Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 6

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 6

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

सोनलने पहिल्या लग्नाचा धसका घेतला होता. ती परत नवीन सुरुवात करेल का? बघू...

" बेटा, आजी तुला आधी पासून पसंत करतात. हे लग्न व्हावं ही आजींची इच्छा आहे. " मीनलताई म्हणाल्या.

"त्यांना माझ्या बाबतीत माहिती आहे का? " सोनलने विचारलं.

"हो माहिती आहे."

" कोणी सांगितलं? "

" आमचं मागे बोलण झालं होतं. त्यांनी तुझ्या केस मधे ही खूप मदत केली. वरती फोन केले होते. तेव्हा तर लवकर पोलीस केस झाली." मीनलताई सांगत होत्या.

खूपच स्ट्राँग पार्टी दिसते आहे. त्या लोकांनी ठरवलं ते मला असच सोडणार नाहीत. सोनल विचार करत होती.

"बाबा तुम्हाला हे पटत का? मला हे सगळे मिळून त्रास देत आहेत. " तिने मोहनरावां जवळ कंप्लेंट केली. तिला माहिती होत बाबा समजून घेतील.

" हो मला माहिती आहे. बेटा मला विश्‍वास वाटतो आहे तुझ खूप चांगल होणार आहे. माझ्या समोर हे लग्न झालं तर बर होईल. " मोहनराव म्हणाले.

"काहीही आपलं बाबा. असं बोलायच नाही. " सोनल म्हणाली.

मोहन राव बघत होते, सोनल इथे राहिली तर तिचे हाल होतील. राजेश, रसिका तीच जीणं मुश्किल करत होते. एवढं मोठं आयुष्य ती कस काढेल? त्यापेक्षा ही स्वतः च्या घरी गेली तर बर होईल. आजी किती चांगल्या आहेत. तिकडे घरचे असेच असतिल. ऋषीचा फोटो त्यांनी बघितला होता. बघताच त्यांना तो आवडला होता. अतिशय रूबाबदार असा तो प्रेमळ वाटत होता. स्वतः च्या मुलीला किती छान सांभाळत होता. पुढे जावून बायकोला ही तसच सांभाळेल.

" बेटा ते बाबांची ट्रीटमेंट करतील. त्यांच ऑपरेशन करून घेवू. " मीनलताई म्हणाल्या.

" तू तो विचार करू नको बेटा. तुझ लग्न होईल तर किती चांगलं होईल अस बघ. " मोहनराव म्हणाले.

बाबांची ट्रीटमेंट होईल. वाह. आता सोनलचा विरोध मावळला. तिला बर वाटत होतं.

" आजी अस म्हणाल्या का?" तिने विचारलं.

" हो बेटा. "

मी हो म्हणू का? माझ्या बाबांसाठी मी काहीही करेल. पण यात काही धोका झाला तर? माझं एकदा असं झालं आहे. किती वाईट अनुभव आला. रोज मारझोड होत होती. ते चुकीचे आरोप. उपाशी ठेवत होते. त्या घरी मला किती भीती वाटत होती. सासरचे लोक असेच असतात. अगदी वाईट. मी कशीतरी त्यातून सुटली. परत तेच करू? यात रिस्क आहे. नवीन लोक कसे असतिल समजत नाही? तस तर आजी खूप समजूतदार आहेत.

" ठीक आहे मला विचार करायला वेळ द्या. मी सांगते." सोनल म्हणाली.

" आपल्याकडे वेळ नाही. उद्याचं लग्न आहे." मीनलताई म्हणाल्या.

"काय? एवढी घाई का पण?"

" हो. निमंत्रणं गेले आहेत. ठरलेल्या वेळात लग्न व्हायला हवं. उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे अस आजी म्हणाल्या." मीनलताई सांगत होत्या.

" लग्न झालं आणि ती पळून गेलेली मुलगी परत आली तर? ती त्यांची होणारी बायको होती ना. त्यांनी परत तिच्याशी लग्न करायचा आग्रह केला तर? माझ काय होईल? " सोनल म्हणाली.

" अस होणार नाही. "

" कशावरून? "

" आता त्या आजी म्हणाल्या ना पळून गेलेली त्यांना चालणार नाही."

" आजी म्हणाल्या ते ऋषी तर नाही म्हणाले ना? " सोनल म्हणाली.

" तू वाटल तर त्यांच्याशी बोलून घे. "

" नाही... नको." ती एकदम धडधड झाली.

ती आत बसून विचार करत होती. बाबांसाठी तिने होकार दिला. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मला कोणीच नाही. असच आयुष्य गेलं. लहान पणापासुन प्रत्येक गोष्टी साठी मन मारलं. काहीच चांगलं झालं नाही.

सुभाषने किती त्रास दिला. त्यांच्या घरच्यांच इतक करून ही हातात काही लागलं नाही. राजेश दादा, रसिका वहिनी असच करतात. त्यांना मला घराबाहेर काढायची घाई झाली आहे. मला माझ प्रेमाचं आपलं अस कोणीच नाही.

माहेरी आल्यावर मी शून्यातून सुरुवात केली. सासरच्यांनी काही दिलं नाही. थोडे पैसे होते. लपवून ठेवलेले. म्हणून ते तरी वाचले. त्याच अकाऊंटचं एटीएम तिच्याकडे होतं. ते तिने कोणाला सांगितलं नाही. त्यात ती पैसे साठवत होती म्हणून तेवढे तरी बाजूला पडत होते.

सुभाषला माझ्या लग्नाबद्दल समजलं तर? तो नक्की गोंधळ घालेल. तिकडे येईल. नवीन सासरी उगीच काही सांगितलं तर? मला खूप भीती वाटते.

ऋषी इनामदार कसे आहेत माहिती नाही. दोन दिवसात दोन नवरी बदलल्या. काही खर नाही. आमच्यात खूपच फरक आहे. मला हे जमणार नाही. पण बाबा फक्त तुमच्या साठी मी हे लग्न करते आहे.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"