Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 20

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 20

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

राघव पूनमचे वाद टोकाला पोहोचले. तो निघून गेला. ऋषी, सोनल अजूनही बोलू की नको करत आहेत. पुढे बघू...

सोनल तिच्या आई बाबां जवळ बसलेली होती. आता सासरी जावं लागेल. तीच मन भरून आलं होतं. आईचा हात तिच्या हातात होता. "आई, बाबा काळजी घ्या. वेळेवर औषध गोळ्या घेत जा. अजिबात हयगय चालणार नाही. आई फराळाची ऑर्डर कमी कर. मी माझ्या पगारातुन पैसे पाठवत जाईल. बाबा आराम करत जा. जास्त चहा घ्यायचा नाही."

मीनलताई हळव्या झाल्या होत्या. काही बोलत नव्हत्या.

"हो बेटा तू नेहमीच आमचं करते. जसे आम्ही तुझे आहोत ना, तसच या नवीन कुटुंबाला ही स्विकार. ऋषी रावांच्या आई, आजीकडे लक्ष दे. घरचं प्रेमाने करत जा. " मोहनराव तिच्याशी बोलत होते.

" हो बाबा. "

" बेटा हे श्रीमंत लोक आहेत. यांचे बाकीचे पाहुणे बघितले ना कसे करत आहेत. काळजी घे. तुझं सामान सांभाळ. उगीच तुझ्या बॅग मधे कोणी काही टाकलं तर तुझ्यावर नाव येईल. " मीनलताई म्हणाल्या ते सोनलला पटलं.

"हो आई तू काळजी करू नकोस." उगीच कोणी चोरीचा आरोप केला तर कस आणि काय समजवणार की मी हे केलं नाही.

सोनलचं पहिल्यांदा असं झालं. तिच्या सासरच्यांनी वाटेल तसा त्रास दिला. कसतरी पोरगी त्यातून सुटली. आता तरी तिला सुख मिळायला हवं अस मीनलताईंना वाटत होतं. पण बाकीचे पाहुणे काही सुचू देत नव्हते. उगीच जळत होते. ते काय करतील सांगता येत नाही. त्यात मीनलताईंनी नेकलेस प्रकरणाचा ही धसका घेतला होता.

"हे नेकलेसच काय आहे समजत नाही." सोनल हळूच म्हणाली.

" हो ना. "

" कोणी घेतला असेल?"

दोघी रसिकाकडे बघत होत्या.

" हिने घेतला असेल का?"

" सांगता येत नाही. विचारणार तरी कसं?" मीनलताई म्हणाल्या.

" हे किती मोठे संकट होतं आई. ही वहिनी अशी का वागते? तिने नेकलेस घेतला नसेल तर बर आहे. पण घेतला असेल तर... " सोनल म्हणाली.

" मलाही माहिती नाही. जर त्या बाईंनी बॅग तपासली असती तर काय झालं असतं? जाऊ दे पण आपल्याला माहिती नाही. तो नेकलेस रसिकाने घेतला नसेल. ती फक्त राजेश जवळ हट्ट करते. ती बघ मांडवात नीट फिरते आहे. तिने नेकलेस घेतला असता तर एका जागी सामान सांभाळत बसून असती. " मीनलताई म्हणाल्या.

" हो ते आहे. वहिनी अशी नाही. मग नेकलेस कोणी घेतला?"

" आपण तर घेतला नाही. बाकी ते काही का करेना. मला वाटत मामींनी तो कुठे तरी लपवला असेल आणि आता तोफांड करत आहेत. मुद्दाम दुसर्‍यावर आळ घेत आहेत. " मीनलताईंना त्यांची आयडिया समजली होती.

" हो बरोबर. "

" चला सोनल वहिनी. " पूनम बोलवायला आली. सोनलने तिची बॅग नंदाकडे दिली. नंदाने तिची बॅग ऋषीच्या कारमध्ये ठेवली.

" निघायचं?"

सगळे उभे होते. सोनलचं मन भरून आलं. ती एकदम आई, बाबांना भेटली. त्यांच्या पाया पडल्या. "आई, बाबा मी येते." ती डोळे पुसत होती. ऋषी पण दोघांच्या पाया पडला.

रसिका, राजेश भेटले. " दादा वहिनी जे झालं ते गेलं. आपण नीट राहू. आई बाबांकडे बघा." तिने कमीपणा घेतला.

" हो सोनल ताई. तुम्ही ही काळजी घ्या आम्हाला विसरू नका." रसिका म्हणाली. राजेश ऋषी सोबत बोलत होता.

" सोहम कुठे आहे? " तो ही भेटला.

"तू कुठे जाते आहेस आत्त्या? " तो विचारत होता.

" मी माझ्या घरी जाते आहे. छान अभ्यास कर. आई बाबांना त्रास द्यायचा नाही." सोनलने त्याला जवळ घेतलं.

सोहम तिच्या जवळ होता हे आर्याला सहन झालं नाही." मम्मी तू माझी मम्मी आहेस." तिने सोनलला मिठी मारली.

"हो बेटा तू माझी आहेस."

सोनल डोळे पुसत होती. ते कार मध्ये बसले. आर्या तिच्या जवळ होती. पूनम, आजी दुसऱ्या कार मध्ये होत्या. त्या पुढे निघाल्या.

पूनम मोबाईल मधे बघत होती. ती राघवला मेसेज करत होती. त्याने फोन बंद करून ठेवला होता. आजी... मामा, मामी बद्दल तिला सांगत होत्या. तीच लक्ष नव्हतं.

ऋषी, मीनलताई मोहनरावां सोबत बोलत होता. त्यांना घरी सोडायला कार पाठवली.

तो कारमध्ये येऊन बसला. आर्या सोनलचे डोळे पुसून देत होती.

"काय झालं मम्मी? तू का रडते आहेस? डॅडी हिला काही सांग. ती रडते आहे." आर्या म्हणाली.

ऋषी काही म्हणाला नाही. तो खिडकीच्या बाहेर बघत होता.

"डॅडी... मम्मी रडते आहे. " आर्याने परत हाक मारली. तिला समजत नव्हतं ऋषी लक्ष का देत नाही. तिने टीव्हीत बघितलं होतं की मम्मीला त्रास होत असल्यावर डॅडी तिची समजूत काढतो. इथे तर तिला तसं काही दिसत नव्हतं.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all