Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 23

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 23

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषी लक्ष देत नाही म्हणून सोनल डिस्टर्ब झाली होती. त्यामागच कारण ही तसच होत. ऋषी मायाच्या आठवणीतून बाहेर येईल का? आता पुढे...

पूनम बाथरूम मधे उभी होती. ती रडत होती. मी मूर्खपणा केला. राघव भेटला होता. त्याच्याशी मी नीट वागली नाही. तिने त्याला फोन लावून बघितला. त्याचा फोन स्विच ऑफ होता.

बापरे राघव कुठे गेला तर नसेल ना? तो परत आला नाही तर मी काय करू? माझ्यामुळे त्याला काही झालं तर? तिला खूप भीती वाटली. आता ती काहीही विचार करत होती.

त्यांच्या घरच्या लॅण्ड लाइन वर फोन करू का? नको तिथे सासुबाई असतात. त्या फोन उचलतील उगीच दोन शब्द ऐकवतील.

ऐकून घेवू का? माझा इगो राघव पेक्षा मोठा नाही. तिने फोन लावला. लीनाताईंनी फोन उचलला.

"आई मी पूनम बोलते आहे."

" कशी आहेस बेटा?"

"मी ठीक आहे आई."

" अशी रागवू नकोस. घरी परत ये. मला माहिती आहे तुला माझा राग आला आहे." त्या म्हणाल्या.

त्यांच बोलणं ऐकून पूनम शॉक होती. बापरे या किती चांगल्या असल्या सारखं दाखवतं आहेत.

" अस काही नाही आई." पूनम मधेच म्हणाली.

"मला ना खरच कस वागवं ते समजत नाही. आम्ही मध्यमवर्गीय लोक. इथे असच होत ग. सगळे मिळून मिसळून रहातात. तुला कमी जास्त बोललं गेलं असेल. पण ते मनापासुन नव्हतं ग. सोड ते. मी सगळ्यांनाच बोलते ना. " लीनाताई त्यांची बाजू सांगत होत्या.

"अस नका म्हणू आई." पूनम म्हणाली.

या सगळ्यांना बोलतात ते ठीक आहे. पण मला सवय नाही ना. काही कारण नसेल तर या का चिडचिड करतात? उगीच यांच्यामुळे सगळ्यांचे मूड जातात. आईंच ते रोजच होतं. उठलं की सगळ्यांना त्रास द्यायचा. परत काहीच झालं नाही अश्या पद्धतीने त्या सगळीकडे वावरत असायच्या. यांना खर तर डॉक्टरांना दाखवायला हवं... पूनम विचार करत होती.

" खरच सांगते पूनम, राघव वरचा राग सोड. तुमचा संसार वाचवं." लीनाताई अजून तेच बोलत होत्या.

मला राघवशी प्रॉब्लेम नाही. तुमचं माझ जमत नाही. याला कारणीभूत तुमचा स्वभाव आहे. पण ती काही म्हणाली नाही. आता त्या बरोबर सगळा दोष मला देवून मोकळ्या होतील. जावू दे. मला राघव महत्वाचा.

पूनमने उत्तर दिले नाही.

यांच हे नीट वागणं फक्त दोन दिवस असेल. तिकडे रहायला गेलं की पहिले पाढे पंचावन्न. काय करू काही समजत नाही. खरच लहान घरात रहात असतांना अस होत असेल का? सगळे अति मधे मधे करतात. विचारलं नाही तरी सल्ला देणे. मी केलेलं कोणतच काम त्यांना आवडत नाही. यांना मदतनीस आवडत नाही. सगळं स्वतः करा. का तर खर्च होतो. दादा मदतीला तयार होता. ते ही त्यांना आवडत नाही. राघव ही नाही म्हणतो. अजून काय? अजिबात प्रायव्हसी नसणे. सदोदित सगळे सोबत. जावू दे ते मला पटत नाही. त्या दुरून चांगलं बोलतात.

"राघव घरी आला का?" ती मुद्दयावर आली. ज्याच्या साठी फोन केला होता ते विचारलं.

"हो आहे ना." त्यांनी फोन त्याच्याकडे दिला.

"राघव, तू फोन का बंद केला आहेस? सॉरी आज मी जास्त रीयॅक्ट झाली. तुला बोलली. मला अशी शिक्षा देत जावू नको. मला ना फार त्रास होतो." ती रडत होती. त्याला समजत होतं.

" इट्स ओके. त्रास करून घेवू नकोस पूनम. तू ना फक्त फोनवर समजूतदार पणा दाखवते. प्रत्यक्षात तुझी चिडचिड कमी होत नाही. यावर विचार कर जरा. आज थकली असशील आराम कर." राघव म्हणाला.

" राघव ते मला.... " ती बोलत होती.

" काहीही कारण सांगू नकोस. तुझ्या अश्या वागण्याने मला त्रास होतो. आपल्यात काही निर्णय होत नाही. नुसते भांडण होतात. " राघव म्हणाला. आज खर तर तो तिला समजवायला आला होता. पण त्यांच काहीच ठरलं नाही.

" सॉरी... ते तू भेटायच म्हणत होतास ना? आपण आरामात बोलू. " पूनम म्हणाली.

" तुला खरच माझ्यासोबत रहायचं आहे का पूनम?" त्याने स्पष्ट विचारलं.

" हो राघव. अस का म्हणतोस. तस बघितलं तर आपल्यात भांडण नाही. आजूबाजूच्या लोकांमुळे आपल्याला काही सुचत नाही." पूनम काय म्हणते ते राघवला समजलं होतं. लीनाताईं मूळे त्यांच्यात वाद होत होते.

" उद्या बोलू मी फोन करतो. " त्याने बघितलं तो काय म्हणतो आहे ते आई बाबा ऐकत होते. त्याला काय बोलायचं ते मधे मधे सांगत होते.

"ठीक आहे." तिने फोन ठेवला.
******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"