Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 8

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 8

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

माया शिवाय माझ्या आयुष्यात कोणाला स्थान नाही. ऋषीने आजींना नकार देवून बघितला. आजींनी त्याच ऐकून घेतलं नाही. बघू पुढे काय होतय ते...

ऋषी नुसता विचार करत बसला होता. मनीष आला.

" काय झालं? आजी काय म्हणाल्या? "

" काय होणार आहे. सगळी अनिश्चितता आहे. कॉफी सांग प्लीज."

कॉफी येई पर्यंत कोणी काही म्हणालं नाही. मनीष ऋषीकडे बघत होता.

"रिटा बद्दल माहिती ना. " ऋषीने बोलायला सुरुवात केली.

" हो, ती काय मुलगी होती का? तुला अजिबात सूट होत नव्हती. तू किती शांत समजूतदार ती उथळ. बर झालं ती आधीच पळून गेली. नाहीतर तुमच्या संसाराचं काय झालं असतं सांगता येत नाही... म्हणजे सॉरी." मनीष गप्प बसला.

" इट्स ओके. मला समजलं. आता वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे. आजीने लग्नासाठी दुसरी मुलगी बघितली आहे. माझ्या ओळखीची नाही. आजी मला खूप आग्रह करते आहे. नाहीतर ती वृंदावनात निघून जाईल. " ऋषी सांगत होता.

" कोण? "

तो सोनल बद्दल सांगत होता.

" आता या स्थळाची चौकशी केली का?" मनीष विचारत होता.

" सांगितलं आहे. मला ना आता हे सगळं अशक्य झालं आहे मनीष. आजीला जास्त बोलता येत नाही. आई आजारी असते. पूनम वेगळच ताणते. तिची समजूत काढून कंटाळा आला आहे. तीच राघवचं अजिबात पटत नाही. आता म्हणते तिकडे रहायला जाणार नाही. डिवोर्स साठी आग्रह करते आहे. आर्या लहान आहे. तिला सुखी कुटुंब हवं आहे. या सगळ्यात मी भरडलो जातो आहे. माझा विचार कोण करणार? " ऋषी म्हणाला.

" सगळं बाजूला ठेव. तू तुझं बघ. ही मुलगी चांगली असेल तर लग्न करून घे. काय सांगाव खरच सगळं नीट होईल. आर्याला आईची गरज आहे. " मनीष म्हणाला.

" माया नंतर मला कोणाशीच बोलावसं वाटतं नाही. माझ फक्त तिच्यावर प्रेम आहे. ती जरी या जगातून गेली तरी माझ्यासाठी तीच अजूनही माझी पत्नी आहे. हे दुसर लग्न नको वाटतं. आजी, आई ऐकत नाहीत. उगीच का त्या मुलीच नुकसान करा. " ऋषी म्हणाला.

" असा विचार करून कस होईल ऋषी. काय सांगाव ही मुलगी खूप चांगली असेल. एवढं मोठ आयुष्य. अस कस आठवणींवर जगणार. कोणी तरी जोडीदार हवाच ना. कुटुंब पूर्ण कर. " मनीष म्हणाला.

थोड्या वेळाने फोन आला. सोनल बद्दल चांगलं समजलं. मुलगी शाळेत टीचर आहे. अतिशय हुशार आहे. मुलांमधे प्रसिद्ध टीचर आहे. गणित विषय शिकवते. ट्यूशन घेते. पण आयुष्यात दुःखी आहे. तिचा डिवोर्स झाला आहे. कोणाशी जास्त बोलत नाही. शांत आहे.

ऋषीने माहिती ऐकून घेतली. फोन ठेवला.

" बघ मी म्हणालो होतो ना. मुलगी चांगली आहे. लग्न कर सुखी होशील. " मनीष म्हणाला.

"मी फक्त आई, आजीसाठी हे लग्न करणार आहे. माझा त्या मुलीशी काही संबंध नाही. सगळे स्वार्थी असतात. मला एक समजत नाही ती मुलगी अस कस अनोळखी मुलाशी लग्नाला दोन तासात तयार झाली. पैसे बघतात ते. उगीच आपल चांगली आहे अस दाखवतात. " ऋषी म्हणाला.

" तिची खरच अडचण असेल. गरिबी वाईट असते ऋषी. काहीतरी नक्की असेल. " मनीष म्हणाला.

" हो ना, पन्नास लाख घेणार ना. मग काय तिची मजा असेल. तिने पैसे पैसे केले ना तर माझ्याहून कोणी वाईट नाही. मोठा बँक बॅलन्स हाती लागणार. तिचा तर फायदाच फायदा आहे. घरात ही हात साफ करता येईल. मला ना अस आवडत नाही. आई, आजी आहेत तोवर तिला राहू देईल. नंतर बघू काय करता येईल. त्याआधी तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल. अशी बरी ती आकस्मित लग्नाला तयार झाली. त्यात डिवोर्स झाला म्हणजे तीच वागणं नीट नसेल. " ऋषी खूप बोलत होता त्याला सोनलवर अजिबात विश्वास नव्हता. पैशासाठी बर्‍याच मुली त्याच्या मागे होत्या. काहीही करायला तयार होत्या. त्याला वाटलं सोनल अशीच असेल.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"