदर दिसते आहेस."
ती लाजली होती.

" आजची तयारी वेगळी आहे. हा ड्रेस तुला छान दिसतो."

दोघांनी कॉफी घेतली. दोघं खूप बोलत होते. राघव नुसत तिच्याकडे बघत होता. तिने ही बाकी कोणताच विषय घेतला नाही. फक्त प्रेमाने काळजीने ती बोलत होती.

"मग आता काय प्रोग्राम आहे राघव. डिनर साठी चलतो ना?" तिने विचारल.

" फक्त डिनर?" तो म्हणाला. ती त्याचा अर्थ समजून लाजली होती.

"तुमच्या कडे जावू या का? घरी माहिती नाही मी आज येणार आहे. मला तुझ्या सोबत रहावसं वाटत आहे." राघव म्हणाला.

"हो." पूनम म्हणाली. पण अस घरच्यांना चोरून लपून भेटायचं म्हणजे काय? आम्ही लग्न केलं आहे. त्यात काय त्यांना इतक घाबरण्यासारखं. हा ठाम पणे माझ्या बाजूने कधीच उभ रहात नाही. घरी सांगायच ना की मी आलो आहे पूनम सोबत आहे.

पण तिने रागावर कंट्रोल ठेवला. वहिनीने सांगितल तस करून बघू. फक्त चांगलं बोलायचं. यातून हा प्रॉब्लेम मिटेल. माझ्यासाठी राघव महत्वाचा आहे.

ते कार मधे बसले. राघवने तिचा हात हातात घेतला. "मला तुझ्या शिवाय करमत नाही पूनम. अस दूरदूर जगण्यात काही अर्थ नाही."

"मला ही तुझ्या सोबत रहायचं आहे राघव." तिचे डोळे भरून आले होते. त्याने तिला जवळ घेतल.

" आपण आपला विचार करू. आज मला खूप छान वाटत आहे. काय करता येईल?" त्याने विचारलं.

" आज नको उद्या बोलू . आज फक्त आपण प्रेमाने सोबत राहू. "

" ठीक आहे." त्याने दुकानातून आर्यासाठी खाऊ घेतला. ते घरी आले. आर्या आत्तूला बघून खुश होती. आजी ही पटकन पुढे आल्या.

"ये राघव बस बेटा. "

आशाताई पुढे बसल्या होत्या. जावई आले त्या ही खुश होत्या.

"ऋषी दादा ऑफिस हून आले नाही का? " राघवने विचारलं.

" दादा, वहिनी पार्टीला गेले आहेत. त्यांना घरी यायला उशीर होईल." पूनम सांगत होती.

पूनम किचन मधे गेली. लताताईंनी अजून एक भाजी केली. मसाले भात केला. ते जेवायला बसले. पूनम ताट वाढत होती. आर्या बडबड करत होती. आता पर्यंत घरी काय काय झालं सगळं ती राघवला सांगत होती.

" मामा तुम्ही आत्तूला घेवून जाणार? "

" हो. तू ही येतेस का? "

"नको. आता इकडे मम्मी आहे. मला ती आवडते. मी तिच्या सोबत रहाते. " आर्या म्हणाली.

"वहिनी चांगली आहे का?" त्याने हळूच विचारलं.

"हो राघव खूप चांगली. तीच आर्याची आई आहे अस वाटतं. ती आर्या खूप करते. "

जेवण झाल्यावर राघव आजी आशाताई बोलत बसले होते.

" आत्तू मी तुझ्या जवळ झोपते. "आर्या म्हणाली.

" हो चल. "

"असू दे तिला इकडे दे."आजी म्हणाल्या.

"चल आर्या मी तुला गोष्ट सांगते. "

राघव, पूनम रूम मधे आले. तिने दरवाजा लावला. ती त्याच्या मिठीत शिरली. दोघ काही बोलत नव्हते. ती घट्ट मिठी सांगत होती ते एकमेकांना किती मिस करत होते. राघवने तिला जवळ घेतल. त्यांनी सोबत वेळ घालवला. पूनम त्याच्या जवळ खूप खुश होती.

" मला रोज अस प्रेम हवं. आनंदाच वातावरण हवं राघव. मला दुरावा सहन होत नाही."

"तू म्हणते ते करू."

ती त्याच्याकडे बघत होती.

"प्रॉमीस. आपण वेगळ घर घेवू."

"आई बाबा?"

" त्यांच्या जवळ घर घेवू. म्हणजे लक्ष ही राहील आपण ही असे गोड सोबत राहू सुखी राहू. तुला हवी ती सोय करून घे. मदतनीस लावू. "

"खरच? "

" हो. पण एक अट आहे. असच छान रोज माझ्या जवळ यायच." राघव म्हणाला.

"हो." ती लाजली होती." हे खर आहे ना राघव?"

" हो. " त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ती परत त्याच्या मिठीत शिरली.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"