Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 12

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 12

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

आई, बाबांसाठी सोनल लग्नासाठी तयार झाली. ती छान तयार होवून बाहेर आली. रसिका तिच्या मागे होती. आता तिचा काय स्वार्थ आहे? बघू पुढे काय होतय ते...

रसिका तिच्या आजूबाजूला होती. तिने सोनल सोबत बोलायचा प्रयत्न केला. तिने भाव दिला नाही.

काय काय दागिने घातले आहेत ते रसिका बघत होती. एक, दोन, तीन, चार, पाच... बापरे! मोठा नेकलेस, छोटा नेकलेस, चेन... काय काय आहे. पाटल्या ही बांगड्या ही. सोनलची मजा आहे. मी पण थोड श्रीमंत स्थळ बघायला हवं होतं. तिचा मनातल्या मनात जळफळाट होतं होता.

या सोनलला दोन दोन दिवस खायला मिळायचं नाही. नवरा मारझोड करायचा. रडत रडत माहेरी यायची. आता बघा कशी अकडते आहे. मी बोलायला गेली तर बोलली ही नाही. तिने नाक मुरडलं. ती राजेश जवळ जावून बसली.

"वाह छान दिसते आहेस." तो प्रेमाने म्हणाला.

"त्यात काय छान दिसण्यासारखं. नेहमीची मरून साडी, हे एक मणी ओवलेलं मंगळसुत्र आहे. बाकी माझ्याकडे काही नाही." रसिका रागाने म्हणाली.

"सगळं होईल रसिका. जरा धीर धर."

" कधी? मी म्हातारी झाल्यावर होईल का? ना कसली हौस ना मौज. नुसत राब राब राबा. पण आता नाही. मला नेकलेस पाहिजे. " तिची चिडचिड सुरू होती.

" लवकरच आपले स्वप्नं पूर्ण होतील. "

" असे दुसर्‍याच्या जिवावर? ती सोनल आत्ता पासून माझ्याशी बोलत नाही. नंतर काय मदत करणार आहे. "

" आपण तरी तिच्याशी कुठे नीट वागतोय. तर ती आपल्याशी बोलेल. जावू दे ती रागात आहे. रसिका आता मूड ठीक कर." राजेश तिला समजावत होता. ती सोहमला कपडे घालत होती. ते तयार झाले.

बाहेर कार आलेली होती. बापरे किती छान कार आहे. राजेश, सोहम, रसिका, बाजूच्या मावशी एका कार मधे बसले. दुसर्‍या कार मधे सोनल, आई, बाबा होते. ते निघाले.

******

इनामदार बंगल्यावर आवरायची गडबड सुरू होती. आर्या टब मधे बसली होती. ऋषी तिची आंघोळ घालून देत होता. ती पाणी उडवत होती.

" नको आर्या, आटोप चल पटकन. मी ओला होतो आहे. आपल्याला उशीर होतो आहे. "

"डॅडी आपण आता निघायच ना. मी परिचा फ्रॉक घालणार. आत्तु कुठे आहे? माझी तयारी करून दे. नवीन मम्मी मंदिरात आली असेल का? मी ना तिच्या सोबत रहाणार आहे." आर्या खुश होती.

ऋषी गप्प होता. तो सोनलचा विचार करत होता. ती चांगली निघाली तर कल्याण होईल नाहीतर काही खर नाही. आर्याला आत्ता पासून मम्मी हवी आहे. लग्नाला उगीच होकार दिला.

"हे बघ आर्या तू माझ्या सोबत रहायचं. नवीन मम्मी अजून नवीन आहे ना. तिला जास्त त्रास द्यायचा नाही." ऋषीने सांगून बघितलं.

"नाही, मी मम्मी जवळ राहील. मला तीच आवडते. माझी फ्रेंड नित्या तिची मम्मी नेहमी तिला सोडायला शाळेत येते. मला ही मम्मीला असच सोबत न्यायचं आहे. तिची मम्मी खूप सुंदर आहे. सॉफ्ट सॉफ्ट साडी नेसते. माझी नवीन मम्मी तशीच असेल ना डॅडी? सांग ना? " आर्या खूप बडबड करत होती.

" मला काय माहिती आर्या. तू ना जरा बडबड कमी कर. आता तयार हो. या मुलीच काय करावं समजत नाही. तिला वाटत तितकं निरागस जग नसतं. पूनम... आर्या कडे बघ जरा. तिला दोन समजुतीच्या गोष्टी सांग. तू इथे आहेस तो पर्यंत आर्याकडे बघशील का? ती नुसती मम्मी मम्मी करते. " ऋषी वैतागला होता.

" हो दादा मी बघेन. चला आर्या. आपण तयार होवू. नंतर ब्रेकफास्ट करायचा. दूध प्यायचं. "

" नाही आत्तु, मी दुध पिणार नाही. नवीन मम्मी सांगेल तर पिणार. " आर्या म्हणाली.

" आता ती इथे आहे का?" पूनम विचारत होती.

" नाही."

" मग आत्तुचं ऐकायचं."

आर्या तयार होती. ती खूप बडबड करत होती. ती खूप उत्सुक होती. तिच्या मनात मम्मी साठी वेगळं स्थान होतं. सगळ्यांना तीच भीती वाटत होती. सोनल तशी निघाली नाही तर आर्याला धक्का बसेल. तिच्या बाल मनावर परिणाम होईल. किती ही केल तरी ती सावत्र आई होती.

ऋषी रूम मध्ये तयार होत होता. कुर्ता पायजमा घातला होता. त्यावर दुप्पटा घेतला होता. केस सेट केलेले. तो नेहमी प्रमाणे जबरदस्त दिसत होता. चेहर्‍यावर टेंशन होत. तो काहीतरी विचार करत होता. त्याने कपाट उघडलं. त्याच्या कपाटात मायाच्या फोटो होता. तो समोर उभा होता. मी बरोबर करतोय की चूक समजत नाही माया. सगळं नीट व्हायला हवं. तू माझ्या कायम सोबत आहेस ना माया. तो दोन मिनिट फोटो कडे बघत उभा राहिला.

तो आईच्या रूम मधे आला. आशाताई खुश होत्या. थोडसं उठून बसल्या.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"