Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 3

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 3

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

निर्मला आजी पाठकांच्या घरी आल्या. बघू आता त्यांच्या मनात काय आहे ते.

आता पुढे.

मीनलताई, मोहनराव यांनी काटकसरीत संसार केला होता. मुलांवर त्यांचा खूप जीव होता. राजेश, सोनल यांना ते खूप सपोर्ट करत होते.

राजेश ऑफिसला गेला होता. त्याची बायको रसिका घरी होती. ती सोहमचा अभ्यास घेत होती. तो चौथीत होता.

सोनल शाळेत टीचर होती. ती आता एक वर्ष झाले माहेरी रहात होती. तिचा डिवोर्स झाला होता. मनमिळाऊ अशी सोनल हुशार होती. लहान वयात तिला खूप अनुभव आला होता.

सोनल, सुभाषचा जोडा विजोड होता. सासरी ती अँडजेस्ट करत होती. त्याला लायकी पेक्षा चांगली बायको मिळाली होती. त्याला तिची किम्मत नव्हती. तो कस ही वागत होता.

सासरचे खूप छळत होते. रोज उठून पैशाची मागणी होत होती. मारझोड होत होती. सोनल खूप कंटाळली होती. तिला माहेरची परिस्थिती माहिती होती. आई बाबा कसतरी करतात. अश्या पद्धतीने त्यांच्याकडे पैसे वस्तू मागणं चुकीचं आहे. फोनवर मीनलताईंना ती नेहमी सगळं सांगत होती. काय करावं अस त्यांना झालं होतं.

सोनलचे चुलते पोलीसात होते. त्यांच्या मदतीने तिने सासरहून सुटका करून घेतली होती. लगेच पोलीस केस झाली. एक दोनदा दम दिल्यावर सुभाषने त्रास द्यायच कमी केला होता. त्यांचा डिवोर्स झाला.

ती आता तिच्या पायावर उभी होती. शाळेत टीचर होती. साधी, सरळ, छान दिसणारी, शिकलेली, चांगल्या विचाराची सोनल. तिने लग्नाचा धसका घेतला होता. आई बाबांना सांभाळून आता मी त्यांच्या सोबत राहीलं. तिने ठरवलं होतं.

मोहनरावांच्या ट्रीटमेंट साठी तिने लोन घ्यायचं ठरवलं होतं. त्यासाठी ती खूप प्रयत्न करत होती. रक्कम मोठी होती. तिला कमी पगार असल्याने हवं तितकं लोन मिळत नव्हतं.

बाबांची ट्रीटमेंट कशी होईल सोनल आणि राजेश काळजीत होते.

आता सगळं देवाच्या भरोश्यावर आहे. मीनलताई विचार करत होत्या. पैशाचं सोंग करता येत नाही तेच खरं.

******

दारासमोर कार थांबली. मोहनरावांनी उठून बघितलं.

"मीनलताई इथे रहातात ना?" आजी विचारत होत्या.

"हो. या ना."

मीनलताई उठून उभ्या राहिल्या. " अरे या आजी काही काम होत का? तुम्ही एक आठवडा झाला देवळात आल्या नाही."

आजी आत आल्या. काय बोलाव अस त्यांना वाटत होतं. त्या ऋषी बद्दल सांगत होत्या. "तुमची लेक सोनल बद्दल बोलायला मी आली आहे." आजी घरी काय झालं ते सगळं सांगत होत्या. रिटा बद्दल ही त्यांनी सांगितलं.

मीनलताई, मोहनराव आश्चर्य चकित झाले होते. एवढ्या मोठ्या घरचं स्थळ आलं. ती कोण मुलगी रिटा अशी का वागली असेल? मुलात तर काही दोष नसेल ना. त्यांना थोडी काळजी वाटली. एक तर पहिलं लग्न मोडलं. दुसर तरी नीट हवं.

" तुम्हाला तिच्या बद्दल माहिती आहे ना?" मोहनराव विचारत होते.

" हो पूर्ण माहिती आहे. मी सोनलला ओळखते. अतिशय चांगला स्वभाव, साधी मुलगी आहे. आम्हाला अशी मुलगी हवी होती. माझा नातु त्याची मुलगी सांभाळली जाईल." आजी म्हणाल्या.

" आम्हाला तिच्याशी बोलावं लागेल."

" हो काही हरकत नाही. पण जरा लवकर. आमच्याकडे वेळ नाही. सगळी तयारी झाली आहे. ठरवल्या मुहूर्तावर लग्न व्हायला हवं. सगळीकडे आमंत्रण गेले आहेत. तशी खूप बदनामी होते. " आजी म्हणाल्या.

सगळे बोलत होते. रसिका चहा घेवून आली. ती आतून सगळं ऐकत होती. एवढं श्रीमंत स्थळ बापरे. सोनलने नशीब काढलं. रसिकाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. तिने राजेशला फोन करून माहिती दिली. ती खुश होती. सोनलचं लग्न होतयं ते ही इतक्या श्रीमंत घरी. डबल फायदा आहे एक तर नणंद इथून जाईल. दुसर या लोकांकडून खूप फायदा होईल. पैशाची मदत होईल.

" आजच्या आज हो नाही सांगायचं. पण कस शक्य आहे? " मीनलताई म्हणाल्या. त्यांना माहिती होतं सोनल ऐकणार नाही. ती अजून आधीच्या आठवणींवर जगत आहे. तिने सगळ्यांचा धसका घेतला होता.

"आमचा ही नाईलाज आहे. सगळी तयारी झाली आहे. उद्या हे लग्न व्हायला हवं." आजी म्हणाल्या.

मोहनराव मीनलताई बोलत होते.

" पोरगी सुखी रहायला हवी बाकी आम्हाला काही नको. एक तर तिने खूप त्रासात दिवस काढले आहेत." मोहनराव म्हणाले.

" तसच होईल आमचा ऋषी खूप चांगला आहे. मी खात्री देते. " आजी मीनलताई बोलत होत्या.

"आम्ही संध्याकाळी फोन करतो."

" मीनलताई आपली ओळख आहे. रोज मंदिरात भेट होते. इनामदार घराण्या बद्दल तुम्हाला माहिती आहे. ऋषी अतिशय चांगला मुलगा आहे. तो त्याच काम, कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. हे लग्न जुळलं तर बर होईल. तुम्ही ही किती चांगल्या आहात. मला माहिती आहे म्हणून इथे पर्यंत आली. माझ्या कडुन आता काही काम होत नाही. ऋषीची आई आजारी असते. त्याच्या लेकीची काळजी घेणार कोणी हवं. पूनम ही सासरी जाईल. म्हणून घाई आहे. तुम्ही म्हणालं तर आपण मोहनरावांची ट्रीटमेंट करू. मी तुम्हाला पन्नास लाखाची मदत करते. काही कमी पडू देणार नाही. " आजींनी सुचवलं.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"