सोनेरी नात्यांची वीण भाग 9
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
ऋषीने गैरसमज करून घेतला होता. त्याला सोनल बरोबर कोणतच नातं नको होतं. आता पुढे...
रात्री सोनलला अजिबात झोप येत नव्हती. उद्या खरच माझं लग्न आहे. एका दिवसात जग बदलेल. हे अस काय नशीब आहे समजतं नाही. सगळं दुसऱ्यांसाठी करा. माझ्या मनाप्रमाणे काहीच होतं नाही. पण माझ्या प्रिय बाबांसाठी मी एवढं बलिदान तर देवू शकते.
ते लोक खरच बाबांची ट्रीटमेंट करतील का? वाह बर होईल. मी नकार दिला, बाबांना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही.
पण माझं काय होईल? नवीन नात, तो नवरा कसा निघेल? ते बहुतेक वयस्कर असतील तर विचारांची तफावत असेल. त्यांना एक मुलगी ही आहे. रागीट असले तर कठिण होईल. आधी सारखं झालं तर आगीतून निघून फोफोट्यात पडल्या सारखं होईल. परत ते माझ्या जवळ आले तर? तिच्या अंगावर काटा आला. मला हे जमणार नाही. तिचे हात पाय थरथर कापत होते. आई त्यांचा फोटो दाखवत होती. मी बघितला नाही. घरच्यांनी मला काही चॉईस ठेवली नाही. मग फोटो बघून तरी काय करू?
ती जागेवरून उठली. पटकन पाणी पिलं. तिला घाम आला होता. मी नवीन नात्यासाठी तयार नाही.
"आई... आई..." तिने आवाज दिला.
"काय ग ये." मीनलताई उठून बसल्या. ती त्यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपली. त्या तिच्या केसातून हात फिरवत होत्या.
" आई, आता तरी माझ चांगल होईल ना?"
" हो बेटा, खूप चांगल होईल काळजी करू नकोस. तू चांगला निर्णय घेतला आहेस."
ती आईच्या कुशीत शिरली. दोघी रडत होत्या.
"आई अस का असत ग मुलीच आयुष्य? मला माझं घर का नाहिये? कोणालाच मी आवडत नाही. सासरच्या लोकांनी अस छळून घराबाहेर काढलं. माहेरचे असे करतात. " सोनल नाराज होती.
" अस बोलू नये बेटा. तुझे बाबा, मी तुला किती जपतो. तू आमची हुशार लेक आहेस. हे घर तुझ आहे. " मीनलताई म्हणाल्या.
" हो ते आहेच, तरी पण दादा, वहिनी कस बोलतात. मला ओझ समजतात . त्यांना मला इथून घालवायची घाई झाली आहे. वहिनी तरी बाहेरून आली आहे. दादा कडून ही अपेक्षा नव्हती. " सोनलला राग आला होता.
" त्यांच्याकडे लक्ष देवू नकोस. तुझ इतकं चांगल होईल ना. लोक तोंडात बोट घालतील. मला माफ कर बेटा. मी पण सगळ्यां सोबत यात शामील आहे. तुझ्या चांगल्याचा मी विचार करते आहे. परत ते लोक तुझ्या बाबांची ट्रीटमेंट करतील. " मीनलताईंना मोहनराव नीट होतील ही आशा होती.
" हो आई, ते महत्वाचं आहे. आजी स्वतः अस म्हणाल्या का?" सोनलने विचारलं.
" हो त्या पन्नास लाखा पर्यंत मदत करतील. त्या आजी किती चांगल्या आहेत. त्या तुझ्या सोबत असतिल तर काही प्रोब्लेम येणार नाही." मीनलताई बोलत होत्या.
उद्या माझं लग्न होईल. माझ कस होणार आहे समजत नाही. ऋषी या लग्नासाठी का तयार झाले? त्यांची मुलगी मला स्विकारेल का? तिथून शाळेत जायला जमेल का? काही सुचत नाहिये.
******
आतल्या खोलीत राजेश, रसिका खुश होते. सोनल या घरातून जाईल म्हणून रसिका खुश होती तर बाबांच्या ट्रीटमेंट साठी पैसे मिळतील म्हणून राजेश खुश होता.
ते श्रीमंत लोक आहेत. ऋषी इनामदार बायको म्हणून सोनलच ऐकतील. ती किती चांगली, सुंदर आहे. लवकरच तिच्या हातात सगळया गोष्टी येतील.
मी तिला माझ्या जॉब बद्दल सांगेल. मला मॅनेजर म्हणून एवढ्या मोठ्या कंपनी मधे जॉब मिळेल. लाखाच्या घरात पगार असेल. आता सोहमची फी भरायची अडचण आहे. त्याला नंतर मोठ्या शाळेत टाकू. मी गाडी घेईल. रसिका कधीची तो सोन्याचा हार मागते आहे. ती नाराज असते. तिला लगेच दागिने करू. आता सगळं चांगल होणार आहे.
" अहो, तुम्ही ही तोच विचार करताय का?" रसिकाने विचारलं
" हो. आता सगळं चांगल होईल." राजेश म्हणाला.
" अहो पण सोनल लग्नाला नकार देत असेल तर तुम्ही तिला सपोर्ट करू नका." रसिका म्हणाली.
" हो, आता आपण इनामदारांशी नात जोडून गप्प बसू." राजेश म्हणाला.
दोघ बराच वेळ बोलत होते.
******
ऋषी घरी यायला निघाला. तो रस्त्याने सोनलचा विचार करत होता. ती कशी असेल? स्वार्थी असेल का? की आजी म्हणते तशी चांगली असेल? दिसायला कशी असेल? माझ्या माया पेक्षा कोणीच सुंदर नाही. मला तिचा विचार करायचा नाही.
तिला मूलबाळ नाही. माझ्या आर्याला ती आई सारख सांभाळेल का? मी तिच्याकडून अपेक्षा का करतो आहे. माझी मुलगी मी बघेन. त्या सोनलला लग्न करून घरी यायच असेल तर खुशाल ये. एकटी रहा. मला तिच्याशी देणं घेणं नाही. आजी सोबत ती राहील. मला एक मुलगी पोसणं जड नाही.
ठरवून ही तो तिच्या बद्दल विचार थांबवू शकत नव्हता.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
