सोनेरी नात्यांची वीण भाग 7
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
बाकी जावू दे बाबांची ट्रीटमेंट होते आहे म्हणून सोनलने होकार दिला. आता पुढे बघू काय होतय ते...
सोनल मीनलताईं सोबत नेहमी मंदिरात जात होती. तिथे निर्मला आजी येत होत्या. मीनलताई आणि आजी मैत्रिणी होत्या. ती मंदिरात सेवा देत होती. त्या नेहमी बघत असायच्या. किती चांगली नम्र मुलगी आहे. नेहमी किती करते. साधी, शांत. आजींना ती खूप आवडत होती. अगदी सालसं. अशी बायको ऋषी साठी हवी. हीच इनामदार कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळू शकते.
आजींची इच्छा होती. बर झालं ती रिटा पळून गेली. त्या खुश होत्या. त्यांना माहिती होत सोनल हो म्हणेल.
******
मीनलताईंनी फोन लावला. "निर्मला आजी सोनल हो म्हणाली."
" चला छान झालं." आजींना बर वाटलं.
"पण तुम्हाला तिला खूप सांभाळून घ्यावं लागेल. मूल एकमेकांना ओळखत नाही. आम्ही तिला कसतरी लग्नाला तयार केलं." मीनलताई म्हणाल्या.
"तुम्ही सोनलची काळजी करू नका. ऋषी खूप चांगला आहे. हे लग्न खूप टिकेल. पोर सुखात रहातील." आजींना विश्वास होता.
" तुम्ही आहात मला काळजी नाही. " मीनलताई म्हणाल्या.
" मी सगळं सामान उद्या सकाळी पाठवते. तुम्ही वेळेवर हॉल वर या. " आजी पूर्ण प्लॅन सांगत होत्या. कुठे लग्न आहे. किती वाजता आहे.
" हो." मीनलताईंना एकदम भरून आलं. उद्या पोरगी सासरी जाईल. तीच चांगलं होतय तरी ही एक धसका सगळ्यांनी घेतला होता.
******
ऋषी ऑफिस मधे होता. मनीष आणि तो महत्वाचं बोलत होते. आजीचा फोन आला.
" मनीष एक मिनिट. " तो दुसर्या कामासाठी बाहेर गेला.
" ऋषी घरी ये. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे." आजी म्हणाल्या.
"मला रिटा बद्दल सगळं समजलं आहे आजी. आता लग्न कॅन्सल झालं तर काय अस? मला काम आहेत. मी बिझी आहे. थोड्या वेळाने येतो." ऋषी म्हणाला.
" नाही, आत्ता ये. हे बघ माझ्या मनात काहीतरी आहे... " आजी घाई करत म्हणाल्या.
"आजी प्लीज, आता परत माझ्यासाठी स्थळ बघू नकोस. झालं ते पुरे झालं. रोज काय तेच. हा विषय आपण थोडे वर्ष बाजूला ठेवू. सध्या फक्त आर्या आणि ऑफिस याकडे मी लक्ष देणार आहे. मला खूप काम आहेत. " ऋषी म्हणाला.
"उद्या तुझ लग्न आहे. " आजी मधेच म्हणाल्या.
" काय? ती रिटा परत आली का? हे बघ आजी, मला ती मुलगी अजिबात पसंत नाही. आईने शप्पथ दिल्यामुळे मी गप्प होतो. वाटलं लग्ना नंतर आई सांभाळली जाईल. पण ती मुलगी किती अल्लड आहे समजलं. तिला समज नाही. " ऋषी चिडला होता.
" मी काय सांगते ते ऐक. माझी मैत्रिण आहे. नेहमी मंदिरात भेटते. तिची मुलगी आहे सोनल. तिच्या सोबत तुझ लग्न आहे. " आजी माहिती सांगत होत्या.
"अस काहीही आजी. अगदी अति होतय. मला हे अजिबात आवडलं नाही. माझा नकार आहे." ऋषी सगळया अनिश्चिततेला कंटाळला होता. कोण कुठली मुलगी. उद्या सकाळी माझी बायको होईल. हे जमणार नाही.
" माझ ऐक तरी ऋषी, अरे ती खूप चांगली मुलगी आहे. तुझ कल्याण होईल. गरजू आहे. शाळेत टीचर आहे. तिचा दुर्दैवाने डिवोर्स झाला. दुःखी आहे. त्यात वडील आजारी असतात. ऐक ना, अरे आर्या वर चांगले संस्कार होतील. सगळे सांभाळले जातील. "
" आर्यासाठी मी आहे. मला कोणाची गरज नाही. आधी आई अस बळजबरी करत होती आता तू असच करतेस आजी. लग्न काही खेळ नाही. कोणीही पकडून आणा अस करतेस. मला माया सोडून कोणतीही मुलगी आवडतं नाही. उगीच का त्या मुलींच नुकसान करा. माझ या लग्नात मन नाही. " ऋषी म्हणाला.
" अरे माझ वय तरी बघ. मी असे पर्यंत मला तुझ चांगलं करायच आहे. तुझी आई अशी. पूनम सासरी जाईल. मी सांगते ते ऐक. "
" तुला काहीही होणार नाही आजी. उगीच आपल काहीतरी बोलतेस. " ऋषी ओरडला.
" आर्या लहान आहे. तिला आईची हौस आहे. घर कोण सांभाळेल? विचार कर." आजी म्हणाल्या.
" मी फूल टाइम मॅनेजर लावून घेतो. पण तुला तस आवडत नाही आजी. सगळे काम स्वतः करायला बघते. " ऋषी म्हणाला.
"बरोबर आहे. घरची बाई हवीच. तीच प्रेमाने करेल. सोनलला एक चान्स दे. प्लीज. "
" आजी, अस घाईत लग्न होत नाही. मी सांगतो. मला वेळ दे. "
" ती रीटा सारखी नाही. शांत, समजूतदार मुलगी आहे. होकार दे ऋषी. माझं ऐक. मी नेहमी तुझ्या चांगल्याच विचार करते. नाहीतर मी घर सोडून वृंदावनात जाईल. तिकडेच राहील. तुझ तू बघून घे. " निर्मला आजींनी धमकी दिली.
" आजी काय असं? तू कुठे ही जाणार नाही. कोण कुठली मुलगी. अशी बळजबरी करणं योग्य आहे का? " ऋषी आजीसाठी थोडा घाबरला होता. नाहीतरी तिच्या शिवाय आमचं आहेच तरी कोण? सगळं घर विखुरले. एक धड नाही. सांभाळायला कोणी नाही. आजी जमेल तस करते. तिच्या शिवाय मी राहू शकत नाही.
" मी खात्री देते. माझ्यासाठी हे लग्न कर." आजी म्हणाल्या.
"मला काम आहे. घरी आल्यावर बोलू. तू कुठे जायच नाही सांगून ठेवतो. " त्याने फोन ठेवला.
आजी खुश होत्या. ऋषी होकार देईल. माझ्यासाठी तरी लग्नाला उभं राहिलं. थोडे दिवसात त्याला समजेल सोनल किती चांगली आहे. त्याचा संसार मार्गी लागेल.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा