Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 59

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 59

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषी सोनल मधे छान बोलणं होत आहे. दोघांना एकमेकांची गरज आहे. त्यांच काय ठरत ते बघू. सोनल होकार देईल का? आता पुढे.

"राघव आटोपल का?" पूनमने आत येत विचारलं.

" हो. मी ऑफिसला जातो. दिल्ली ट्रीपचा रीपोर्ट द्यावा लागेल. आपण लवकर सगळं ठरवू. मी घर बघतो आहे. आपण तिकडे शिफ्ट होवू. तुला काय सामान हव याची लिस्ट करून ठेव. " तो तयारी करत म्हणाला.

"हो. नक्की. मला भेटायला येत जा." पूनम म्हणाली. तो इथे आला म्हणून खर तर आज ती खूप खुश होती. त्यासोबत राघव इथून जाईल म्हणून तिला वाईट वाटत होतं. माझ्यासोबत असतांना तो खूप चांगलं वागतो. तिकडे सासरी गेला की बदलतो. त्यामुळे वेगळं घर घेतल्या शिवाय आमचं काही नक्की नाही तिला माहिती होतं. एवढा अनुभव तर तिला आला होता.

"हो आता घर मिळे पर्यंत मी इथे रहाणार आहे. पूनम.... तुझ्या जवळ." त्याने तिला जवळ ओढलं. मिठीत घेतलं.

"काय?" तिला आनंद झाला होता.

" हो. कारण एका मुली शिवाय मला करमत नाही." तो तिच्या मानेवर नाक घासत होता.

"घरी काय सांगणार आहेस?" ती बाजूला होत म्हणाली.

" हेच की मी तुझ्या सोबत आहे."

"पण ते ओरडले तर?" पूनम त्यांना घाबरून होती.

"ओरडू दे. अस ही काहीही केल तरी आईला प्रॉब्लेम असतो. ती ही नीट रहात नाही आपल्याला ही राहू देत नाही. प्रत्येक नातं वेगळ असतं. मी आता प्रत्येकाशी वेगळं वागणार आहे. तुला सोडून रहाणार नाही. मला आवडत ते करणार. या आधी मी सगळ्यांना धरून ठेवायचा प्रयत्न करत होतो. ते शक्य होत नाही. अश्याने कोणी सुखी होत नाही. उगीच भांडण गैरसमज होतात. आपल्याला ही जगायचा हक्क आहे. " राघव म्हणाला.

" हे खर आहे ना राघव? आपण सोबत राहू? "

"हो या पुढे मी कधीच तुला अंतर देणार नाही. मी आधीच हा विचार केला होता. ऋषी दादाच्या लग्नात मी तुला हे सांगणार होतो. तेव्हा उगीच आपले भांडणं झाले." राघव सांगत होता.

ते दोघ बाहेर आले. ते खुश होते स्पष्ट दिसत होत. आज ते दोघ सोबत ऑफिसला जाणार होते.

सोनल सगळ्यांना पोहे देत होती. राघव पूनम तिच्याशी बोलत होते. राघव चांगला आहे तिला पटलं. चला माझी प्रिय नणंद परत एकदा संसाराला लागेल.

ऋषी सोनलकडे बघत होता. न बोलता त्याच्या मनातल्या भावना तिला समजत होत्या. त्याच्या समोर तिला काही सुचत नव्हतं.

" तुला उशीर होत असेल तर जा बेटा. मी नाश्त्याच बघते." आजी म्हणाल्या.

" मी तुला शाळेत सोडून देईल सोनल थांब. " ऋषी म्हणाला. तिला त्याच ऐकावं लागलं. आर्याच आवरायला सोनल आत गेली.

राघव, ऋषी गप्पा मारत होते.

" पूनमने ऑफिस जॉईन केलं. तुम्ही ही विचार करा." ऋषी म्हणाला.

" हो तेच ठरवतो आहे."

" तुमची दोघांची कंपनी आहे. तुमच्या ताब्यात घ्या. "

"हो टीम ही खूप छान आहे." पूनम म्हणाली.

"माझ लक्ष असेलच. मिळुन काम करू." ऋषी त्याला समजावत होता. पूनम साठी त्याची ही धडपड होती.

" तुमच काय ठरलं?" आजी विचारत होत्या.

"राघव घर बघतो आहे. आम्ही तिकडे राहू. " पूनम सांगत होती.

"ऋषी." आजी म्हणाल्या.

" हो. अजेंटला सांगतो. तो तुला फोन करेल पूनम. " ऋषी म्हणाला.

"नाही दादा, आम्ही करू. "

" एवढ काय. त्याला तुझी रीक्वायरमेंट सांग." ऋषी म्हणाला.

" हो. "

" घर विकत घेवून टाका."

" चालेल. "

" पोहे छान झाले. " राघव म्हणाला.

" सोनलने केले." पूनम म्हणाली.

" ती कुठे आहे? " ऋषी विचारत होता.

"आर्याला तयार करते आहे. शाळा आहे ना." पूनमने सांगितलं.

आर्या पळत आली. "डॅडी मला आजही फेवरेट लंच आहे. "

" हो का."

" मम्मीने केला. सँडविच आणि केक. मी घरी आल्यावर पोळी भाजी खाणार. " ती सांगत होती.

" गुड गर्ल. "

तिने पूनम कडे बघितलं. "तू तुझ्या घरी जाते आहेस का आत्तू? " तिचा चेहरा रडवेला झाला होता.

" नाही मी इथेच आहे. तुला सांगितल्या शिवाय जाणार नाही. ओके. चला गोड पापी द्या. " पूनमने तिला जवळ घेतलं.

आर्या शाळेत गेली. सोनल ऋषी जवळ बसली होती. त्यांच्या गप्पा ऐकत होती. तिचा नाश्ता झाला. ती आशाताईंना भेटून आली.

ऋषी, सोनल निघाले. कारमध्ये ती गप्प होती.

यांच्याशी बोलून बघू का? काल हे जे म्हणाले ते त्यांना आठवत असेल का? तिला हसू आलं. तस हे सकाळ पासून नजरेने माझा पीच्छा करत आहेत. एवढ्या लवकर हे माझ्याशी बोलतील वाटलं नव्हतं.

जावू दे बरेच वर्ष झाले ते ऐकटे होते. त्यांना ही वाटत असेल. त्यांनी सारखी गेलेल्या बायकोची आठवण काढत दुःखी रहायचं का? अजिबात नाही. त्यांना ही सुखी रहायचा हक्क आहे.

मला? मला ही यांच्या सोबत आवडत. ऋषी बद्दल प्रेम वाटतं. कोणाचा तरी आधार असावा अस वाटतं. काल त्यांच्या जवळ डान्स करतांना छान वाटत होत. तो होणारा स्पर्श हवाहवासा होता. ती लाजली होती.

ऋषी तिच्याकडे बघत होता. त्याने पुढे होऊन तिचा हात हातात घेतला. ती पण त्याच्याकडे बघत होती. "तुला काय वाटलं मी काल जे म्हणालो ते विसरलो असेल?"

दोघं हसत होते.

"तसं नाही पण मला वाटलं..." ती गप्प बसली.

" समजलं. तुला वाटलं मी उगीच पार्टी झाल्यानंतर ड्रिंक्स घेवून बडबड करत होतो. "

ती काही म्हणाली नाही.

" मी सहजासहजी कोणात मिक्स होत नाही. माझ्या मनात कोणाला ही लगेच जागा मिळत नाही. तू स्पेशल आहेस. मला सुरवाती पासून तुझ्या बद्दल वाटत. मला माहिती आहे आपलं लग्न खूप गडबडीत झालं. दोघांना भूतकाळ आहे. पण आता सोबत आहोत ना. मग नीट राहू. तुला माझ्याबद्दल काय वाटत?" त्याने विचारलं.

" तुम्ही समजूतदार आहात. घरातल्यांना सांभाळून चालतात." ती म्हणाली.

" घरच्यांना माझ्या शिवाय कोणी नाही. सगळया चांगल्या आहेत. मी नाही त्या मला सांभाळून घेतात. आता तू ही. पण हे जनरल झालं. तुला मी तुझा जीवनसाथी म्हणून अजून काय वाटत?" त्याने विचारलं.

आता ती लाजली होती. अस बोलायची कधी वेळ आली नव्हती. आधी सगळं गृहीत धरून होत होतं. तुला काय वाटत अस कोणी कधी विचारल नाही.

" मला ही तुमच्या सोबत रहायचं आहे." ती म्हणाली. तो ही खुश होता. तिच्या जवळ सरकून बसला. दोघ थोडा वेळ शांत होते. नवीन नात होतं. नवीन भावना. वेगळच वाटत होत.

" तुमचं काय झालं होतं? म्हणजे माया मॅडम बद्दल थोड सांगा." तिने विचारलं.

" काहीच नाही. माझं खूप सुखी आयुष्य होतं. पण त्यालाच नजर लागली. माया आजारी होती. आर्याच्या जन्मानंतर तिचा मृत्यू झाला. इतके दिवस मी तिच्याच आठवणींवर जगत होतो. स्वार्थी होत होतो. मला हे समजलं नाही की आई, आजी, आर्याला कोणाची तरी गरज आहे. पण तू अस समजू नको की हे लग्न मी फक्त त्यांच्यासाठी केलं आहे. तू सुद्धा माझ्यासाठी आता स्पेशल आहेस. "

माझ्या मनात माया असेल पण तुझ्याबरोबर ही मला चांगलं वाटतं. दोघींचा कंपॅरिझर होऊ शकत नाही. तो विचार करत होता.

" तुझं काय झालं होतं? " त्याने विचारलं.

" एका मध्यस्थी कडून हे लग्न जमलं होत. आमचं अजिबातच पटत नव्हतं. सासुरवास खूप होता. त्यांनी हुंडा ही घेतला तरी हाव संपत नव्हती. वेगवेगळया मागण्या होत होत्या. सुभाषने मला कधीच समजून घेतलं नाही. माझी नोकरी त्यांना आवडत नव्हती. आई म्हणेल तीच पूर्व दिशा होती. रोजचे भांडण होत होते. समजूतदारपणा असा नव्हता. शेवटी मी स्वतःची सुटका करून घेतली. " तिने थोडक्यात सांगितलं.

" बापरे त्रास झाला असेल. "

" हो, खूप. काय सांगू काय नको अस आहे. जावू द्या. मी आता ते विसरायचं ठरवल आहे. मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. परवा सुभाषचा फोन आला होता. "

ऋषी सोनलकडे बघत होता. " का? " त्याला राग आला होता.

" माहिती नाही. मी पटकन ठेवून दिला. "

"कशाला ठेवला. माझ्याकडे द्यायचा होता. मला का नाही सांगितलं?"

"खूप भीती वाटत होती. वाटल तुम्ही गैरसमज केला तर? काही गोष्टी माझ्या मनातून जात नाहीत. मला माहिती नाही ते आता का फोन करत आहे. मी डिवोर्स झाल्यापासून त्याच्याशी बोलले नाही." सोनल म्हणाली.

"आता जर फोन आला तर आपण त्याच्याकडे चांगलं बघू. तू रीलॅक्स रहा. आता तो आहे मी आहे. " ऋषी म्हणाला. सोनलला आता बरं वाटत होतं.

शाळा आली. ती खाली उतरली. तिने ऋषिकडे हसून बघितलं. दोघं खुश होते.

" लवकर घरी या. "

" हो. " तो म्हणाला.

ती स्टाफ रूम मध्ये आली. आज तिला खूप छान वाटत होतं. माझं कोणीतरी आहे. हक्काचं माणूस. ती लगेच वर्गावर गेली. तास सुरू झाला.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"