सोनेरी नात्यांची वीण भाग 24
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
राघव आणि सोनलचा म्हटलं तर प्रॉब्लेम मोठा आहे. सोडवलं तर सुटेल ही. मानसिक शांती ही हवी. सोनल आधीच त्रासात आहे. ट्रीटमेंट घेते आहे. बघू पुढे काय होतय ते...
राघवशी बोलून झाल्या मुळे सोनलला बर वाटत होतं. यापुढे त्याच्याशी भांडायचं नाही तिने ठरवलं. नाहीतर मला त्रास होतो. गोळ्या घ्याव्या लागतात. दोन दिवसानी डॉक्टरांची काउंसलिंगसाठी एपाॅइंटमेंट आहे. डॉक्टरांना सांगावं लागेल सहन शक्ति अगदी कमी झाली आहे. सारखी चिडचिड होते.
राघवच्या घरच वातावरण अस आहे ना माझा कंट्रोल जातो. त्याला त्याच्या घरच्यांची सवय आहे. इकडे इनामदार बंगल्यावर अस नाहिये. दोन घरांमधे खूप फरक आहे. मला कोणी समजून घेत नाही.
******
राघव आई बाबांकडे बघत होता. "आई, बाबा मी हे नीट करतो आहे. थोडे दिवस तुम्ही प्लीज आमच्या मधे मधे करू नका ना."
" आम्ही मधे मधे करतो का? तुला नक्की काय म्हणायचे आहे?" लीनाताई चिडल्या होत्या.
" आत्ताही आई तू फोन सुरु असतांना मधे मधे बोलत होतीस. मला काय बोलायच ते सांगत होतीस. काय गरज होती सांग बर. पूनम तिकडून ऐकत असेल. त्यांच्याकडे वेगळं वातावरण असतं. आम्हाला थोडी तरी स्पेस द्या. तिला आणि मला काय आहे ते ठरवू द्या ना. " राघव चिडला होता.
"अरे मग आम्ही काय करतोय? तुम्ही तुमचे रहातात. तुम्हाला सेपरेट खोली आहे. तुम्हाला पगार किती येतो आम्ही विचारत नाही. तू बायकोला न विचारता काही घेतलं तरी आम्ही काही म्हणत नाही." लीनाताई जोरात बोलत होत्या.
"त्यात काय काही म्हणण्यासारखं? काहीही आपलं. ती माझी बायको आहे तिच्यासाठी मी काही करायच नाही का? आई तुझा संसार करून झाला ना. आता थोड पूनमच्या मनाने होवू दे ना. तुमच्या अश्या वागण्याने ती नाराज असते. " राघव म्हणाला.
" आता तिचा फोन आला आणि तू आम्हाला असं बोलायला लागला. तिने सांगितल असेल." लीनाताई म्हणाल्या.
" ती फक्त माझ्या बद्दल बोलली. ती साधी आहे. उगीच नाव घेत नाही. " राघव म्हणाला.
" एवढी चांगली आहे तरी बर तुला सोडून माहेरी रहाते? अरे तुमचचं एकमेकांशी पटत नाही. आमच्यावर आळ आणायचा नाही. घरी इतकं चांगल असून हे अस? आम्ही कसे दिवस काढले. दोन खोल्यांमधे मधे दहा बारा माणसं कस रहात होतो." लीनाताई परत जुनी गोष्ट सांगत होत्या.
"मला माहिती आहे आई. आता तेच तेच सांगणं पुरे करा. तुमच्या या स्टोरी मधे कोणाला इंट्रेस्ट नाही. आता पूनमचं काय करायचं ते मला बघू द्या. " राघव चप्पल घालून बाहेर निघून गेला.
लीनाताई बडबड करत बसुन होत्या. बाबा नेहमी प्रमाणे पेपर वाचत होते.
******
आजी रूम मधे आल्या. "काय झालं पूनम? नाराज आहेस का? "
" हो आजी. आमचं नेहमीच आहे. राघव सोबत भांडण झालं. "
" का विचारु शकते का?"
"अग राघव भेटायच म्हणाला. मला तिकडे रहायला जायच नाही. त्यावरून झालं." पूनम सांगत होती.
"अस करुन चालेल का बेटा. थोड समजुतीने घे."
" अग आजी मला तिकडे जमत नाही. सासुबाई वेगळच वागतात. मला ना खूप त्रास होतो आहे. जावू दे आपण या विषयावर बोलायला नको. " पूनम दीर्घ श्वास घेत होती.
" ठीक आहे. काळजी घे. पण एक सांगते सोनलने अस केल तर? मला, तुझ्या आईला एकट सोडून ऋषी तिच्या सोबत दुसरीकडे रहायला गेला तर? तुला चालेल का? " आजी म्हणाल्या.
" पण आजी तू खूप चांगली आहे. कस वागायचं ते तुला चांगलं माहिती आहे. आईला तू लेकी पेक्षा जास्त जपतेस. सासुबाईं सारखी वागत नाही. वहिनीशी अशीच वागशील मला माहिती आहे. त्यात काय तुला सोडून जाण्यासारखं. उलट तू हवीहवीशी आहेस. गोड आहेस. " सोनल म्हणाली.
"अग आशा आजारी असते. तिला काय जाच करणार. तिने या घरासाठी किती केलं आहे. माझ ही किती करायची. आमची सासू सुनेची जोडी अशी नव्हतीच. आम्ही मैत्रिणी आहोत. " आजी खूप सांगत होत्या. पूनम मनापासून ऐकत होती. यांची स्टोरी किती पॉझिटीव्ह आहे.
"मला अस नातं हवं. मी पण सगळं करेन. समोरचा तसा हवा. समजूतदार चांगला. "पूनम म्हणाली.
"सगळे लोक सारखे नसतात ना. तू थोड समजून घे. " आजी म्हणाल्या.
" हो ते आहेच. मी प्रयत्न करेन. माझ्या वाटेला असे लोक का आले?" पूनम म्हणाली.
"अस म्हणु नये बेटा. विचार कर सोनलला पहिल्या घरी त्रास होता. अश्या कित्येक स्त्रिया पुरुष आहेत ते ही त्रासातून जात आहेत. त्यांच्या पेक्षा तुझ बर आहे ना? यातून ही मार्ग निघेल. राघवला समजून घे. तुमच ही नवीन लग्न झालं आहे." आजी समजावत होत्या.
" हो आजी."
"चल बाहेर. सोनलकडे बघ. ती पण गडबडली आहे. या घरात तिचा पहिला दिवस आहे. तिच्या बरोबर रहा."
"हो आलीच." पूनम फ्रेश झाली. ती बाहेर आली.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा