सोनेरी नात्यांची वीण भाग 19
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
लग्न लागलं. जेवण झालं. मामीने गोंधळ घातला. सुरुवात अशी झाली तर पुढे काय होईल? बघू...
ऋषी, राघव बोलत होते. " थँक्स राघव तुम्ही लग्नाला आलात. पूनम काय म्हणते?"
"काहीच नाही. आमचं म्हणावं तस बोलणं होतं नाही. नुसते गैरसमज होतात." राघव म्हणाला.
" झालं गेलं विसरून नवीन सुरुवात करा. अस करु नका. एकमेकांना समजून घ्या." ऋषी त्याला समजावत होता. पूनम त्याची लाडकी बहीण होती. ती सुखात असायला हवी.
"हो ऋषी दादा तुम्ही ही पूनमला सांगा."
"हो आपण भेटून बोलू. बाकी काम कस सुरू आहे?" ऋषीने विचारलं.
" रुटीन. "
" कधीही काही वाटल तर सांगा. आपल्या कडे एवढ आहे. मला ही सपोर्टची गरज आहे. पूनम आणि तुमच्या कडून अपेक्षा करु शकतो ना?"
" हो ऋषी दादा."
" त्यात लाजण्या सारखं काही नाही. तुम्ही काही घर जावई होणार नाही. तुम्ही सेपरेट राहून ही कंपनी चालवू शकता. मी मधे मधे करणार नाही. मी तुमचा बॉस नाही. " ऋषीने स्पष्ट सांगितलं.
हा जर मला जॉईन झाला तर त्यांचा ही पैशाचा प्रश्न रहाणार नाही. घरकामाला मदतनीस ठेवतील. माझी बहिण नीट राहील. अशी मदत केली तर तो घेणार नाही. बिझनेस ही अजून वाढेल. राघव तसा खुप हुशार आहे.
" मी विचार करेन. " राघव म्हणाला.
" पूनम. "...ऋषीने आवाज दिला. ती आली.
ऋषी आजी जवळ जावून बसला.
"मी निघतो." राघव म्हणाला. पूनम त्याच्याशी बोलत होती.
"उद्या भेटशील का पूनम?"
" हो, पण का?" तिने विचारलं.
"का म्हणजे? आपल्या बद्दल बोलायला. तुला हे नीट करायच की नाही? " राघव तिच्याकडे बघत होता.
"अजून काही बोलायचं बाकी आहे का? माझा निर्णय मी तुला मागेच सांगितलं आहे राघव. त्यात बदल होणार नाही. मी म्हणते तेच आपण करणार आहोत. मला बाकीच्यांशी देणं घेणं नाही." पूनम म्हणाली.
" हे जे तू वागते ते योग्य आहे का पूनम? माझ्या घरच्यां बद्दल अस बोलतेस. जरा ऐकून घेत नाही की समजूतदार नाहीस. थोड मी पुढे येतो. थोड तू ये. मी आपल्या बद्दल काही ठरवलं आहे." राघवने सांगायचा प्रयत्न केला.
" तुला काय म्हणायचं आहे मी समजूतदार नाही राघव? तू नेहमी मलाच काय अस बोलतोस? मला ना आता या बोलाचालीचा ही कंटाळा आला आहे. " तो काय सांगतो आहे ते ऐकुन न घेता पूनम चिडली.
" पूनम अग मी काय म्हणतो आहे." राघव तिला समजावत होता.
" काही म्हणू नकोस राघव. तू नेहमी तुझा आणि तुझ्या घरच्यांचा विचार करतोस. मी त्यात कुठे नसते. माझा विचार तू कधी करणार आहेस? " पूनम म्हणाली.
"हे अस आहे. तू अतिशय हट्टी मुलगी आहेस पूनम. मला वाटलं नव्हतं अशी निघशील. ग्रो अप. आता आपण दोघेच नाही ना. आपलं कुटुंब ही यामुळे प्रभावित होत. आई कधीची तुझी आठवण काढते आहे. तू म्हणजे समजून घेत नाहीस. " राघव ही तिला खूप बोलला.
" तू चांगला, एकदम गरीब बिचारा. तुझ्या घरचे चांगले. फक्त तुझी बायको एकदम खराब निघाली ना? माझ्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो असच ना राघव? " पूनम चिडली होती.
" तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. "
नेहमी प्रमाणे त्यांचे हळू आवाजात वाद झाले. राघव रागाने निघून गेला. पूनम तिथेच शांत बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं.
या राघवशी लग्न केलं म्हणजे मोठी चूक केली आहे. प्रेम नावाला राहील नाही. मला फक्त त्याच्या बद्दल वाटतं आणि तो माझा विचार करत नाही. जा जायच तर. शहाणा नुसता.
हे लग्न वगैरे म्हणजे ना कोणी करू नये. सुखी जीव दुःखी करू नये. या लग्न झालेल्या जोड्या फक्त भांडायला सोबत येतात अस वाटत. उगीच या राघवसाठी घरच्यांशी इतकी भांडली. मी एकटी होती ते ठीक होतं.
तिचे हात थरथर कापत होते. डॉ... राहुल तिने मेसेज केला. "मला पॅनीक ऐटॅक आला आहे. काय करू?"
"तू जेवली का?" त्याने विचारलं.
"हो."
" लगेच गोळी घे. घाबरू नकोस. कसलाच विचार करू नकोस. मोकळा श्वास घे." त्याने नाव सांगितलं.
पूनम पर्स मधे शोधा शोध करत होती. तिने गोळी घेतली. ती शांत बसली होती. मोकळा श्वास घेत होती. पाच मिनिटांनी तिला बर वाटलं.
माझं चुकलं का? राघव काय म्हणत होता ते तरी बघायला हवं होतं. तो गेला वाटतं. तिने त्याला फोन लावला. राघवने उचलला नाही. जावू दे. टेंशन घ्यायचं नाही.
आता ती ऋषी, सोनल कडे बघत होती. यांच ही अस होईल का? ते ही सदोदित भांडतील का? काय माहिती. ते तर आत्ता पासून एकमेकांशी बोलत नाही. पण दोघ शांत समजूतदार आहेत.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
