Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 22

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 22

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषी, सोनल आशाताईंना भेटायला आले. त्या खूप खुश होत्या. मनापासून आशिर्वाद देत होत्या. आता पुढे...

सोनल.... ऋषी आशाताईंकडे बघत होती. ऋषी इतके सॉफ्ट ही वागतात? यांना अस ही बोलता येत? बापरे किती ते प्रेम. मला वाटलं फक्त अकडता येतं. अगदी आई म्हणेल ते मी ऐकेल अस सुरू आहे.

सोनलला यावरून समजलं ऋषी त्यांच्या आईच किती ऐकतात. आईला अजिबात नाराज करत नाही. सकाळ पासुन हा माणूस माझ्याकडे बघत ही नाही. मी आहे की नाही जस. बाकीच्यांशी ही तुटक वागता आहेत. आईच मात्र सगळं ऐकून घेतलं. त्या मुलांपर्यंत बोलल्या. तरी हे ऋषी इनामदार काही म्हणाले नाही.

मला तर खर हे ऋषीचं वागणं काय आहे ते समजल नाही. मोठ्या माणसांना जपलं पाहिजे हे खर आहे. पण इतरांकडे ही थोड बघायला हवं. परक्या माणसांशी ही आपण नीट वागतो.

हे माझ्याशी बोलत नाही. मला गणतीत धरत नाही. अजिबात भाव देत नाही. हे सगळं कधी नीट होईल? की होणारच नाही. असच सुरू राहील? माहिती नाही. ती नाराज होती. का ते तिला माहिती नव्हतं.

तुला ते तुझ्याशी बोलायला हवे आहेत का? दुसर मन म्हणालं.

नाही, अस नाही. पहिल्या मनाने पटकन उत्तर दिलं.

मग का अपेक्षा ठेवतेस? तुझ्या सारखं त्यांच ही लग्न घाईत झालं आहे. अजून ओळख नाही. त्यांनाही कोणीतरी या लग्नासाठी बळजबरी केली असेल. थोड समजून घे. दुसर मन म्हणालं.

हो बरोबर आहे. घ्या.... हवा तितका वेळ घ्या. मला काही प्रॉब्लेम नाही. ते माझ्याशी बोलले कींवा नाही बोलले तरी काय फरक पडतो. मी बाबांसाठी हे लग्न केलं. मी पण स्वार्थ बघितला.

हो मग त्यांनी ही तसाच विचार केला असेल. त्यांच्या आईला, मुलीला तुझी गरज असेल. काहीतरी काम असेलच त्याशिवाय ते ही घाईने निर्णय घेणार नाहीत. त्यात काय?

हो काही प्रॉब्लेम नाही. हळूहळू समजेल. पण मला वेळ नाही. शाळा असते. मी पण जॉब करते. जस जमेल तस करू.

आता ती शांत झाली होती. एकंदरीत हे लोक चांगले आहेत. नाहीतर आधी किती ते टोमणे. उलट सुलट बोलणे सहन केले.... आधीचा विचार करून तिच्या अंगावर काटा आला. बापरे तो विचार नको.

सुभाषला समजलं असेल का की माझं लग्न झालं? त्यांना काय फरक पडतो. त्यांनी ही लग्न केल की. नवीन बायको सोबत ते आरामात झोपले असतिल.

" ऋषी इकडे ये. त्या ड्रॉवर मधून तो बॉक्स दे." आशाताई म्हणाल्या.

"आई आता का?"

" दे म्हणते ना."

ऋषीने बॉक्स दिला. त्यांनी तो उघडला. जुन्या खानदानी डिझाईनच्या बांगड्या त्यांनी ऋषीकडे दिल्या. "ह्या सोनलला घालून दे."

" आई..."

" आटोप."

त्याने त्या बांगड्या सोनलकडे दिल्या.

"अरे? ऐकू येत नाही का? अस काय तिच्याकडे देवून दिल्या. नीट हातात घालं. हात पुढे कर सोनल. " आशाताई म्हणाल्या. त्यांच्या चेहर्‍यावर छान हसू होतं.

तिने हळूच हात पुढे केला. टच होणार नाही अश्या पध्दतीने ऋषीने तिला बांगड्या घालून दिल्या. आशाताई खुश होत्या. तो आईच्या चेहर्‍याकडे बघत होता. आई खुश आहे बाकी मला काही नको.

आजी ही आशाताईच्या रूम मधे आल्या. त्या लग्न कसं झालं ते आशाताईंना सांगत होत्या.

लताताई सूप घेवून आल्या. आज आशाताईंनी पूर्ण सूप पिलं. ते बघून ऋषी खुश होता.

ऋषी रूम मधे निघून गेला. आजी सोनलशी बोलत होत्या." पूनमला काय झालं काय माहिती? थकली असेल. लगेच रूम मध्ये निघून गेली. चल तू आवरून घे. आर्या चल बेटा. जेवण करून झोप."

ऋषी रूम मधे आला. तो नुसतं बसला होता. सोनल बद्दल विचार करत होता. खर तर आज त्याला छान वाटत होतं. ती आली तर आई खुश आहे. तिने थोडं तरी खाल्लं. चला आईची तब्येत सुधारेल. थोडी तरी आशा आहे. आर्या ही तिच्या आजुबाजुला असते. आजीने सोनलला पसंत केल. तिचे डीसीजन बरोबर असतात. निदान घराची एक बाजू सोनलने सांभाळली तरी बर आहे.

मी सोनलशी आज अजिबात बोललो नाही. खर तर मला कस वागावं ते समजत नाही. इतक्यात मला ते जमणार ही नाही. आमची साधी ओळख ही नाही. विचार करत तो कपडे बदलायला गेला. कपाट उघडलं. समोर मायाचा फोटो होता. तो एकदम शांत झाला. तो तिच्या फोटो कडे बघत होता. त्याला गिल्टी वाटलं.

आज सकाळ पासून मायाची आठवण ही आली नाही इतक मी सोनलच्या विचारात होतो. मी अस करु शकत नाही. माया माझ प्रेम आहे. ती आर्याची आई आहे. त्याने आंघोळ केली लॅपटॉप घेतला. तो मेल चेक करत होता. तो परत प्रॅक्टिकल झाला.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"