सोनेरी नात्यांची वीण भाग 1
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी ऐसपैस बंगला होता. येणार्या जाणार्या लोकांच लक्ष वेधून घेणारा. आज त्या घराची किंमत करोडोच्या घरात होती. श्रीमंतीच्या सगळया खुणा आजुबाजुला दिसत होत्या. सुंदर बगीचा, लक्झरी गाड्या, सिक्युरिटी सगळं नीट होतं. गेटवर पाटी होती. इनामदार व्हीला.
बंगल्याच डेकोरेशन सुरू होतं. उद्या ऋषी इमानदारचं लग्न होतं. या घरचा कर्ताधर्ता पुरुष. वडील वारल्यानंतर त्याने एका हाती घर, बिझनेस सांभाळला होता. स्वभावाने सिरियस असा तो अतिशय प्रॅक्टिकल होता.
अनुभव असे आले होते. एवढा श्रीमंत राजकुमार पण सुख अस नव्हतं. नुसती जबाबदारी अंगावर पेलून तो असा झाला होता. सगळे त्याचा शब्द झेलायला तयार असायचे. बिझनेस मधे तो मुरला होता. खाजगी आयुष्यात त्याला काय हव होत ते माहिती नव्हतं.
बंगल्यात वरच्या बाजूला त्याची बेडरूम होती. सकाळी जिम मधून जावून आल्यावर तो तयार झाला होता. थ्री पीस सूट मधे तो अतिशय हॅन्डसम दिसत होता. केस सेट करून त्याने शूज घातले. लॅपटॉप घेवून तो निघाला.
"साहेब नाश्ता." लता मावशी आवाज देत होत्या. त्याचं पूर्ण घर बघत होत्या.
त्याने भराभर खाल्लं. त्याचा फोन वाजत होता. मनीष होता. तो त्याचा प्रिय मित्र होता. त्याच्या ऑफिस मधे काम करत होता.
"ऋषी आज ऑफिसला येतोस ना?"
" हो मनीष सुट्टी घ्यायचं कारण काय?" ऋषी सिरियस टोनमधे म्हणाला.
" उद्या तुझ लग्न आहे ना. म्हणुन विचारलं."
" मग त्यात काय? मीटिंग शेड्यूल आहे ती होणारच. दुपारी फॉरेनचे लोक आले आहेत. ते ही बघ. ते काम करून टाकू."
" ऋषी अरे..." मनीष बोलत होता तेवढ्यात त्याने फोन ठेवला.
घरी लग्नाची तयारी जवळ जवळ झाली होती. मिठाई, फुल, इतर सामान येत होतं. आमंत्रण कमी लोकांना होतं. ते पाहुणे येत होते.
हो नाही करता करता ऋषी लग्नाला तयार झाला होता. त्यासाठी घरातल्यांना खूप प्रयत्न करावे लागले होते.
चला आता सगळं नीट होईल. सूनबाई घरी येईल ती ही ओळखीची. मामाची मुलगी रिटा. वाह. निर्मला आजी खुश होत्या. नातू वर त्यांचा खूप जीव होता. त्या बिझी होत्या. घरच्या लोकांना हाताशी धरून जमेल तेवढं काम त्या करत होत्या.
मामी मामा या स्थळासाठी पूर्वी पासून प्रयत्न करत होते. आता त्यांचे पाचही बोट तुपात होते. रिटा एवढ्या मोठ्या घरची सुन होणार. कसलीच कमी नाही. तिच्या हाती सत्ता येईल. आपलं ही चांगलं होईल. रिटाला सांगून तिच्या भावाला ऋषीच्या कंपनी मधे काम मिळेल. तो बायकोची विनंती टाळू शकणार नाही. वाह...
"ऋषी कुठे चालला आहेस?" निर्मला आजींनी आवाज दिला.
" ऑफिसला आजी. "
" काय आहे हे? लग्नाचे प्रोग्राम सुरू झाले आहेत. आता तरी घरी थांब. थोडे दिवस सुट्टी घे. लग्न झाल्यावर जोडीने थोड फिरून या." आजी म्हणाल्या.
"ते शक्य नाही आजी. मी तुझ ऐकून लग्न करतोय तेच खूप आहे. अजून माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. मला खूप काम आहेत. आईला भेटून येतो. " ऋषी मोबाईल मधे बघत म्हणाला.
तो रूम मधे आला. आशाताई झोपलेल्या होत्या. त्या बरेच वर्ष झाले आजारी होत्या. विशेष अस नव्हतं पण त्यांना जगण्याची उमेद नव्हती. पूनम, आर्या तिथे होत्या.
डॅडी... म्हणत ती पळत आली. त्याने तिला उचलून घेतलं. "काय करते आहेस बेटा?"
" डॅडी मी आजीला भेटायला आले होते. आता स्कूल मधे जाणार." ती म्हणाली.
"चला पापी द्या. "
तिने तिघे छोटेसे हात त्याच्या खांद्यावर ठेवले. त्याला गोड पापी दिली. ती फक्त चार वर्षाची होती.
"थँक्यू बेटा किती स्वीट होती. "
"डॅडी मी चॉकलेट मिल्क पिलं म्हणून स्वीट होती. "
पूनम आशाताईंना ज्यूस पाजत होती.
" आई बर वाटत का?" ऋषीने विचारलं.
"हो. तू कुठे निघतो आहेस? "
"ऑफिसला."
" उद्या तुझ लग्न आहे. घरी थांब." त्या कष्टाने म्हणाल्या.
"नर्स कुठे आहे पूनम?"
"बाहेर असेल दादा."
"तिला काम दे. तुझ काय ठरलं?"त्याने बहिणीला विचारलं.
" मला त्या लोकांना नोटीस पाठवायची आहे. मी सासरी रहाणार नाही. "
" तुला सगळीच घाई. लग्न करायची ही डिवोर्स घ्यायची ही. एकदा परत विचार कर. " ऋषी म्हणाला.
" माझा विचार झाला आहे. राघव नीट वागत नाही." पूनम म्हणाली.
पूनमच ही लग्न झाल होतं. पण ती माहेरी रहात होती. तिच्या नवर्या सोबत तिचे वाद होते. तो घर जावई व्हायला नाही म्हणत होता. तिचा नवरा राघव अतिशय प्रामाणिक, चांगला मुलगा होता. घरचे ही चांगले होते. तिने कोणाच ही न ऐकता लव मॅरेज केलं होतं. अतिशय श्रीमंतीत वाढलेली ती आता सामान्य परिस्थितीत तिला राहणं जमत नव्हतं.
" आर्या स्कूल नाही का?" ऋषी विचारत होता.
"आहे ना डॅडी. आत्तू मला तयार करत होती. डॅडी उद्या तुझ लग्न का? मम्मी येईल. पण तू म्हणाला होता ती देवाघरी गेली." तिने विचारलं.
त्याने पूनमकडे बघितलं. " आर्याला हे सगळं कोण सांगत ते समजत नाही. पूनम काय आहे हे?"
"मी नाही दादा. आजीने सांगितलं असेल. हो दुसरी मम्मी येणार आहे आर्या. रिटा मम्मी. ओके. ती खूप छान आहे. आर्याचे लाड करणार. तू ही तीच सगळं ऐकायचं. पुरे आता किती प्रश्न विचारणार? चल तयार हो." पूनम म्हणाली.
" हो आत्तू. चल. उद्या नवीन मम्मी येईल ना. मी तिच्या सोबत राहीन. तिला माझे खेळ दाखवेल. उद्या मी तो न्यू फ्रॉक घालेल. " आर्या बडबड करत गेली.
ऋषी नाराज होता. आर्या निरागस आहे. तिची नवीन मम्मी कडून खूप अपेक्षा आहे. पुस्तकात तिने वाचल होतं की मम्मी खूप प्रेमळ असते. तिला तशी मम्मी हवी होती. रिटा कशी निघेल सांगता येत नाही.
पुढे काय होईल? बघू पुढच्या भागात.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा